Post Office FD : पोस्टाची ही योजनाच भारी, पाच वर्षांत जोरदार परताव्याची हमी

Post Office FD : पोस्ट कार्यालयाच्या या योजनेत बँकेच्या मुदत ठेवीपेक्षाही अधिकचे व्याज मिळेतच पण चांगला परतावा ही मिळतो. तसेच या गुंतवणुकीवर केंद्र सरकार हमी पण घेते.

Post Office FD : पोस्टाची ही योजनाच भारी, पाच वर्षांत जोरदार परताव्याची हमी
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 8:50 PM

नवी दिल्ली : अनेक जण बँकेतील बचत खात्यात रक्कम जमा करतात. पण त्यावर जास्तीचा फायदा मिळत नाही. कारण व्याजदर कमी असतो. पण गुंतवणुकीचा मंत्र अंमलात आणल्यास, तुम्हाला मोठा फायदा होईल. कारण मुदत ठेवीवर चांगला परतावा मिळतो. त्यातच बँकेतील गुंतवणुकीपेक्षा (Bank FD) पोस्टातील मुदत ठेवीवर चांगला रिटर्न मिळतो. पोस्टाच्या योजनांवर (Post Investment Scheme) सर्वसामान्य गुंतवणूकदार आजही विश्वास ठेवतात. तसेच या गुंतवणुकीवर केंद्र सरकार हमी पण घेते.

बँकेच्या एफडीपेक्षा पोस्ट खात्यातील बचत योजनांवर जोरदार परतावा मिळतो. अनेक राष्ट्रीय आणि मोठ्या खासगी बँका बचत योजनांवर फार जास्त व्याज देत नाही. त्याचा फटका ग्राहकांना बसतो. त्यांना बचत योजनांमध्ये मनासारखा, बाजार भावाप्रमाणे परतावा मिळत नाही. त्यामुळे ग्राहक चांगला परतावा देणाऱ्या पर्यायांच्या शोधात असतो. आता काही बँकांनी मुदत ठेवीवरील व्याजदर वाढवले आहे.

पोस्ट खात्यातील काही योजनांवर केंद्र सरकारने तीन महिन्यांसाठी व्याजदरात वाढ केली आहे. त्याचा गुंतवणूक करताना मोठा फायदा मिळतो. सध्या पोस्ट खात्याच्या विविध बचत योजनांमधील व्याजदर जवळपास सर्वच बँकांपेक्षा जास्त आहे. गुंतवणूक करताना या योजनांचा विचार करता येऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

मुदत ठेव योजना पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम ही सर्वात लोकप्रिय योजना आहे. पोस्टाच्या अल्पबचत योजनांपैकी ही एक योजना आहे. या योजनेत पाच वर्षांपर्यंत बचत करता येते. या पाच वर्षांच्या मुदत ठेवीवर ग्राहकांना आता 7.5 टक्के व्याज मिळते. 1 एप्रिल 2023 पासून हे व्याजदर लागू करण्यात आले आहे. ही योजना तुम्ही पुढे पाच वर्षांसाठी वाढवू शकता. त्यामुळे दीर्घ कालावधीच्या गुंतवणुकीवर जोरदार परतावा मिळतो.

इतका जबरदस्त परतावा जर तुम्ही पोस्टाच्या मुदत ठेवीत 10 लाख रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीवर तुम्हाला 14,49,948 रुपये मिळतील. यामध्ये 4,49,948 रुपये व्याजाची रक्कम असेल. म्हणजे पाच वर्षांतच तुम्हाला व्याजापोटी 4.5 लाख रुपये मिळतील.

पोस्टाने ज्येष्ठ नागरिकांसाठी पण बचत योजना सुरु केली आहे. यामध्ये सीनिअर सिटीजन सेव्हिंग स्कीम ही योजना लोकप्रिय आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणूक करता येते. ही योजना तुमच्या बचतीवर 8 टक्के व्याज देते. या योजनेतील गुंतवणुकीवर कसलीही जोखीम नसते.

पोस्ट ऑफिस बचत योजनेतंर्गत विविध पर्याय उपलब्ध आहेत. बचत ठेव, आवर्ती ठेव, मुदत ठेव, मासिक योजना, बचत प्रमाणपत्रे इत्यादी. गुंतवणूकदार त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार या पर्यायांमधून निवड करू शकतात. आता तर गुंतवणूकदारांना ऑनलाईनही अर्ज करता येतो. पोस्ट ऑफिस बचत खाते रोखीनेच उघडता येते. ग्राहकांसाठी आता धनादेश आणि एटीएमची सुविधाही देण्यात येते. हे खाते एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये हस्तांतरीत करता येते. बचत खात्यावर व्याजही मिळते.

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.