UAN क्रमांक विसरलात? चिंता करू नका, या सोप्या पद्धतीने करा माहिती
बऱ्याचदा आपण पीएफ खात्याची संलग्न असलेला UAN क्रमांक विसरतो. हा क्रमांक मिळविण्यासाठी तुम्ही काही सोप्या स्टेप्स वापरू शकता.
मुंबई, तुम्ही नोकरी करत असाल तर तुमचा UAN क्रमांक तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. प्रत्येक पगारदार व्यक्तीच्या पगाराचा काही भाग पीएफ खात्यात (PF Account) जमा केला जातो आणि प्रत्येक पीएफ खातेधारकाला 12-अंकी यूएएन क्रमांक मिळतो. ज्याला युनिव्हर्सल अकाउंट नंबर असेही म्हणतात. या खाते क्रमांकाद्वारे तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक तपासू शकता आणि व्याजाची माहिती सहज मिळवू शकता.
पीएफ खात्याची माहिती मिळवण्यासाठी ईपीएफओ खातेधारकांना यूएएन क्रमांक सक्रिय करावा लागेल. त्यानंतरच तुम्ही पीएफ खात्याच्या अनेक सेवांचा ऑनलाइन लाभ घेऊ शकता, परंतु UAN क्रमांक सक्रिय केल्यानंतरही लोक UAN क्रमांक विसरतात. यामुळे लोकांना नंतर खूप त्रास सहन करावा लागतो.
कर्मचाऱ्याने कितीही नोकऱ्या बदलल्या, पण त्याचा UAN नंबर नेहमी सारखाच राहतो. अशा परिस्थितीत हा क्रमांक प्रत्येक कर्मचाऱ्याकडे असायला हवा. तुमचा UAN कुठेतरी हरवला असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. घरबसल्या काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचा UAN नंबर सहज शोधू शकता.
घरबसल्या अशा प्रकारे UAN नंबर शोधा
UAN क्रमांक शोधण्यासाठी, प्रथम तुम्हाला EPFO च्या अधिकृत वेबसाइट www.epfindia.gov.in वर क्लिक करावे लागेल. आता तुम्ही होम पेजवर कर्मचाऱ्यांसाठी विभाग निवडा. त्यानंतर सेवा विभागात जाऊन सदस्य UAN/ऑनलाइन सेवा पर्याय निवडा. यानंतर तुमच्या समोर एक पेज उघडेल ज्यावर Know your UAN हा पर्याय निवडा.
यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल, ज्यामध्ये रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाका. यानंतर, वेबसाइटवर मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करा. यानंतर तुमच्या समोर एक पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, डीओबी, पीएफ सदस्य आयडी, आधार क्रमांक आणि पॅन क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर कॅप्चा भरावा लागेल. त्यानंतर Show My UAN वर क्लिक करा. यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर UAN क्रमांक पाठवला जाईल.