Credit Debit Card : डेबिट, क्रेडिट कार्डचा वापर बदलणार, RBI चा नवीन नियम काय

Credit Debit Card : भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच डेबिट, क्रेडिट कार्डच्या नियमांबाबत बदल करु शकते. त्यासाठी नागरिकांकडून सूचना आणि मतं मागविण्यात आली आहेत. काय आहेत हे बदल..

Credit Debit Card : डेबिट, क्रेडिट कार्डचा वापर बदलणार, RBI चा नवीन नियम काय
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 4:35 PM

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) बुधवारी क्रेडिट आणि डेबिट कार्डसंबंधी नियमांत मोठा बदल केला आहे. एका सर्कुलरद्वारे ही माहिती बँकेने दिली आहे. त्यानुसार, क्रेडिट आणि डेबिट कार्ड (Credit Debit Card ) वापरासंबंधी नियम अद्ययावत, अपडेट करण्यात आले आहे. नागरिकांना बँकिंग क्षेत्रात चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आरबीआय प्रयत्नरत असते. आता पेमेंटच्या पद्धतीत अनेक बदल झाले आहेत. युपीआयच्या माध्यमातून पेमेंट होत आहे. डेबिट कार्डचा वापर कमी झाला आहे. तर क्रेडिट पेक्षा इतर कुठे क्रेडिट कार्डचा वापर वाढेल का यासाठी बँका शक्कल लढवत आहेत. दरम्यान आरबीआयने दोन्ही कार्डसंबंधीच्या नियमात बदल (Rule Change) केला. त्याचे हे परिणाम होतील..

काय झाला बदल आरबीआयने सर्कुलर द्वारे याविषयीची अपडेट कळवली. त्यानुसार, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचा वापर आता सर्वच नेटवर्कवर करता येऊ शकतो. आरबीआयने त्यासाठी नागरिकांची मते मागवली आहे.

आरबीआयने का घेतला निर्णय कार्डद्वारे तुम्ही कोणत्याही मर्चंटला पेमेंट करु शकता. कार्ड नेटवर्कमुळे दुकानदार आणि कार्डधारक यांच्यातील व्यवहार प्रक्रिया सोपी होते. कार्ड नेटवर्क एक इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करते. त्यासाठी कार्ड नेटवर्क शुल्क आकारते.

हे सुद्धा वाचा

किती प्रकारचे कार्ड कार्ड नेटवर्क कंपनींमुळे ही सुविधा मिळते. चार मुख्य क्रेडिट कार्ड नेटवर्क आहेत. मास्टर कार्ड, व्हिसा, अमेरिकन एक्सप्रेस आणि डिस्कवर ही ती नेटवर्कस आहेत. यापैकी दोन कंपन्या कार्ड देतात. या कंपन्या एमेक्स आणि डिस्कवर आहेत.

कार्डमध्ये फरक तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करता, तेव्हा कार्ड नेटवर्क द्वारे हे सुनिश्चित करण्यात येते की, क्रेडिट कार्डद्वारे कुठे पेमेंट करण्यात येत आहे. जर तुम्ही दोन वेगवेगळी क्रेडिट कार्डवरील सुविधा पाहिल्या तर तुम्हाला लक्षात येईल की, एका कार्डवर जी सुविधा आहे, ती दुसऱ्या कार्डवर मिळत नाही.

कार्ड पेमेंटमध्ये अडचण प्रत्येक दुकानदाराला सर्वच कार्डचे पेमेंट स्वीकारता येत नाही. म्हणजे काही ठिकाणी व्हिसा कार्ड चालते, तर त्याच ठिकाणी मास्टर कार्ड स्वीकारल्या जात नाही. मास्टर कार्ड काम करते तर व्हिसा कार्ड काम करत नाही. त्यामुळेच केंद्रीय बँक क्रेडिट कार्ड पेमेंट संबंधीचा नियम आणत आहे. त्यामुळे ही अडचण आपोआप दूर होईल.

रुपे कार्डला प्रोत्साहन क्रेडिट कार्ड अथवा डेबिट कार्डनुसार, नियमांत बदल करण्यात येईल. त्याचा मोठा फायदा रुपे कार्ड धारकांना होईल. देशात रुपे कार्डला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक योग्य पावले टाकत आहे. अमेरिकन व्हिसा अथवा मास्टर कार्ड वर सर्वच प्रकारच्या सुविधा मिळतात. पण या कार्ड नेटवर्कवर रुपे कार्डची एंट्री होत नाही.

Non Stop LIVE Update
माऊली सरकारचे वारकरी महिलांकडून आभार, 'लाडकी बहीण' बद्दल म्हणाल्या...
माऊली सरकारचे वारकरी महिलांकडून आभार, 'लाडकी बहीण' बद्दल म्हणाल्या....
'लाडकी बहीण योजने'त मोठा बदल, मुदतवाढीसह कोणत्या कागदपत्रांत सूट?
'लाडकी बहीण योजने'त मोठा बदल, मुदतवाढीसह कोणत्या कागदपत्रांत सूट?.
एका घरात किती महिलाना मिळणार 'लाडकी बहीण'चा लाभ? फडणवीसांची माहिती काय
एका घरात किती महिलाना मिळणार 'लाडकी बहीण'चा लाभ? फडणवीसांची माहिती काय.
पोर्टल अपडेट नाही,नोटिफिकेशन नाही, 'लाडकी बहीण योजने'चा ऑनलाईन बोजवारा
पोर्टल अपडेट नाही,नोटिफिकेशन नाही, 'लाडकी बहीण योजने'चा ऑनलाईन बोजवारा.
Ladki Bahin :आमच सरकार येताच महिलांना 8500 रूपये देणार, कोणाच वक्तव्य?
Ladki Bahin :आमच सरकार येताच महिलांना 8500 रूपये देणार, कोणाच वक्तव्य?.
लाडकी बहीणचा लाभ मुस्लिम धर्मातील 'त्या' महिलाना देऊ नका; कुणाची मागणी
लाडकी बहीणचा लाभ मुस्लिम धर्मातील 'त्या' महिलाना देऊ नका; कुणाची मागणी.
महिलांनो... आता या ॲपवरून घरबसल्या करता येणार लाडकी बहीण योजनेचा अर्ज
महिलांनो... आता या ॲपवरून घरबसल्या करता येणार लाडकी बहीण योजनेचा अर्ज.
Hathras : निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?
Hathras : निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?.
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो.
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण.