Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tax Saving Mutual Fund : कर वाचविण्यासाठी कुठेही नका करु गुंतवणूक, ELSS असा येईल कामी

Tax Saving Mutual Fund : मार्च महिना असल्याने अनेक जण कर वाचविण्यासाठी पर्याय शोधत आहेत. यंदा जर तुम्ही कर बचत करण्यासाठी Tax Saver Funds वा ELSS मध्ये गुंतवणूक करु शकता. कुठेही गुंतवणूक करण्यापेक्षा हा म्युच्युअल फंड तुमच्या कामी येईल.

Tax Saving Mutual Fund : कर वाचविण्यासाठी कुठेही नका करु गुंतवणूक, ELSS असा येईल कामी
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 9:29 PM

नवी दिल्ली : मार्च महिना असल्याने अनेक जण कर वाचविण्यासाठी पर्याय शोधत आहेत. यंदा जर तुम्ही कर बचत करण्यासाठी Tax Saver Funds वा ELSS मध्ये गुंतवणूक करु शकता. कुठेही गुंतवणूक करण्यापेक्षा हा म्युच्युअल फंड तुमच्या कामी येईल. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS) संबंधीत अनेक योजना कर बचतीसाठी (Tax Saver Funds) चांगला पर्याय ठरु शकतात. पण योग्य फंड निवडणे हे पण एक आव्हान आहे. कारण ईएलएसएस योजनेत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अनेक म्युच्युअल फंड हाऊस यांनी त्यांचा ईएलएसएस फंड बाजारात आणला आहे. पण तुमच्यासाठी यापैकी कोणता योग्य असेल? त्याचा कसा फायदा होईल?

कर बचतीसाठी, गुंतवणूकदार जेव्हा ईएलएसएस फंडचा पर्याय निवडतो, तेव्हा त्याची श्रेणी निवडणे त्यांना कठिण होते. त्यामुळे कोणताही ईएलएसएस फंड निवडण्यापूर्वी त्याला काही कसोट्या लावल्या तर गुंतवणूकदारांना मोठा फायदा होतो. तरच तुम्हाला योग्य ईएलएसएस फंडाची निवड करता येईल. ELSS Mutual Fund मध्ये इनकम कायद्याच्या कलम 80C अतंर्गत 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळेत. जोरदार परतावा मिळतो. या योजनेत लॉक इन पिरियड पण इतर कर सवलत (Small Savings) योजनांपेक्षा कमी आहे. मुदत ठेव वा NSC तुलनेत 5 वर्षात 3 ते 4 पटीत परतावा जास्त मिळतो.

जर तुम्ही कर बचत फंड वा ईएलएसएस योजनेत गुंतवणूक करण्याचा निश्चिय केला असेल तर त्यासाठी या फंडाला 9 कसोट्या लावणे आवश्यक आहे. विविध म्युच्युअल फंड हाऊसच्या ईएलएसएस योजनेला या कसोट्यावर तपासून पहा. त्याआधारे तुम्हाला कोणत्या कंपनीचा म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी योग्य आहे, हे ठरविताना मग गोंधळ उडणार नाही. तुम्हाला कर बचतीचा फायदा तर होईलच पण चांगला परतावा ही मिळेल.

हे सुद्धा वाचा

या आहेत कसोट्या

  1. कोणताही फंड निवडण्यापूर्वी तुमच्या गुंतवणुकीचा नेमका उद्देश काय हे समजू घ्या
  2. गुंतवणुकीपूर्वी म्युच्युअल फंडाचा NAV आणि खर्च यामध्ये किती अंतर आहे, हे तपासा
  3. या म्युच्युअल फंडाचा कमीतकमी SIP किती आहे, ते पाहा. तो जर अधिक असेल तर तुमच्या महिन्याच्या बजेटवर आणि भविष्यातील इतर योजनांच्या खर्चावर मर्यादा येतील
  4. कोणत्याही फंडाची निवड करण्यापूर्वी त्याची एकूण संपत्ती (AUM) किती आहे, हे जरुर पाहा. त्यामुळे या म्युच्युअल फंडाचा योग्य पर्याय निवडण्याचा मार्ग मोकळा होईल
  5. म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापन कोण करत आहे. बाजारात या फंड मॅनेजरला किती वर्षांचा अनुभव आहे, या फंडात गुंतवणूक करणारे मोठे गुंतवणूकदार कोण आहेत, याविषयीची माहिती जमा करा
  6. या म्युच्युअल फंडाचा बेंचमार्क इंडेक्स काय आहे. शेअर बाजारातील घडामोडींचा त्याच्यावर काय परिणाम होत आहे. निफ्टीनुसार त्याच्यात गती आहे का, तुम्हाला फायदा होईल का हे तपासा
  7. सर्वात महत्वाचे म्हणजे या फंडने गेल्या वर्षात कितीचा परतावा दिला, त्याची सरासरी किती याची माहिती घ्या
  8. या म्युच्युअल फंडात परतावा जोरदार असला तरी जोखीम किती आहे, अटी आणि शर्ती काय आहे, हे तपासा

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल.
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.