Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Income Tax : आयटीआर भरण्यास मुदत वाढ? महसूल सचिव म्हणाले..

Income Tax : सध्या ITR भरण्याची लगबग सुरु आहे. आयकर रिटर्न भरण्याची तारीख जवळ जवळ येत आहे. केंद्र सरकार कर भरण्याची अंतिम मुदत वाढविण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरु आहे. त्यावर महसूल सचिवांनी पण मत मांडले आहे..

Income Tax : आयटीआर भरण्यास मुदत वाढ? महसूल सचिव म्हणाले..
Follow us
| Updated on: Jul 16, 2023 | 6:18 PM

नवी दिल्ली | 16 जुलै 2023 : तुम्ही आयकर रिटर्न (ITR) भरला नसेल तर लवकर कराचे विवरण जमा करा. प्रत्येकाने आयटी रिटर्न भरणे आवश्यक आहे. आयटीआर भरण्याची आता लगबग उडाली आहे. कारण आयटीआर भरण्याची अंतिम तारीख आता जवळ येऊन ठेपली आहे. 31जुलै रोजीपर्यंत आयकर भरण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे अनेकांची सध्या धांदल उडालेली आहे. आयकर रिटर्न भरण्याची तारीख जवळ जवळ येत आहे. तसे अनेक जण सीए अथवा स्वतः कर भरण्याची कवायत करत आहेत. केंद्र सरकार कर भरण्याची अंतिम मुदत वाढविण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरु आहे. त्यावर महसूल सचिवांनी (Revenue Secretary) पण मत मांडले आहे..

जास्त रिटर्न भरावा लागेल

महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी करदात्यांना लवकरात लवकर आयटी रिटर्न दाखल करण्यास सांगितले आहे. एका मुलाखतीत मल्होत्रा यांनी यंदा जास्त रिटर्न भरल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली. गेल्या वर्षीपेक्षा यंदा आयटी रिटर्न भरण्याची संख्या अधिक असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

अंतिम मुदत वाढेल?

गेल्यावर्षी 31 जुलै पर्यंत जवळपास 5.83 कोटी करदात्यांनी आयकर रिटर्न दाखल केले होते. मुल्यांकन वर्ष 2022-23 साठी आयटी रिटर्न दाखल करण्याची ती अंतिम तारीख होती. महसूल सचिवांनी करदात्यांचे आभार मानले. तसेच अधिकाधिक करदात्यांनी लवकर आयटीआर जमा करण्याचे आवाहन त्यांनी केले. गेल्यावर्षीपेक्षा यंदा आयटीआर दाखल करण्याचे प्रमाण अधिक असू शकते. तसेच आयटीआर भरण्याची प्रक्रिया सुटसूटीत आणि सोपी असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटच्या दिवसाची वाट न पाहता तात्काळ करदात्यांनी आयटीआर भरण्याचे आवाहन त्यांनी केले. आयटीआर भरण्यासाठी अर्थ मंत्रालय कोणती पण मुदतवाढ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

इतक्या टक्क्यांची वृद्धी

करदात्यांनी झटपट ही प्रक्रिया पूर्ण करावी. त्यांनी शेवटच्या दिवसात आयटीआर भरण्यासाठी वाट न पाहण्याचे आवाहन त्यांनी केले. 31 जुलै ही अंतिम तारीख जवळ आली आहे. या तारखेच्या आत लवकर प्राप्तिकर रिटर्न दाखल करावे, असे ते म्हणाले. यंदा आयटीआर भरणाऱ्यांच्या संख्येत 10.5 टक्के वृद्धी दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

33.61 लाख कोटींचे कर उद्दिष्ट

वस्तू आणि सेवा करामध्ये (GST) वृद्धी झाल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत 12 टक्के वाढ झाली आहे. दरात कपात झाल्याने उत्पादन शुल्काच्या आघाडीवर वृद्धी दर 12 टक्क्यांनी घसरल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, ही वृद्धी नकारात्मक आहे. दर कपातीचा प्रभाव कमी झाल्यावर स्वरुप लक्षात येईल. तसेच योग्य आकडा समोर येईल. लवकरच लक्ष्य गाठण्यात येईल, असे ते म्हणाले.

विष्णुचा अवतार आहेत, तर ट्रम्पवर सुदर्शन चक्र सोडावं; राऊतांची टीका
विष्णुचा अवतार आहेत, तर ट्रम्पवर सुदर्शन चक्र सोडावं; राऊतांची टीका.
जमीन दान करणाऱ्यांकडूनही मंगेशकर रुग्णालयाने घेतले उपचाराचे 3 लाख
जमीन दान करणाऱ्यांकडूनही मंगेशकर रुग्णालयाने घेतले उपचाराचे 3 लाख.
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका; सुनील शुक्ला कधीकाळी मनसेत होते?
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका; सुनील शुक्ला कधीकाळी मनसेत होते?.
मनसे नेते संदीप देशपांडेंना आज्ञाताची शिवीगाळ
मनसे नेते संदीप देशपांडेंना आज्ञाताची शिवीगाळ.
चिमुकलीची लैंगिक अत्याचार करून हत्या; संतप्त नागरिकांचा मोर्चा
चिमुकलीची लैंगिक अत्याचार करून हत्या; संतप्त नागरिकांचा मोर्चा.
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?.
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे.
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्....
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार.