Aadhaar-PAN Link : तुमचे पॅन आधारला लिंक आहे का? नसल्यास जाणून घ्या काय नुकसान होऊ शकते

आधारला पॅन कार्ड लिंक करण्याची (Aadhaar pan link deadline) शेवटची तारीख 31 मार्च आहे. यापूर्वी देखील आधार आणि पॅन कार्डच्या लिंकीगसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे आता पुन्हा मुदतवाढ मिळेल या आशेवर न बसता लवकरात लवकर आपले आधार (Aadhaar) पॅनकार्डला लिंक करून घ्या.

Aadhaar-PAN Link : तुमचे पॅन आधारला लिंक आहे का? नसल्यास जाणून घ्या काय नुकसान होऊ शकते
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 5:40 AM

Aadhaar-PAN Link : आधारला पॅन कार्ड लिंक करण्याची (Aadhaar pan link deadline) शेवटची तारीख 31 मार्च आहे. यापूर्वी देखील आधार आणि पॅन कार्डच्या लिंकीगसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे आता पुन्हा मुदत वाढ मिळेल या आशेवर न बसता लवकरात लवकर आपले आधार (Aadhaar) पॅनकार्डला लिंक करून घ्या. अन्यथा तुम्हाला मोठा आर्थिक फटका (Financial loss) बसू शकतो. इनकम टॅक्स कायद्याच्या कलम 139 अ अनुसार ज्या व्यक्तीकडे आधार आणि पॅन कार्ड आहे त्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या आधार कार्डला 31 मार्चच्या आत पॅन कार्ड जोडणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारला जोडले नाही तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना कारावा लागू शकतो, तुमच्या आर्थिक व्यवहारांवर मर्यादा येतील. तुमचे पॅनकार्ड रद्द होऊ शकते, तसेच तुम्हाला दंड देखील भरावा लागू शकतो.

आधार, पॅन लिंक न करण्याचे तोटे

31 मार्चनंतरही जर तुम्ही आधारला पॅन जोडले नसेल तर तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. जोपर्यंत तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार कार्डला जोडत नाहीत तोपर्यंत तुमच्या पॅन कार्डचा कुठेही उपयोग होणार नाही. आधारला पॅन कार्ड जोडले नसल्यामुळे तुमचे टीडीएस, टीसीएसच्यावेळी अधिक पैसे कापले जातील. या सोबतच तुम्ही बँकेत पन्नास हजारांपेक्षा अधिक रुपयांची एफडी करू शकणार नाहीत, बँकेत पन्नास हजारांपेक्षा अधिक रक्कम देखील जमा करू शकणार नाहीत. नवे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड घेऊ शकनार नाहीत. म्युच्युअफ फंड किंवा शेअर मार्केटमध्ये देखील गुंतवणूक करू शकरणार नाहीत. यासोबतच तुम्हाला तुमचे चलन जर विदेशी करन्सीसोबत बदलायचे असेल तरी देखील तुम्हाला अडचणी येऊ शकतात, त्यामुळे आजच आपले आधार कार्ड पॅनला लिंक करून घ्या.

कोणाला आधार पॅन लिंकिंगची गरज नाही?

1) ज्यांच्याकडे आधार नंबर किंवा एनरोलमेंट आयडी नाही अशा व्यक्तींना 2) आसाम, जम्मू काश्मीर आणि मेघालयामधील नागरिकांना 3)इनकम टॅक्स कायदा 1961 नुसार जे भारतीय नागरिक नाहीत अशा लोकांना 4) 80 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना

संबंधित बातम्या

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या श्रीलंकेला भारताकडून मदतीचा हात, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा श्रीलंका दौरा

एफएमसीजी कंपन्यांना युद्धाचा फटका; महागाई उच्चस्थरावर, विक्रीचे प्रमाण घटले

इंधन दरवाढीनंतर आता ‘टोलधाड’; सर्वसामान्यांच्या खिशावर आर्थिक भार!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.