Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिळाला फॉर्म्युला जादूई, अशी होईल कमाई, पगार असू द्या कमी

Crorepati Formula | सध्याच्या काळात काटकसर आणि पैशांची बचत महत्वाची आहे. नोकरदार वर्ग पगारासाठी 30 दिवसांची वाट पाहतो. पण जसा पैसा येतो, तशा त्याला वाटा फुटतात. मग बचत होत नाही. तुमचं वय कमी असेल आणि पगार पण कमी असेल तर अवघ्या 30-40 हजार रुपयांच्या दरमहा कमाईत सुद्धा तुम्हाला करोडपती होता येतं.

मिळाला फॉर्म्युला जादूई, अशी होईल कमाई, पगार असू द्या कमी
Follow us
| Updated on: Nov 09, 2023 | 10:06 AM

नवी दिल्ली | 9 नोव्हेंबर 2023 : आजची बचत ही उद्याची श्रीमंती असते, असे म्हणतात. भारतीय लोक हे बचतीत अग्रेसर आहेत. बचतीची सवय भविष्यातील शिदोरी असते. सध्या वाढती महागाई आणि घर खर्च अशी तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे 30 दिवसांनी मिळणारा पगार येताच संपून जातो. हा पैसा इतक्या झटपट गायब होतो की कळतच नाही. पण तुम्ही आर्थिक स्वयंशिस्त लावली तर तुम्हाला पण करोडपती होता येते. त्यासाठी 50-30-20 हा नियम तुमच्या कामी येईल. हा जादुई फॉर्म्युला (Crorepati Formula) आहे जो तुम्हाला करोडपती करेल.

काय आहे फॉर्म्युला

50-30-20 नियमांचा शोध एलिझाबेथ वॉरेन यांनी लावला. त्यांच्या All Your Worth: The Ultimate Lifetime Money Plan या पुस्तकात त्याची माहिती देण्यात आली आहे. एलिझाबेथ वॉरेन यांनी त्यांच्या मुलीसह हे पुस्तक लिहिले आहे. ते प्रचंड खपाचे आणि लोकप्रिय पुस्तक आहे. तरुणांसाठी हा फॉर्म्युला वरदान आहे. वय 25 वर्षे असेल तर आणि दरमहा 30-40 हजार रुपयांची कमाई होत असेल तर वयाच्या 50 व्या वर्षी तुम्हाला निवृत्ती घेता येईल. हा फॉर्म्युला इतका दमदार आहे.

हे सुद्धा वाचा

कमाईचे तीन हिस्से

श्रीमंत होण्यासाठी 50:30:20 हा फॉर्म्युला उपयोगी ठरेल असा दावा वॉरेन यांनी केला आहे. कमाईचे तीन हिस्से करायचे. त्यात तुमच्या गरजा, इच्छा आणि बचत यांचा समावेश आहे. या नियमानुसार, तुमच्या कमाईचा 50 टक्के वाटा घरभाडे, किराणा, वाहतूक आणि इतर किरकोळ गरजा पूर्ण करण्यावर खर्च होतो. तर 30 टक्के रक्कम ही हॉटेलिंग, मनोरंजन, खरेदी यावर खर्चासाठी राखीव ठेवा. तर 20 टक्के रक्कम ही भविष्यातील आर्थिक लक्ष गाठण्यासाठी हाताशी ठेवा. ही रक्कम तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरता येईल.

पगाराचे होतील असे वाटे

गृहित धरा की, दरमहा तुम्हाला 30 हजार रुपये पगार आहे. 50:30:20 या फॉर्म्युलानुसार त्याचे वाटे करु. त्यासाठी पगार 50:30:20 या प्रमाणात वाटप करावा लागेल. पगाराचे तीन हिस्से करावे लागतील. पगाराच्या आधारे 15,000, 9,000 आणि 6,000 असे वाटे होतील. 15,000 रुपये गरजा भागवण्यासाठी, 9,000 रुपये खरेदी, मनोरंजनासाठी तर 6,000 रुपये गुंतवणुकीसाठी उरतील.

असे व्हा करोडपती

या फॉर्म्युल्यानुसार गुंतवणुकीसाठी 6,000 रुपये हाती असतील. शेअर बाजारात जास्त जोखिम आहे. त्यामुळे तुम्ही योग्य म्युच्युअल फंड निवडल्यास आणि त्यात 6,000 रुपयांची SIP केल्यास तुम्हाला मोठा फायदा होईल. समजा तुमचा पगार वाढला आणि तुम्ही या एसआयपीत 20 टक्के वाढ केली तर मोठा फायदा होईल. ही गुंतवणूक तुम्ही सलग 20 वर्षे केली तर तुम्ही श्रीमंत व्हाल. कमीत कमी 12 टक्के परताव्याच्या हिशोबाने तुम्हाला एकूण 2,17,45,302 रुपये मिळतील. तर 15 टक्के परतावा मिळाल्यास ही रक्कम 3,42,68,292 रुपये इतकी होईल.

विशेष सूचना : याठिकाणी केलेली आकडेमोड ही केवळ अंदाजाआधारे केलेली आहे. योग्य परिणाम आणि अधिक परताव्यासाठी गुंतवणूकदारांनी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.