Small Saving Scheme : दर महिन्याला हवे लाखभर रुपये, मग ही योजना आहे ना

Small Saving Scheme : ही योजना गुंतवणूकदारांना मोठी कमाई करुन देईल. महिन्याला लाखभर रुपये मिळविता येतील. कोणती आहे ही योजना, कोणाला करता येईल गुंतवणूक

Small Saving Scheme : दर महिन्याला हवे लाखभर रुपये, मग ही योजना आहे ना
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 9:16 PM

नवी दिल्ली : ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizen) अनेक योजना आहेत. आयुष्याची संध्याकाळ आरामात घालविण्यासाठी त्यांनी आताच काही बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. ही गुंतवणूक भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. आताच चांगली गुंतवणूक केली तर महिन्याला लाखभर सहज कमविता येतील. या योजनेवर केंद्र सरकार चांगले व्याज देते. केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) सुरु केलेली आहे. या योजनेत 60 वर्ष आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही बचत योजना आणली आहे. या योजनेतील गुंतवणुकीला केंद्र सरकारचे (Central Government) संरक्षण आहे. या योजनेत इतर बचत योजनांपेक्षा अधिकचे व्याजदर मिळते.

सुरक्षित गुंतवणूक SCSS ही ज्येष्ठ नागरिकांसाठी एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे. ही योजना तुम्हाला दरमहिन्याला एक नियमीत रक्कम देते. निवृत्तीच्या काळात ही रक्कम त्यांच्या गरजा पूर्ण करु शकते. 2023-24 च्या केंद्रीय बजेटमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ज्येष्ठ नागरिक बचत योजनामध्ये गुंतवणूक मर्यादा 15 लाखांहून 30 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. याशिवाय केंद्र सरकारने एप्रिल 2023 मध्ये संपणाऱ्या तिमाहीत अल्पबचत योजनांचे व्याजदरात 70 आधार अंकांची वाढ करण्यात आली आहे.

किती करु शकता गुंतवणूक तुम्ही या बचत योजनेत कमीतकमी 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 10 पटीत गुंतवणूक करु शकता. कोणतीही व्यक्ती व्यक्तिगत अथवा त्याच्या पत्नीसोबत संयुक्त खाते उघडू शकतात. खाते उघडण्याच्या तारखेपासून पाच वर्षांत खाते बंद करता येते. तसेच हे खाते पुढील तीन वर्षांसाठी वाढविण्यात येते. मासिक कमाई करण्यासाठी एका ज्येष्ठ नागरिक संयुक्त खाते बँक अथवा पोस्ट कार्यालयात 60 लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करता येते.

हे सुद्धा वाचा

केवायसी पूर्ण करा सार्वजनिक भविष्य निधी (PPF), सुकन्या समृद्धी योजना (SSY), पोस्ट ऑफिसची बचत योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) यासारख्या अल्पबचत योजना देशात लोकप्रिय आहेत. केंद्रीय अर्थमंत्रालयाने अल्पबचत योजनांसाठी एक नियम लागू केला आहे. त्यानुसार, आता या योजनांमधील गुंतवणूकदारांना केवायसी ( KYC ) पूर्ण करणे अनिवार्य आहे. या योजनांमध्ये आता आधार कार्ड आणि पॅनकार्ड लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार आता अल्पबचत योजनांमध्ये आधार कार्ड क्रमांक द्यावा लागेल. तर एका निश्चित मर्यादेसाठी गुंतवणूकदारांना पॅन कार्ड जोडणे (Aadhaar PAN Link) आवश्यक आहे.

किती मिळेल व्याज ज्येष्ठ नागरिक जोडपे-60 लाख रुपये (एकूण गुंतवणूक) तिमाही व्याज – 1,23,000 रुपये कालावधी – 5 वर्ष व्याज दर – 8.2% म्यॅचुरिटी रक्कम – 60 लाख रुपये एकूण व्याज – 24,60,000 रुपये

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.