नवी दिल्ली : आधार (Aadhaar Card) आजच्या काळात अत्यंत आवश्यक पुरावा मानण्यात येतो. आधारकार्डची आवश्यकता अनेक सरकारी आणि गैर सरकारी कामासाठी करण्यात येतो. त्यामुळे याविषयीच्या ज्या काही सूचना येतात, त्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण वेळोवेळी नवीन निर्देश देते. आधार कार्डची एजन्सी UIDAI ने याविषयीचे एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी नवीन माहिती दिली. त्यानुसार, आधार कार्डला 10 वर्षांपेक्षा जास्त असेल तर आधार कार्ड अपडेट (Aadhar Update) करणे आवश्यक आहे. आधार कार्ड अपडेट करणे सोपे आहे.
myAadhaar पोर्टलवर अपडेट
myAadhaar पोर्टलवर आधार कार्ड अपडेट करता येते. ऑनलाईन पद्धतीने आधारकार्ड अपडेट करता येते. या 15 मार्च ते 14 जून 2023 रोजीपर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करता येते होते. आता ही सेवा बंद करण्यात आली आहे. तरीही तुम्हाला आधार कार्ड केवळ 50 रुपयांमध्ये अपडेट करता येते.
कितीवेळा करता येते अपडेट आधार कार्ड
आधार कार्डमधील माहिती अपडेट करण्यासाठी निश्चित मर्यादा आहे. तुमच्या नावात दोनदा बदल करता येतो. तर जन्मतारीख आणि लिंगामध्ये एकदाच बदल करता येतो. त्यामुळे ही माहिती भरताना, अपडेट करताना काळजी घेणे आवश्यक आहे.
आधार-पॅन जोडणी
प्राप्तिकर खात्याने (Income Tax) पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी आता 30 जून 2023 ही अंतिम मुदत दिली आहे. त्यानंतर पॅनकार्ड बाद करण्यात येईल. त्यामुळे तुम्हाला बँकेचा व्यवहार, इतर व्यवहार करता येणार नाहीत. बँकिंग व्यवहारासाठी पॅनकार्ड अनिवार्य असते. सध्या पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी 1,000 रुपये दंड द्यावा लागतो. मुदत संपल्यावर नागरिकांना ही संधी देण्यात येणार नाही.
पॅन कार्ड होईल निष्क्रिय
या 30 जूनपर्यंत दोन्ही कार्डची जोडणी केली नाही तर पॅन कार्ड निष्क्रिय होईल. मुदतीनंतर जोडणी केल्यास तुम्हाला 10,000 रुपये दंड बसू शकतो. आयकर अधिनियमाच्या कलम 272बी अंतर्गत 10,000 रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. सध्या एक हजार रुपयांचा दंड भरुन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. अजूनही ज्यांनी या दोन्ही कार्डची जोडणी केली नाही, त्यांना एक हजार रुपये भरुन ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया पूर्ण करता येईल.
MyAadhaar पोर्टलवर आधार असे अपडेट करा
ही घ्या काळजी