Pension Scheme : मोदी सरकारची बेस्ट स्कीम! पेन्शन हवी तर करा गुंतवणूक

Pension Scheme : निवृत्ती काळात ही योजना येईल कामी, करा अशी गुंतवणूक

Pension Scheme : मोदी सरकारची बेस्ट स्कीम! पेन्शन हवी तर करा गुंतवणूक
योजनाच भारी
Follow us
| Updated on: Jan 24, 2023 | 10:56 AM

नवी दिल्ली : सध्या निवृत्तीसंबंधीच्या अनेक योजना (Pension Scheme) बाजारात उपलब्ध आहेत. एलआयसी, पोस्ट ऑफिस आणि इतर अनेक बँका, कंपन्या निवृत्ती योजना चालवितात. प्रत्येक योजनेचा वेगवेगळा फायदा आहे. केंद्र सरकारच्यावतीने (Central Government) ही अनेक पेन्शन योजना चालविल्या जातात. प्रत्येक योजनेत वयाचे, उत्पन्नाच्या अटी आणि निकष ठरविण्यात आले आहेत. आयुष्याची संध्याकाळ जोडीदारसोबत निवांत घालविण्यासाठी ही गुंतवणूक (Investment) कामी येते. निवृत्ती योजनेत तुम्हाला दरमहा, तिमाही, सहामाही आणि वार्षिक अशा स्वरुपात परतावा घेता येतो. त्यानुसार रक्कम वाटून दिल्या जाते. आता जेवढी जास्त गुंतवणूक कराल, तेवढी पेन्शन जास्त मिळते.

या योजनेमध्ये केंद्र सरकारने सुरु केलेली अटल पेन्शन योजनेचा (Atal Pension Scheme) समावेश असतो. कष्टकरी आणि मजूर वर्गासाठी ही योजना फायदेशीर आहे. दरमहा त्यांच्या खात्यातून एक ठराविक रक्कम निवृत्ती योजनेसाठी वळती होते. ही योजना निवृत्तीसाठी स्वेच्छेने बचत करण्यास प्रोत्साहन देते. भविष्यात खर्च भागविण्यासाठी या योजनेत रक्कम जमा करता येते.

अटल पेन्शन योजना ही एक सामाजाकी सुरक्षा योजना आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी या योजनेत एक छोटी रक्कम कपात होते. योगदान राशी दरमहा जमा करण्यात येते. या योजनेमुळे भविष्य सुरक्षिततेची हमी मिळते. उतारवयात खर्चासाठी एक ठराविक रक्कम मिळते.

हे सुद्धा वाचा

अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यानंतर 60 व्या वर्षानंतर ग्राहकाला मासिक पेन्शनचा लाभ मिळतो. ही पेन्शन रक्कम 1,000 रुपये ते 5,000 रुपये प्रति महिना या दरम्यान असते. तुम्ही जेवढी रक्कम आता गुंतवणूक कराल, तेवढी पेन्शन जास्त मिळते. तुम्ही पेन्शनमधील गुंतवणूक भविष्यात वाढवूही शकता. त्यासाठी अर्ज करावा लागतो.

या योजनेतील अर्जदाराचे अचानक निधन झाले तर वारसदाराला पेन्शनच्या रक्कमेवर दावा दाखल करता येतो. या योजनेत केंद्र सरकार त्यांचे योगदान ही देते. करदाते नसलेल्या आणि आणि कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेत सहभागी नसलेल्या लाभार्थ्यांना हे योगदान देण्यात येते.

कोणत्याही भारतीय नागरिकाला या योजनेत सहभागी होता येते. लाभार्थ्याचे वय 18-40 या दरम्यान असावे. या योजनेत आता गुंतवणूक केली तर निवृत्तीनंतर लाभार्थ्याला पेन्शनचा लाभ मिळतो. या योजनेत सहभागी होण्यासाठी बँकेत खाते असणे अनिवार्य आहे. तसेच तुमचे केवायसी अपडेट असणे आवश्यक आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.