Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या राष्ट्रीय बॅंकेची डीपॉझिट स्कीम भारी, एकदा पैसे गुंतवले की दर महीना घर बसल्या कमाई

अ‍ॅन्यूटी डिपॉझिट स्कीमवर तुम्हाला सेव्हींग अकाऊंट पेक्षा जास्त व्याज दिले जाते. या योजनेत एफडी डीपॉझिटवर जेवढे व्याज दिले जाते तेवढेच व्याज या डीपॉझिट स्कीमवर दिले जाते.

या राष्ट्रीय बॅंकेची डीपॉझिट स्कीम भारी, एकदा पैसे गुंतवले की दर महीना घर बसल्या कमाई
currency note Image Credit source: istockphoto
Follow us
| Updated on: May 07, 2023 | 7:12 PM

मुंबई : देशातील सर्वात मोठ्या बॅंकेपैकी एक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडीयाच्या ( SBI )  विविध योजनेत नागरिक आपला जमापुंजी गुंतवित असतात. स्टेट बॅंक ऑफ इंडीया हीला सर्वात विश्वासार्ह बॅंक मानले जाते. जर तुम्हा तुमचा पैसा सुरक्षितपणे गुंतवायचा असेल आणि चांगला रिर्टन मिळवायचा असेल एक चांगली योजना आहे. या योजनेचे नाव अ‍ॅन्यूटी डिपॉझिट स्कीम ( annuity deposit scheme ) असे आहे. यात एकदा पैसे लावल्यावर तुम्हाला रेग्यूलर फिक्स्ड इन्कम मिळत राहतो. तर पाहू या काय आहे योजना

एसबीआयच्या या योजनेत तुम्हाला एक ठराविक एक रकमी पैसा गुंतवावा लागतो. त्यानंतर दर महिन्याला व्याजासह गॅरंटेड कमाई व्हायला सुरूवात होते. एसबीआयची अ‍ॅन्यूटी डिपॉझिट स्कीम ग्राहकांना दर महिन्याला प्रिन्सिपल अमाऊंटबरोबर व्याज मिळते. खात्यात जमा केलेल्या रकमेवर व्याज चक्रवाढीची गणना दर तिमाहीत केली जाते.

किती पैसे जमा करता येतात

एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनूसार अ‍ॅन्यूटी डिपॉझिट स्कीमवर तुम्हाला सेव्हींग अकाऊंट पेक्षा जास्त व्याज दिले जाते. या योजनेत एफडी डीपॉझिटवर जेवढे व्याज दिले जाते तेवढेच व्याज या डीपॉझिट स्कीमवर दिले जाते. यात कमाल किती पैसे गुंतवावे असे बंधन नाही. किमान डिपॉझिट कमी कमी एक हजार रुपये मंथली अ‍ॅन्यूटीच्या हिशेबाने गुंतवावे लागतात. यात बॅंकेतर्फे युनिव्हर्सल पासबुक जारी केले जाते. या योजनेनूसार 36, 60, 84 किंवा 120 महिन्यांसाठी पैसे गुंतवता येतात.

ओव्हरड्रॉफ्टची सुविधाही मिळते

या योजनेत अ‍ॅन्यूटीची परतावा डीपॉझिट केल्यानंतरच्या पुढच्या निर्धारित तारखेला होतो. अन्यथा पुढील महिन्याच्या एक तारखेला होतो. टीडीएस कापल्यानंतर आणि लिंक केलेल्या बचत खात्यात किंवा चालू खात्यात जमा केल्यानंतर अ‍ॅन्यूटीचा परतावा दिला जाईल. एसबीआयची ही योजना आपत्कालीन परिस्थितीत तुमच्या गरजांची पूर्ण काळजी घेऊन तयार केली आहे. तुम्ही अ‍ॅन्यूटीच्या शिल्लक रकमेच्या 75% पर्यंत ओव्हरड्राफ्ट करू शकता.

अ‍ॅन्यूटी योजनेत गुंतवणूक कशी करावी ?

तुम्हाला SBI च्या अ‍ॅन्यूटी डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही कोणत्याही जवळच्या शाखेत जाऊन नोंदणी करू शकता. ही योजना SBI च्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे. योजनेचे खाते बँकेच्या एका शाखेतून दुसऱ्या शाखेतही ट्रान्सफर केली  जाऊ शकते. यामध्ये वैयक्तिक नॉमिनेशन सुविधा उपलब्ध आहे. हे खाते एकल किंवा संयुक्त असू शकते. ठेवीदाराचा मृत्यू झाल्यास ही योजना मुदतीपूर्वी बंद केली जाऊ शकते.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.