2000 note exchange : बरं ते पोस्टात 2000 रुपयांच्या नोटा बदलवता येतील का, पाव्हणं? नियमाचं काय आहे म्हणणं…

2000 note exchange : पोस्ट पण तर अर्धी बँकेची कामं करतं की, मग गुलाबी नोट, 2,000 रुपयांची नोट तिथं बदलविता येईल का? आरबीआयचा नियम सांगतो तरी काय, तुमच्या कामाची बातमी...

2000 note exchange : बरं ते पोस्टात 2000 रुपयांच्या नोटा बदलवता येतील का, पाव्हणं? नियमाचं काय आहे म्हणणं...
Follow us
| Updated on: May 23, 2023 | 5:39 PM

नवी दिल्ली : केंद्र सरकारने 2,000 रुपयांच्या नोटेविषयी मोठा निर्णय घेतला. यावर्षी सप्टेंबर महिन्यानंतर ही नोट चलनातून बाहेर होईल. या निर्णयाची घोषणा भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) या शुक्रवारी 19 मे रोजी केली. आजपासून 23 मेपासून 2,000 रुपयांच्या नोटा बदलविण्याची (2000 Note Exchange) प्रक्रिया सुरु झाली आहे. सर्व बँका आणि केंद्रीय बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयात या नोटा बदलविण्यात येत आहे. त्यातच काही नागरिक एक महत्वाचा प्रश्न उपस्थित करत आहेत. पोस्ट (Post Office) पण तर अर्धी बँकेची कामं करतं की, मग गुलाबी नोट, 2,000 रुपयांची नोट तिथं बदलविता येईल का? असा त्यांचा सवाल आहे. याविषयी आरबीआयचा नियम काय सांगतो, हे माहिती आहे का?

टपाल खात्यात नाही बदलविता येणार नोट रिझर्व्ह बँकेच्या प्रवक्त्याने याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, टपाल खाते, पोस्ट कार्यालये या बँका नाहीत. त्यामुळे नोटा बदलवायच्या असतील तर त्या रिझर्व्ह बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयात अथवा बँकांच्या शाखांमध्ये बदलविता येतील. तुमचे खाते असलेल्या बँकेत अथवा खाते नसले तरी या नोटा बदलविता येतील. कोणतीही बँक तुम्हाला नोटा बदलविण्यासाठी नकार देऊ शकत नाही.

नोटा जमा करता येतील पोस्टाच्या बचत खात्यात, अथवा इतर खात्यात तुम्हाला 2,000 रुपयांच्या नोटा जमा करता येतील. या नोटा चार महिने अथवा पुढील आदेश येईलपर्यंत वैध असल्याने तुम्ही त्या जमा करु शकता. तसेच पोस्ट ऑफिसमधील सेवांचा लाभ घेण्यासाठी अथवा स्टॅम्प वा इतर खरेदीसाठी या नोटांचा वापर करता येईल. तुम्ही रजिस्ट्री अथवा स्पीड पोस्टासाठी या नोटांचा वापर करु शकता. तसेच 2,000 रुपयांच्या नोटा देऊन तुम्ही मनीऑर्डर पण करु शकता.

हे सुद्धा वाचा

इतक्या बदलता येतील नोटा आरबीआयच्या गाईडलाईननुसार, जर एखादी व्यक्ती 2000 रुपयांच्या 10 नोटा म्हणजे 20,000 रुपये घेऊन बँकेत जातील. तर त्याच्याकडे कोणतीही विचारपूस न करता नोट बदलवून देण्यात येतील. एका दिवशी 20,000 रुपयांपर्यंत नोट बदलता येतील.

बँकेचे खाते नसेल तर काय करावे बँकेचे खाते नसेल तरीही तुम्हाला 2000 रुपयांच्या नोटा बदलविता येतील. त्यासाठी तुमच्याकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. एका दिवशी 20,000 रुपयांच्या नोटा बदलविता येतील.

तर लागेल पॅनकार्ड 50,000 रुपयांपेक्षा अधिकची रक्कम जमा करण्यासाठी पॅनकार्ड दाखवावे लागेल आणि त्याचा तपशील द्यावा लागेल. नियमानुसार, एका मर्यादेपेक्षा अधिकची रोख जमा केल्यास बँका शुल्क आकारतील.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.