Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

How to revise ITR | प्राप्तिकर रिटर्न्स भरण्यात झाली चूक, राजे हो दुरुस्त करता येते की, ही आहे प्रक्रिया

775684,775645,775515,775272 How to revise ITR | प्राप्तिकर रिटर्न भरण्यात चूक झाली असेल तर चिंता करण्याची गरज नाही. ही चुकीची दुरुस्ती तुम्हाला करता येते. आयटीआरमध्ये सुधारणा कशी करतात ते पाहुयात.

How to revise ITR | प्राप्तिकर रिटर्न्स भरण्यात झाली चूक, राजे हो दुरुस्त करता येते की, ही आहे प्रक्रिया
आयटीआरमधील चूक करा दुरुस्तImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 1:42 PM

How to revise ITR | प्राप्तिकर रिटर्न (Income Tax Return) भरण्याची अंतिम मुदत आता संपलेली आहे. दंडाची (Penalty) रक्कम भरून तुम्ही या महिन्यात प्राप्तिकर रिटर्न भरु शकता. सध्या 1000 रुपये दंड भरुन तुम्हाला आयटीआर (ITR)दाखल करता येतो. 2022-23 या मूल्यांकन वर्षाकरीता (Assessment Year) 5 कोटी 88 हजार 962 करदात्यांनी प्राप्तिकर रिटर्न जमा केला आहे. ज्या व्यक्तींच्या खात्यांचे ऑडिट करायचे नाही अशा करदात्यांना आर्थिक वर्ष 2021-22 साठी उत्पन्नाचे विवरणपत्र भरण्यासाठी 31 जुलै रोजी अंतिम मुदत उलटून गेली आहे. रिटर्न भरण्याच्या संपूर्ण प्रक्रिया काळजीपूर्वक करावी लागते. त्यात चूक झाल्यास तुम्हाला कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आयटीआर भरताना काही चूक झाली असल्यास ती दुरस्त करणे आवश्यक आहे. कार्यवाही टाळण्यासाठी आयटीआरमध्ये सुधारणा (revise ITR) केली पाहिजे. आयकर विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन अशी चूक सहज दुरुस्त करता येईल. ही संपूर्ण प्रक्रिया समजून घेऊयात.

अशी करा दुरुस्ती

https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या आयकर विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या ई-फाइल मेन्यूवर जाऊन दुरुस्तीच्या लिंकवर क्लिक करा ‘ऑर्डर/ इन्टिमेशन टू रिक्रेक्टिफाय’ मधून मूल्यांकन वर्ष निवडा आता ड्रॉपडाउन यादी येईल त्यानंतर Continuous वर क्लिक करा आता रिक्वेस्ट टाइप निवडा जसे की, टॅक्स क्रेडिट मिसमॅच करेक्शन किंवा रिटर्न डेटा करेक्शन गरजेचा पर्याय निवडा माहिती अद्ययावत केल्यानंतर सबमिटवर क्लिक करा यशस्वी नोंद झाल्याचा संदेश येईल अधिकृत मेल आयडीवर यासंबंधीचा मेल येईल सुधारणा करण्याची विनंती केली असेल तर त्याची स्थिती सहज दिसेल

https://www.incometax.gov.in/iec/foportal/ आयकर विभागाच्या अधिकृत स्थळाला भेट द्या माय अकाउंट मेन्यूवर जाऊन ‘व्ह्यू ई-फाइल रिटर्न्स/फॉर्म्स’ वर क्लिक करा ड्रॉपडाउन यादीमधून दुरुस्तीची स्थिती निवडा आणि सबमिटवर क्लिक करा

हे सुद्धा वाचा

आर्थिक वर्ष 2022 साठी 31 जुलैपर्यंत 5.83 कोटी आयटीआर दाखल करण्यात आले आहे. करदाते आणि करेतर लेखापरीक्षण प्रकरणात आयटीआर भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2022 होती. या मुदतीपर्यंत सुमारे 5.83 कोटी आयटीआर दाखल झाले असून, त्यातील 72.42 लाख आयटीआर हे शेवटच्या दिवशी म्हणजे केवळ 31 जुलै रोजी दाखल झाले आहेत.

1 हजार रुपयांचा दंड

आयकर कायद्याच्या कलम 234 F नुसार रिटर्न भरण्याच्या शेवटच्या तारखेनंतर आयटीआर भरल्यावर दंड म्हणून 5 हजार रुपये भरावे लागतील. मात्र, त्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा अधिक नसल्यास केवळ 1,000 रुपये दंड आकारून हे काम पूर्ण होऊ शकते. त्याचबरोबर जर एखाद्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न त्याने निवडलेल्या करप्रणालीअंतर्गत त्याचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त नसेल तर आयटीआर भरताना त्याला दंडातून सूट देण्यात येईल.

ITR होणार व्हेरिफाईड

आतापर्यंत दाखल झालेल्या आयटीआरपैकी 3 कोटीहून अधिक आयटीआर आयकर रिटर्न म्हणून व्हेरिफाय करण्यात येतील. परतावा विना व्यत्यय त्वरीत मिळण्यासाठी ही प्रक्रिया करण्यात येते. तुमचा मोबाइल क्रमांक आणि पॅन क्रमांक आधारशी लिंक असेल तर आधार आधारित वन टाइम पासवर्ड (OTP) वापरून हे काम पूर्ण करता येईल.

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.