Railway Liquor Policy : रेल्वेच्या प्रवासात होता येते का ‘झिंगाट’, किती नेता येते दारु, माहिती आहे का
Railway Liquor Policy : रेल्वेच्या प्रवासात तुम्हाला दारु पिता येते का, झिंगाट होता येते का, अशा एक नाही तर अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. जाणून घेऊयात काय आहे नियम..
नवी दिल्ली : ट्रेनमधून (Indian Railway) प्रत्येक दिवशी कोट्यवधी लोक प्रवास करतात. अनेक प्रवाशी गावाकडून शहरात जातात. काही उलटा प्रवास करतात. त्यांच्यासोबत मोठे सामान असते. अनेकदा लोकांना प्रश्न पडतो की, रेल्वेत आपल्याला दारुची बोटल नेता येते का? दारु (Liquor Policy) पिता येते का, तसेच प्रवाशाला किती दारु सोबत नेता येते. पण ही झिंगाट पार्टी अंगलट आली तर रेल्वे नियमानुसार काय कारवाई होते. किती दंड भरावा लागतो, किती शिक्षा होते, अशा अनेक प्रश्नांची जंत्री तुमच्या डोक्यात असेल. तर जाणून घेऊयात काय आहे नियम..
काय सांगतो नियम याविषयी न्यूज18 ने उत्तर रेल्वे विभागाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (CPRO) दीपक कुमार यांची याप्रकरणी प्रतिक्रिया घेतली. त्यांनी ट्रेनमधून दारुची वाहतूक, दारु पिऊन प्रवास करणे यावर प्रतिबंध असल्याचे सांगतिले. याचा सरळ अर्थ रेल्वेत चढताना तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे मद्य नसावे. तुमच्याकडे जर मद्याची बाटली आढळली तर मात्र तुमच्यावर कारवाई करण्यात येते. रेल्वे अधिनियम 1989 च्या नियम 165 अंतर्गत ही कारवाई करण्यात येते.
काय होते कारवाई रेल्वे अधिनियम 1989 च्या नियम 165 अंतर्गत कारवाई करण्यात येते. जर एखादा व्यक्ती ट्रेनमध्ये प्रतिबंधीत वस्तू घेऊन आला तर त्याला 500 रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येतो. तसेच या प्रतिबंध घातलेल्या वस्तूमुळे जर रेल्वेचे, दुसऱ्या प्रवाशाचे नुकसान झाले तर त्याचा खर्चही दोषींकडून वसूल केल्या जातो.
अनेक राज्यांमध्ये प्रतिबंध जर तुम्ही ट्रेनमधून दारुची बाटली सोबत घेऊन प्रवास करत असाल आणि रेल्वेच्या तपासणी दरम्यान तुम्ही वाचला तरी अनेक राज्यात तुमच्यावर कारवाई करण्यात येते. काही राज्य ड्राय स्टेट म्हणून ओळखल्या जातात. या राज्यात दारुवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. बिहार आणि गुजरात राज्यात तुम्ही दारुच्या बाटलीसह वा झिंगलेल्या अवस्थेत आढळल्यास कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागेल.
कर चोरीचा आरोप जर प्रवाशाकडे दारुची बाटली मिळाली तर आरपीएफ जवान त्या व्यक्तीला शांतता भंग केल्याप्रकरणी दंड ठोठावू शकतात. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना दारु सोबत नेल्यास प्रवाशाला कर चोरीच्या आरोपाखाली कार्यवाहीला सामोरे जावे लागू शकते.
ज्येष्ठांमुळे रेल्वे मालामाल या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांमुळे रेल्वे मालामाल झाली. रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांकडून एकूण 5,062 कोटी रुपयांची कमाई केली. यामध्ये 2,242 कोटी रुपयांची अधिकच्या कमाईचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांना भाड्याची सवलत नाकारून, ही कमाई करण्यात आली आहे.
2020-2022 दरम्यान जबरदस्त कमाई आरआयटीतील माहितीनुसार, रेल्वेने मार्च 2020 ते 31 मार्च 2022 याकाळात 7.13 कोटी कोटी वयोवृद्धांना किराया, भाड्यामध्ये कुठलीही सवलत दिली नाही. यामध्ये 4.46 कोटी पुरुष, 2.84 कोटी महिला आणि 8,310 कोटी ट्रांसजेंडरचा समावेश आहे. या दरम्यान रेल्वेने वयोवृद्धांकडून 3,464 कोटी रुपयांपेक्षा अधिकची कमाई केली. पण रेल्वेने सवलत नाकारल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.