Mutual Fund Investment : म्युच्युअल फंडमधून हवाय अधिकचा परतावा, मग याची खूणगाठ बांधा, कधीच नाही होणार तोटा!
Mutual Fund Investment : म्युच्युअल फंडमधून अधिकचा परतावा हवा असेल तर डोळे झाकून गंतवणूक टाळा. तुम्हाला योग्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने गुंतवणूक करावी लागेल. त्यासाठी काही नियम आहेत. ते पाळल्यास तुम्हाला अधिकचा परतावा सहज मिळेल.
नवी दिल्ली : जर तुम्हाला पण म्युच्युअल फंडमध्ये (Mutual Fund) गुंतवणूक करायची असेल तर डोळे झाकून गुंतवणूक केल्याने लगेच फायद्याचे गणित जुळत नाही. म्युच्युअल फंडात दीर्घकालीन गुंतवणूक (Long Term Funds) करणे कधी ही फायदेशीर ठरते. तुमच्या गुंतवणुकीवर कमीत कमी 12 टक्के परतावा मिळतोच. पण योग्य नियोजन केल्यास, योग्य फंड निवडल्यास तुम्हाला अधिकचा परतावा मिळू शकतो. गुंतवणुकीची रणनीती, अधिकची एसआयपी (SIP) करणे हे तुमच्या फायद्याचे ठरु शकते. त्यातून अधिकचा परतावा मिळू शकतो. बेस्ट म्युच्युअल फंड निवडल्यास लवकरच पैसा डबल आणि तिप्पट होऊ शकतो.
तुमच्या गरजानुसार, उद्दिष्टानुसार तुम्हाला म्युच्युअल फंड निवडणे फायदेशीर ठरते. त्यासाठी तुमचे आर्थिक उद्दिष्ट ठरवावे लागेल. म्युच्युअल फंडात कशासाठी गुंतवणूक करत आहात, ते ठरवावे लागेल. त्यानुसार, योग्य म्युच्युअल फंड निवडावा लागेल. सर्वच प्रकारचे म्युच्युअल फंड चांगले असतात. पण तुमच्या गरजेनुसार त्याची निवड केली तर गुंतवणुकीचा मोठा फायदा होतो.
तुम्ही म्युच्युअल फंडात कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी गुंतवणूक करु शकता. जितके जास्त सदस्य म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतील. तेवढा अधिक लाभ मिळेल. त्याआधारे तुम्हाला जास्त परतावा मिळेल. पण एक लक्षात ठेवा, जेवढा परतावा अधिक हवा, तेवढी जोखीम ही अधिक असेल.
तुम्हाला गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करणे आवश्यक आहे. तुम्ही रक्कम कुठे गुंतवत आहात, किती गुंतवणूक करत आहात याची रणनीती तयार ठेवावी लागेल. याला ॲसेट ॲलोकेशन असे म्हणतात. याआधारे तुम्हाला वयाच्या आधारे किती आणि कशी गुंतवणूक कराल हे ठरविता येईल. त्याआधारे तुम्हाला चांगला परतावा मिळेल.
म्युच्युअल फंड बाजारशी लिंक असतो. यामध्ये जोखीम असते. धोका ही असतो. म्युच्युअल फंडमध्ये अशा ठिकाणी गुंतवणूक करावी, जिथे जोखीम कमी असतो. तुम्ही जोखीम नको म्हणून पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF), फिक्स्ड डिपॉझिट (FD) वा रिकरिंग अकाउंट (RD) यामध्ये पण गुंतवणूक करु शकता. या ठिकाणी कसलीही रिस्क नसते. परतावा ही चांगला मिळतो.
गुंतवणूक केल्यानंतर तुमच्या गुंतवणुकीचा ठराविक कालावधीनंतर आढावा घ्या. तुमच्या फंडने काय कामगिरी केली. किती परतावा दिला. गुंतवणूक योग्य ठिकाणी झाली की नाही. फंड योग्य आहे का याचा सातत्याने आढावा घ्या. पण संयमही ठेवा. फंडने सुरुवातीलाच कमी परतावा दिला म्हणून लगेच रक्कम काढण्याची घाई करु नका. म्युच्युअल फंड तुम्हाला दरमहा स्टेटमेंट पाठावतात. त्यावर लक्ष ठेवा. NAV (नेट ॲसेट व्हॅल्यू), फंड फॅक्ट शीट, त्रैमासिक न्यूजलेटर आणि प्रेस क्लिपिंग याचा आढावा घ्या.