Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Online Payment : QR कोडने व्यवहार करत असाल तर सावधान, काही ‘चुकां’ मुळे तुमचे खाते होऊ शकते रिकामे !

ऑनलाइन व्यवहारांच्या वाढत्या ट्रेंडसोबतच ‘ऑनलाइन फसवणुकी’ च्या घटनांमध्येही सातत्याने वाढ होत आहे. ‘क्यूआर कोड’ च्या माध्यमातून लोक ऑनलाइन फसवणुकीलाही बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत फसवणूक टाळण्यासाठी लोकांनी काही खबरदारी घ्यायला हवी.

Online Payment : QR कोडने व्यवहार करत असाल तर सावधान, काही ‘चुकां’ मुळे तुमचे खाते होऊ शकते रिकामे !
ऑनलाईन पेमेंट करताना काळजी घ्या.Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 8:00 AM

जगभरात ऑनलाइन व्यवहारांचा ‘ट्रेंड’ सातत्याने वाढत आहे. लोक ऑनलाइन व्यवहारांवर अवलंबून राहत आहेत. यासाठी ते अनेक ‘ई-पेमेंट’ पद्धती वापरतात. मात्र ऑनलाइन व्यवहारांचा कल वाढत असल्याने ऑनलाइन फसवणुकीच्या (Online fraud) घटनांमध्येही वाढ होत आहे. ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी ठगांनी नवीन मार्ग शोधले आहेत. अशा अनेक युक्त्या आहेत ज्याचा वापर करून हे गुंड निरपराध लोकांना आपल्या जाळ्यात अडकवतात आणि त्यांचे बँकिंग तपशील चोरतात. अलीकडेच क्यूआर कोडद्वारे (By QR code) ऑनलाइन फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अशावेळी लोकांना क्यूआर कोडद्वारे पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवले जाते. मात्र पैसे मिळण्याऐवजी क्यूआर कोड स्कॅमद्वारे लोकांच्या बँक खात्यातून (From a bank account) पैसे काढले जातात.

OLX सारख्या प्लॅटफॉर्मवर होते फसवणूक

QR कोड स्कॅमर फसवणूक करण्यासाठी OLX सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करतात. क्यूआर कोड शेअर करून ते लोकांना पैशाचे आमिष दाखवतात. लोक QR कोड स्कॅन करताच ते गुंडांच्या जाळ्यात येतात. ही फसवणूक इतकी सामान्य झाली आहे की OLX ने देखील वापरकर्त्यांना QR कोडबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. QR कोड घोटाळा कसा होतो आणि तो कसा टाळता येईल. असे काही, QR कोड घोटाळे आहेत की ऑनलाइन फसवणूक करणारे लोक कोणत्याही योजनेतून पैसे मिळविण्याचे आमिष दाखवून QR कोड पाठवतात. पण असा QR कोड स्कॅन केल्यावर बँक खात्यात पैसे येण्याऐवजी ठगांनाही युजर्सची संपूर्ण बँक डिटेल्स मिळतात आणि ते सहज खात्यातून पैसे काढून घेतात. त्यामुळे जर कोणी तुम्हाला व्हॉट्सअॅप किंवा इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून क्यूआर कोड पाठवून पैशाचे आमिष दाखवत असेल, तर जाळ्यात अडकू नका आणि क्यूआर कोड स्कॅनही करू नका.

ऑनलाइन फसवणुकीचे बळी होण्याचे कसे टाळावे?

• कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तुमचा UPI आयडी किंवा बँक खाते तपशील देऊ नका. अनोळखी व्यक्तींकडून मिळणारा QR कोड स्कॅन करू नका.

• बॅंकीग व्यवहाराबाबत आलेले OTP कुणालाही शेअर करू नका कारण तो गोपनीय आहे आणि तुमचे लॉगिन प्रमाणित करतो.

• जेव्हा तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत ऑनलाइन व्यवहार करता किंवा पैसे पाठवता किंवा प्राप्त करता तेव्हा एकदा त्या अनोळखी व्यक्तीची सत्यता तपासा. तुम्ही OLX इ. वर काही विकत असाल, तर प्लॅटफॉर्मवर खरेदीदाराची सामील होण्याची तारीख तपासा. याशिवाय त्याचा प्रोफाईल फोटो, नाव, फोन नंबर आदी माहितीही पाहता येईल. जर एखाद्या युजर्सने पूर्वी त्या खरेदीदाराच्या खात्याची तक्रार केली असेल, तर OLX संबंधित माहिती दर्शवेल.

• तुमचे सर्व UPI आयडी एका कोडने सुरक्षित करा. BHIM, Google Pay, PhonePe सारख्या सर्व UPI पेमेंट प्रदाते युजर्संना सुरक्षा पिनद्वारे UPI सुरक्षित ठेवण्याचा पर्याय देतात. जेव्हा जेव्हा युजर्स हे अॅप्स उघडतात तेव्हा सर्वप्रथम हा सुरक्षा कोड टाकावा लागतो. यामुळे यूजर्सचा UPI बर्‍याच प्रमाणात सुरक्षित होतो.

• अनोळखी व्यक्तींसोबतच रोखीचे व्यवहार करण्याचा प्रयत्न करा. दरम्यान, जर तुम्ही सर्व सावधगिरी बाळगून कॅशलेस व्यवहार केले तरच ते चांगले मानले जातात.

Poco F4 GT : स्मार्टफोन 26 एप्रिलला होणार लॉंच, 120W फास्ट चार्जिंग आणि 64MP कॅमेरा.. जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये !

‘ड्रीम होम’ स्वप्नचं ठरणार? परवडणाऱ्या घराच्या किंमती गगनाला, कर्ज महागलं

QR Code Scam : तुम्हीही QR कोडने व्यवहार करत असाल तर सावधान… या ‘चुकां’ मुळे तुमचे खाते होऊ शकते रिकामे !

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी.
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत.
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्.
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका.
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या..
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती.
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?.