संपत्ती दान करण्याचे काय आहेत नियम? मालमत्ता दुस-याच्या नावे करण्याचे अधिकार समजून घ्या
वारसा हक्काने मिळालेली संपत्ती दान करण्याचे अधिकार आहेत. त्यासाठी या मालमत्तेच्या वारसदाराने अनुमती देणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर बक्षिशी म्हणून दिलेली संपत्ती परत ही घेता येते. जाणून घेऊयात याचे नियम
संपत्ती दान (Property Donation) करण्याचे अधिकार भारतीय कायद्यानुसार, प्रत्येक व्यक्तीला आहे. कोणताही नागरिक कायदेशीररित्या त्याची संपत्ती, मालमत्ता बक्षिसी देऊ शकतो अथवा दान करु शकतो. त्यासाठी काही खास नियम आहेत. ज्याचे पालन सर्वांना कायद्यान्वये करावे लागते. आता एक गोष्ट नक्की आहे की, मालमत्ता दान करण्यासाठी ती तुमच्या नावे (Property Ownership) असणे गरजेचे आहे. म्हणजे दुस-याची मालमत्ता तुम्ही परस्पर तिस-याच्या नावे करु शकत नाही. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशीच संपत्ती दान करता येते, ज्यावर कोणाचाही कब्जा नसेल, अथवा ती त्याने बळकावली नसेल. ज्याचे नावे संपत्ती (Registered Ownership) असेल, त्यानेच ती दान करने कायदेशीर ठरते. दान तेव्हाच ग्राह्य धरण्यात येते जेव्हा दान करणारी व्यक्ती मानसिक दृष्ट्या सक्षम आणि स्वस्थ असेल. भोळसर, वेडगळ व्यक्तीकडून दान करुन घेतलेली मालमत्ता वादाचे कारण ठरु शकते. अशा संपत्तीचा वाद हा थेट कोर्टात पोहचतो.
स्वतः कमाविलेली संपत्ती दान करण्याचा अधिकार
स्वतः कमाविलेली संपत्ती दान देण्याचा अधिकार आहे. जी संपत्ती दुस-याची आहे, गहाण ठेवलेली आहे. ती विक्री करण्यास मनाई आहे. त्यावर कब्जा झालेला असेल, ती कोणालाच दान करता येत नाही. वारसा हक्काने संपत्ती मिळाली असेल तर ती भेट म्हणून बक्षिसी म्हणून देता येईल. म्हणजे तुम्हाला व तुमच्या भावांना वडिलोपार्जित संपत्ती मिळाली असेल, त्याची वाटणी झाली असेल. तर संपत्तीचा जो हिस्सा तुम्हाला मिळाला आहे. तो तुम्ही दान करु शकता. तो भेट देऊ शकता, तो बक्षिसी म्हणून देऊ शकता.
वडिलोपार्जित मालमत्ता दान करण्याचा अधिकार
वडिलोपार्जित मालमत्ता दान करण्याचे अधिकार वारसदारांना आहे. कायदेशीररित्या संपत्तीचा उत्तराधिकारी असणा-या व्यक्तीला मालमत्ता दान करण्याची अनुमती आहे. एवढेच नाही तर भेट दिलेली संपत्ती व्यक्तीला परत मागण्याचा, मिळवण्याचा अधिकार सुद्धा आहे. त्यासाठी संपत्ती हस्तांतरण अधिनियम 1882 मधील 126 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. गिफ्ट डिड करतानाच यासंबंधीचा उल्लेख करावा लागतो. ज्या उद्देशांसाठी ही सपंत्ती भेट म्हणून देण्यात येत आहे, तिचा वापर जर त्यानुसार, झाला नाही तर अशी जमीन परत घेता येते. म्हणजे तुम्ही जमीन दिली अनाथालय, अनाथअश्रमासाठी आणि तिचा वापर झाला हॉटेल, बार रुम काढण्यासाठी तर जमीन परत घेण्याचा अधिकार दानकर्त्याला आहे. तसेच संपत्ती दान करताना ती संपूर्ण मालमत्ता दान करायची की, त्यातील काही भाग दान करायचा याविषयीचा सर्व अधिकार दानकर्त्याला आहे. एवढेच नव्हे तर मालमत्ता हस्तांतरीत करता येते, त्यासंबंधीचे नियम आहेत. त्याआधारे तुम्ही हस्तांतरीत मालमत्तेसाठी भाडे ही आकारु शकता.
इतर बातम्या
उन्हाळाच्या सुटीमध्ये परदेशी जाण्याचा प्लॅन कारताय? मग ‘हे’ चार क्रेडिट कार्ड वाचवू शकतात तुमचे पैसे
Skin care : उन्हाळ्यात सकाळी त्वचेची काळजी घ्या आणि तजेलदार त्वचा मिळवा!