दरमहा इतकेच योगदान, तरीही PF खात्यात जमा होणार 3 ते 5 कोटी, काय आहे गणित तरी?

EPFO Interest Rate : केंद्र सरकार कर्मचारी भविष्य निधी खात्यासाठी वर्षाला एक व्याजदर निश्चित करते. त्याआधारे पीएफ धारकांच्या खात्यातील रक्कमेवर चक्रवाढ व्याज मिळते. सध्या या खात्यातील रक्कमेवर 8.25 टक्के व्याज मिळत आहे. या खात्यात छोटे योगदान देऊन तुम्ही कोट्यवधींची कमाई करू शकता.

दरमहा इतकेच योगदान, तरीही PF खात्यात जमा होणार 3 ते 5 कोटी, काय आहे गणित तरी?
अशी होणार कोट्यवधींची कमाई
Follow us
| Updated on: Sep 15, 2024 | 11:42 AM

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती निधी जमा करते. सोबतच ही संघटना कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन योजनेचा लाभ देते (EPFO Pension Scheme) कर्मचारी भविष्य निधी खात्यातंर्गत कर्मचारी आणि मालक यांच्याकडून एक ठराविक रक्कम पीएफ खात्यात योगदान म्हणून जमा होते. त्यावर केंद्र सरकार वार्षिक व्याज देते. त्याआधारे निवृत्तीपर्यंत कर्मचाऱ्याकडे एक मोठी रक्कम जमा होते. तुम्हाला या योजने अंतर्गत जर कोट्यवधी रुपयांची रक्कम जमा करायची असेल तर किती रक्कम योगदान म्हणून द्यावी लागेल?

सरकार किती देते व्याज?

केंद्र सरकार कर्मचारी भविष्य निधी खात्यातंर्गत वार्षिक आधारावर व्याज निश्चित करते. सध्या सरकार पीएफ खात्यातंर्गत 8.25 टक्के व्याज देते. हे व्याज प्रत्येक वर्षाला कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा करण्यात येते. पीएफ खात्यातील या रक्कमेवर कोणत्याही प्रकारचा कर द्यावा लागत नाही. कारण ही रक्कम कर मुक्त आहे.

हे सुद्धा वाचा

गरजेच्यावेळी काढा रक्कम

ईपीएफओ कर्मचारी त्यांना पैशांची गरज असेल, निकड असेल तेव्हा ही रक्कम काढू शकतो. कर्मचारी शिक्षण, लग्न, घराचे बांधकाम, आजारपण या काळात ही रक्कम काढू शकतो. नियमानुसार त्याला ही रक्कम काढण्याचे मुभा आहे. ही रक्कम काढताना त्याला तसे कारण मात्र स्पष्ट करावे लागते. छोट्या मोठ्या रक्कमेसाठी कर्ज काढण्यासाठी पीएफ खात्यातील रक्कम तुमच्या मदतीला येऊ शकते.

निवृत्तीवेळी हवी कोट्यवधींची रक्कम?

निवृत्तीवेळी 3 कोटी रुपयांची रक्कम प्राप्त करण्यासाठी कर्मचाऱ्याला वयाच्या 40 व्या वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याला पीएफ खात्यात 8,400 रुपयांचे योगदान द्यावे लागते. मॅच्युरिटीवेळी सध्याच्या 8.25 दराने तुम्हाला एकूण 3,01,94,804 रुपये मिळतील.

जर तुम्हाला निवृत्तीवेळी 4 कोटी रुपये हवे असतील तर 40 वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याला 11,200 रुपयांचे योगदान जमा करावे लागेल. सध्याच्या 8.25 दराने तुम्हाला एकूण 4,02,59,738 रुपये मिळतील.

तर निवृत्तीवेळी तुम्हाला 5 कोटी रुपये हवे असतील तर त्यासाठी वयाच्या 40 शी पर्यंत तुम्हाला या खात्यात 12 हजार रुपये प्रत्येक महिन्याला जमा करावे लागतील. सध्याच्या 8.25 दराने तुम्हाला एकूण 5,08,70,991 रुपये मिळतील.

बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.