Income Tax : ITR भरल्यानंतर किती दिवसात मिळतो रिफंड, अगोदरच कळते किती रक्कम मिळणार परत

Income Tax : प्राप्तिकर भरल्यानंतर रिफंड कधी मिळतो, असा प्रश्न अनेकांना पडतो. आयकर खाते त्याविषयीची इत्यंभूत माहिती देते. किती रुपये तुम्हाला रिफंड मिळतो, तो कसा परत करण्यात येतो, याची माहिती देण्यात येते.

Income Tax : ITR भरल्यानंतर किती दिवसात मिळतो रिफंड, अगोदरच कळते किती रक्कम मिळणार परत
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 6:18 PM

नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2022-23 च्या उत्पन्नावर प्राप्तिकर रिटर्न (Income Tax Return) भरण्याची कवायत सुरु झाली आहे. आतापर्यंत 2 कोटींपेक्षा अधिक करदात्यांनी रिटर्न फाईल केले आहे. त्यांना रिफंडची प्रतिक्षा आहे. ITR भरल्यानंतर त्याचे पडताळणी, व्हॅलेडिटी करणे आवश्यक असते. त्यानंतर रिफंडची प्रक्रिया (Refund Process) सुरु होते. प्राप्तिकर भरल्यानंतर रिफंड कधी मिळतो, असा प्रश्न अनेकांना पडतो. पण अनेक जण छोट्या छोट्या त्रुटी अथवा चुका करतात आणि त्यामुळे ही प्रक्रिया अर्धवट राहते. अथवा प्रक्रिया पुढे सरकत नाही. त्यामुळे रिफंड मिळण्यास अजून वेळ लागतो. आयकर खाते त्याविषयीची इत्यंभूत माहिती देते. किती रुपये तुम्हाला रिफंड मिळतो, तो कसा परत करण्यात येतो, याची माहिती देण्यात येते.

किती लागतो वेळ रिटर्न भरल्यानंतर तो सत्यापित करावा लागतो. व्हेरिफिकेशननंतर रिफंडची प्रक्रिया सुरु होते. जर आयटीआर भरताना चुका झाल्या नसतील तर रिफंडसाठी फार काळ वाट पहावी लागत नाही. कमीत कमी 20 ते 25 दिवसांत रक्कम मिळते. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (CBDT) चेअरमनने तर यापेक्षा कमी कालावधीचा दावा केला आहे. जर त्रुटी नसेल ही प्रक्रिया अगदी काही दिवसांवर आली आहे.

प्रक्रिया होणार गतिमान संपूर्ण आयटीआर प्रक्रियेलाच गतिमान करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. केंद्र सरकार त्यासाठी प्रयत्नात आहे. किचकट आणि अवघड प्रक्रिया सोपी करण्यात येत आहे. त्यासाठी बरेच बदल सुरु आहेत. त्यातच रिफंडची रक्कम तात्काळ देण्यासाठी मोठा बदल करण्यात येत आहे. केंद्र सरकार एकाच दिवसांत रक्कम रिफंड करण्याच्या तयारीत आहे.

हे सुद्धा वाचा

आता किती दिवसांत मिळेल पैसा सीबीडीटी चेअरमन नितीन गुप्ता यांनी याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, आता रिफंड प्रक्रिया एकदम सोपी झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात 80 टक्के करदात्यांना 30 दिवसांच्या आत रक्कम रिफंड करण्यात आली होती. 2022-23 मधील आयटीआर रिफंडची सरासरी ही 16 दिवसांची आहे. म्हणजे केवळ 16 दिवसांत करदात्यांच्या खात्यात रक्कम रिफंड करण्यात आली आहे. यापूर्वी ही प्रक्रिया 26 दिवसांची होती. 28 जुलै, 2022 रोजी एकाच दिवसात जवळपास 23 लाख रिटर्न देण्यात आले होते.

अगोदरच देण्यात येते माहिती प्राप्तिकर खाते रिफंड संबंधीची माहिती करदात्यांना ईमेल अथवा मॅसेज द्वारे देते. त्यामध्ये करदात्याला किती रक्कम मिळणारी याची माहिती देण्यात येते. तसेच तुम्ही आयकर खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन रिफंड स्टेटस चेक करु शकता. त्यात उत्पन्नावर किती कर कपात झाली आणि रिफंडची माहिती देण्यात येते.

कसा मिळतो रिफंड तुमच्या बँक खात्याचा तपशील यापूर्वीच नोंद केलेला असतो. तुमचे बँके खात्याचा तपशील पडताळल्या जातो. त्यानंतर एसबीआय बँकेतून तुमच्या खात्यात रिफंड जमा होतो. काही प्रकरणात धनादेश आणि बँक ड्राफ्टद्वारे तुमच्या पत्त्यावर पाठविण्यात येतो.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.