गुंतवणूक करायचीये? तर ‘ही’ बँक देतीये बचत खात्यावर सर्वाधिक व्याजदर, आजच खाते ओपन करा
आयडीएफसी फर्स्ट बँकेकडून (IDFC First Bank) बचत खात्यावरील व्याजदरात (Savings Account Interest Rate) बदल करण्यात आले आहेत. नवे व्याज दर एक एप्रिल 2022 पासून लागू होणार आहेत.

आयडीएफसी फर्स्ट बँकेकडून (IDFC First Bank) बचत खात्यावरील व्याजदरात (Savings Account Interest Rate) बदल करण्यात आले आहेत. नवे व्याज दर एक एप्रिल 2022 पासून लागू होणार आहेत. आपल्या ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी अनेक सरकारी आणि खासगी बँकांकडून गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या विविध योजनावरील व्याजदरात बदल करण्यात आले आहेत. जवळपास सर्वच बँकांनी आपले व्याजदर वाढवले आहेत. व्याजदर वाढवणाऱ्या बँकांमध्ये एसबीआय बँक, आयसीआयसीआय बँक (icici bank) यासारख्या बँकांचा समावेश आहे. आयडीएफसी फर्स्ट बँकेकडून देखील आपल्या बचत खातल्यावरील व्याजदर वाढवण्यात आले आहेत. हे नवे व्याजदर एक एप्रिलपासून लागू होतील. विशेष म्हणजे ग्राहकांच्या गुंतवणुकीवर प्रत्येक दिवसाच्या आधारावर व्याजदर देण्यात येणार असल्याचे बँकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. आयडीएफसी फस्ट बँकेच्या वतीने आपल्या ग्राहकांना गुंतवणुकीवर चार टक्क्यांपासून सहा टक्क्यांपर्यंत व्याजदर देण्यात येणार आहे.
किती व्याज मिळणार?
आयडीएफसी बँकेच्या हवाल्याने इकोनॉमिक टाइम्सने याबाबत वृत्त प्रसारित केले आहे. वृत्तानुसार ज्या व्यक्तींनी बँकेत 25 लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक केली त्या ग्राहकांना एक एप्रिलपासून सहा टक्के व्याजदराने पैसे देण्यात येणार आहेत. ज्या ग्राहकांनी दहा लाख ते 25 लाखांपर्यंत गुंतवणूक केली अशा ग्राहकांना पाच टक्के तर एक लाखांपासून ते दहा लाखांपर्यंत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना साडेचार टक्क्यांनी व्याज देण्यात येईल. ज्या ग्राहकांची गुंतवणूक ही एक लाखांपेक्षा कमी असेल त्या ग्राहकांना चार टक्क व्याज दर देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ग्राहकांना दिवसांच्या आधारावर व्याज दराचा लाभ मिळणार आहे.
सर्वोत्तम व्याजदर
याबाबत बोलताना बँकेच्या वतीने सागंण्यात आले की, भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयने घालून दिलेल्या नियमांच्या आधीन राहून बँकेतील सर्व व्यवहार पार पडत आहेत. आम्हाला आमच्या ग्राहकांना सांगण्यास आनंद होत आहे की, आम्ही ग्राहकांसाठी सर्वोत्तम व्याजदर घेऊन आलो आहोत. येत्या एक एप्रिलपासून ग्राहकांना त्यांच्या गुंतवणुकीवर नव्या व्याजदराप्रमाणे व्याज देण्यात येईल.
संबंधित बातम्या
‘मेस्मा’चा वार; संपकरी गप्पगार! मेस्मा म्हणजे काय रे भाऊ…
Bharat Bandh : बँकिंग क्षेत्रच नाही तर रेल्वे, टपाल, विमा क्षेत्रालाही संपाचा बसणार फटका