रेल्वेच्या UTS ॲपद्वारे रेल्वे तिकीट बुक करणे खूप सोपे, जाणून घ्या कसे वापरावे

UTS app च्या माध्यमातून प्रवासी अनरिजर्व्ह रेल्वे तिकिटे जनरेट किंवा रद्द करू शकतात, तसेच सीझनल तिकिटे बुक करू शकतात, पासचे रिन्यू करू शकतात आणि प्लॅटफॉर्म तिकिटे खरेदी करू शकतात.

रेल्वेच्या UTS ॲपद्वारे रेल्वे तिकीट बुक करणे खूप सोपे, जाणून घ्या कसे वापरावे
indian railwayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 11, 2025 | 7:15 PM

जेव्हा कधी काही कारणास्तव एखाद्या व्यक्तीला गावी जायचे असते किंवा कामानिमित्त बाहेर जावे लागते तेव्हा विशेषत: सणासुदीत तसेच सुट्टीच्या दिवसात रेल्वे परिसरात प्रचंड गर्दी पाहायला मिळते. तसेच या दिवसात रेल्वे स्थानकावरील तिकिटासाठी लांबच लांब रांगेत तासंतास उभे राहणे कठीण असते. भारतीय रेल्वेने या सर्व गरजा लक्षात घेता भारतीय रेल्वेचे UTS (Unreserved Ticketing System) मोबाइल ॲपच्या मदतीने तुमचा प्रवास सोपा आणि सोयीस्कर बनवू शकतो. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय अनरिजर्व्ह , प्लॅटफॉर्म आणि सीझन तिकिटे बुक करू शकता.

जे प्रवासी दररोज रेल्वेने प्रवास करतात किंवा ज्यांना अचानक प्रवास करावा लागतो त्यांच्यासाठी हे UTS ॲप विशेष फायदेशीर आहे. हे ॲप वापरण्यासाठी प्रवाशांना सर्वप्रथम प्रवाशांना त्यांचा मोबाइल नंबर आणि पासवर्डसह नोंदणी करावी लागेल. यानंतर तुम्ही या ॲपचा वापर तिकीट बुक करण्यासाठी, तिकीट उपलब्धता तपासण्यासाठी आणि ट्रेनच्या वेळा मिळवण्यासाठी करू शकता. गरज पडल्यास तिकिटही रद्द केले जाऊ शकते. यासाठी आम्ही तुम्हाला या ॲपशी संबंधित सर्व माहिती देणार आहोत. चला जाणून घेऊयात.

UTS ॲप काय आहे आणि ते कसे कार्य करते?

अनरिजर्व्ह तिकीट प्रणाली (यूटीएस) हे एक मोबाइल ॲप्लिकेशन आहे जे भारतीय रेल्वेची सहाय्यक संस्था सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स (CRIS) ने 2014 मध्ये सुरू केले. या ॲपच्या माध्यमातून प्रवासी अनरिजर्व्ह रेल्वे तिकिटे तयार किंवा रद्द करू शकतात, सीझनल तिकिटे बुक करू शकतात, पासचे नूतनीकरण करू शकतात आणि प्लॅटफॉर्म तिकिटे खरेदी करू शकतात. वारंवार प्रवास करणाऱ्या आणि अचानक कुठेतरी जाण्याची गरज भासणाऱ्या प्रवाशांसाठी हे फायदेशीर आहे. UTS ॲप Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी संबंधित ॲप स्टोअरमधून विनामूल्य डाउनलोड केले जाऊ शकते.

UTS ॲपद्वारे किती प्रकारची रेल्वे तिकिटे बुक केली जाऊ शकतात?

यूटीएस अँड्रॉइड मोबाइल तिकीट ॲपचा वापर करून प्रवासी पाच प्रकारची रेल्वे तिकिटे बुक करू शकतात.

सामान्य तिकिट बुकिंग (Normal Ticket Booking)

क्विक तिकीट बुकिंग (Quick Ticket Booking)

प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग (Platform Ticket Booking)

सीझन तिकीट बुकिंग / रिन्यूअल (Season Ticket Booking/Renewal)

क्यूआर बुकिंग (QR Booking)

UTS ॲपवर नोंदणी करण्याची प्रक्रिया

Google Play किंवा Apple iOS वर यूटीएस मोबाईल ॲप्लिकेशन सर्च करा आणि ते डाऊनलोड करा.

ॲपवर नोंदणी करण्यासाठी आपला फोन नंबर, नाव, लिंग आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.

पासवर्ड जनरेटर मिळेल. यूटीएस ॲपसाठी एक मजबूत पासवर्ड तयार करा.

आता यूटीएस मोबाइल ॲपच्या अटी आणि शर्तीमान्य करा.

रजिस्टर बटणावर क्लिक करा.

तिकीट बुक करण्यासाठी तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाका.

रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा:

सर्वप्रथम पेपरलेस किंवा पेपर तिकीट निवडा.

“Depart from” आणि “Going to” स्थानकांची निवड करा.

“Next” क्लिक करा आणि नंतर “Get Fare” क्लिक करा.

“Book ticket” बटण दाबा आणि तुमचा प्रवास शुल्क भरा.

तिकीट बुकिंगसाठी R-wallet, UPI, नेट बँकिंग किंवा कार्डचा वापर केला जाऊ शकतो.

UTS ॲपमधील “Show ticket” या पर्यायावर जाऊन तिकीट पाहता येईल.

यूटीएस ॲपवर R-wallet कसे रिचार्ज करावे?

UTS ॲपवर, R-wallet आयकॉनवर टॅप करा.

रिचार्ज वॉलेट निवडा

रिचार्ज करण्यासाठी रक्कम प्रविष्ट करा.

UPI, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट करा.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पैसे तुमच्या आर-वॉलेटमध्ये जोडले जातील.

UTS ॲप युजर्सला आर-वॉलेट चार्जवर 3% बोनस मिळेल.

UTS मोबाइल तिकीट ॲपबद्दल तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे

अनरिजर्व्ह तिकीट बुकिंग ॲप वापरणारे प्रवासी बुकिंगनंतर तीन तासांनी ट्रेनमध्ये चढू शकतात.

प्लॅटफॉर्म तिकीट बुक करण्यासाठी स्टेशनपासून 2 किलोमीटरच्या आत किंवा रेल्वे रुळापासून 15 मीटरच्या आत असणे आवश्यक आहे.

प्रवाशांना तीन, सहा किंवा बारा महिन्यांची सिझनल तिकिटे खरेदी करता येतात.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.