ICICI चे आपल्या ग्राहकांना स्पेशल गिफ्ट; एफडीवरील व्याजाचे दर वाढवले, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार अतिरिक्त व्याज
आयसीआयसीआय बँकेंच्या (ICICI Bank) ग्राहकांसाठी खुशखबर आहे. बँकेकडून फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) वरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. बँकेकडून दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक व पाच कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवीवर व्याज दर वाढवण्यात आले आहेत.
आयसीआयसीआय बँकेंच्या (ICICI Bank) ग्राहकांसाठी खुशखबर आहे. बँकेकडून फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) वरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. बँकेकडून दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक व पाच कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवीवर व्याज दर वाढवण्यात आले आहेत. बँकेने व्याज दरात दहा बेसिस पॉइंटची वाढ केली आहे. बँकेचे नवे व्याज दर 14 एप्रिल 2022 पासून लागू झाले आहेत. ज्या एफडीचा (FD) कालावधी हा दहा वर्षांचा आहे, त्या एफडीवरील व्याजाच्या दरात देखील बँकेकडून वाढ करण्यात आली आहे. सोबतच एक वर्षांपासून ते 15 महिन्याच्या एफडीवर दहा बेसीस पॉईंट व्याजाची वाढ करण्यात आली असून, ज्या ग्राहकांची आयसीआयसीआय बँकेत एक वर्ष किंवा पंधरा महिने मुदतीची एफडी आहे त्यांना 4.25 टक्के दराने व्याज मिळणार आहे. पूर्वी या व्याजाचा दर हा 4.15 टक्के इतका होता.
व्याजात किती टक्के वाढ?
बँकेच्या नव्या धोरणानुसार आता ज्या ग्राहकांची बँकेत 15 ते 18 महिन्यांच्या कालावधीसाठीची एफडी आहे, त्या एफडीवर बँकेकडून 4.20 टक्क्यांऐवजी 4.30 टक्क्यांनी व्याज देण्यात येणार आहे. ज्या ग्राहकांची 18 महिने ते दोन वर्षांसाठी बँकेत एफडी आहे, त्या ग्राहकांना आता 4.30 टक्क्यांऐवजी 4.40 टक्के व्याज दराने परतावा मिळणार आहे. ज्या ग्राहकांनी बँकेत एफडीमध्ये तीन वर्षांपेक्षा अधिक कालवधीसाठी पैसे गुंतवले आहेत, त्या ग्राहकांना आता आपल्या एफडीवर 4.60 टक्के तर ज्या ग्राहकांनी दहा वर्षांसाठी मुदतठेव योजनेत पैसे गुंतवले आहेत त्यांना 4.70 टक्के वार्षिक आधारावर व्याज मिळेल.
ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याजाचा लाभ
ज्या ज्येष्ठ नागरिकांचे आयसीआयसीआय बँकेत खाते आहे, त्यांना बँकेमार्फत अतिरिक्त व्याजाचा लाभ देण्यात येत आहे. एक आठवड्यापूर्वीच बँकेने ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीवर व्याज दर वाढवण्याची घोषणा केली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या एफडीसाठी बँकेकडून स्पेशल स्किम ‘गोल्डन इयर्स’ (Golden Years) चालवण्यात येत आहे. या योजनेंतर्गंत ज्येष्ठ नागरिकांना दुसऱ्या ग्राहकांच्या तुलनेत अधिक व्याज देण्यात येते.
संबंधित बातम्या
GST स्लॅबमध्ये लवकरच मोठ्या बदलाची शक्यता; ‘अशी’ असेल नवी रचना