वैयक्तिक कर्ज घ्यायचेय, मग जाणून घ्या कुठल्या बँकेचा किती व्याजदर आहे ते

बर्‍याच बँकांनी कोट्यवधी रुपयांचे वैयक्तिक कर्ज दिले आहे. अजूनही अशा प्रकारचे कर्ज देणे सुरु आहे. अनेक बँकांनी वैयक्तिक कर्जाचे दर कमी केले आहेत. (If you want to take a personal loan, then find out which bank has the highest interest rate)

वैयक्तिक कर्ज घ्यायचेय, मग जाणून घ्या कुठल्या बँकेचा किती व्याजदर आहे ते
कंपनी किंवा नातेवाईकांकडून घेतलेल्या कर्जावर कर लागतो का?
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 9:06 PM

मुंबई : कोरोना काळात लोकांना पैशाची खूप गरज लागली आहे. नोकरी गेली, धंदे बुडाले अशा संकटात लोकांच्या हाती पैसा शिल्लक राहिला नाही. त्यामुळे लोक आपली बचत वापरू लागले, बचत संपल्यानंतर त्यांनी दागदागिन्यांची विक्री केली. त्यानंतर आता त्यांना पुन्हा वैयक्तिक कर्ज घ्यावे लागत आहे. त्याचवेळी सरकार आणि आरबीआयने बँकांना देशातील सामान्य व गरजू लोकांना वैयक्तिक कर्ज देण्यास प्रोत्साहित केले आहे. जेणेकरुन लोकांची क्रयशक्ती वाढू शकेल तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकेल. सरकारच्या धोरणाला अनुसरून बँक स्वस्तात पर्सनल लोन अर्थात वैयक्तिक कर्जे देऊ लागल्या आहेत. (If you want to take a personal loan, then find out which bank has the highest interest rate)

बर्‍याच बँकांनी कोट्यवधी रुपयांचे वैयक्तिक कर्ज दिले आहे. अजूनही अशा प्रकारचे कर्ज देणे सुरु आहे. अनेक बँकांनी वैयक्तिक कर्जाचे दर कमी केले आहेत. म्हणजेच कमीत कमी व्याज दरावर वैयक्तिक कर्ज दिले जात आहे. सर्वात कमी व्याज दराने कर्ज देणाऱ्या बँकामध्ये सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील बँकांचा समावेश आहे.

एसबीआय आणि एचएसबीसी बँक

स्टेट बँक ऑफ इंडिया 20 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर 9.60 ते 13.85% वार्षिक व्याज आकारत आहे. दुसरीकडे एचएसबीसी बँक 30 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जासाठी वार्षिक 9.75 ते 15 टक्क्यांपर्यंत व्याज आकारत आहे.

सिटी बँक आणि बँक ऑफ बडोदा

सिटी बँक वैयक्तिक कर्जावर 9.99 टक्क्यांपासून 16.49 टक्क्यांपर्यंत व्याज आकारत आहे. या दराने बँकांकडून 50000 ते 30 लाख रुपयांपर्यंतची कर्जे घेतली जाऊ शकतात. बँक ऑफ बडोदाबद्दल बोलायचे झाल्यास ही आघाडीची बँक 10 ते 15.60 टक्के वार्षिक व्याजदराने 10 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज देत आहे.

फेडरल बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक

फेडरल बँक 25 लाखांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर वार्षिक 10.49 ते 17.99 टक्के व्याज दर आकारत आहे. दुसरीकडे आयडीएफसी फर्स्ट बँक 40 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर किमान 10.49 टक्क्यांपासून वार्षिक व्याज आकारत आहे. बँकेच्या व्याजदराच्या कमाल मर्यादेविषयी माहिती उपलब्ध नाही.

एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक

एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी खासगी बँक आहे. ही बँक 50000 ते 40 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर 10.50 टक्क्यांपासून 21 टक्क्यांपर्यंत वार्षिक व्याज आकारते. तर देशातील दुसर्‍या क्रमांकाची खासगी बँक असलेली आयसीआयसीआय बँक 25 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर 10.50 टक्के ते 19 टक्क्यांपर्यंत व्याज दर आकारत आहे.

कोटक महिंद्रा बँक आणि टाटा कॅपिटलमध्ये अधिक व्याज

खाजगी क्षेत्रातील इतर बँकांचा विचार करता कोटक महिंद्रा बँक आणि टाटा कॅपिटलकडून वैयक्तिक कर्जावर जास्त व्याज आकारणी केली जाते. कोटक महिंद्रा बँक 50000 ते 20 लाखांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर 10.75 टक्क्यांपासून 24 टक्क्यांपर्यंत व्याज आकारत आहे. त्याचबरोबर एनबीएसएफसी टाटा कॅपिटलच्या वैयक्तिक कर्जावरील व्याज दर 10.99 टक्क्यांपासून सुरू होत आहे.

अ‍ॅक्सिस बँक आणि बजाज फिनसर्व्हचे व्याज दर

अ‍ॅक्सिस बँक 15 लाखांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर वार्षिक 12 ते 21 टक्क्यांपर्यंत व्याज आकारत आहे. तसेच बजाज फिनसर्व्ह 25 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर वार्षिक 13 टक्के व्याज दर आकारत आहे. (If you want to take a personal loan, then find out which bank has the highest interest rate)

इतर बातम्या

कव्वालीच्या कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पैशांची उधळण, आयोजकांवर गुन्हा, फार्म हाऊसही सील

आधी सोशल मीडियावर ओळख, नंतर वारंवार लैंगिक अत्याचार, वाद झाल्यामुळे अपहरणाचा व्हिडीओ केला व्हायरल, नागपूर हादरलं !

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...