Income Tax : ITR व्हेरिफाय करण्याचा आज शेवटचा दिवस, नाहीतर लागेल दंड

| Updated on: Aug 31, 2023 | 5:16 PM

Income Tax : आज आयटीआर व्हेरिफिकेशनची शेवटची संधी आहे. आयटीआर फाईल केल्यानंतर एका महिन्याच्या आत ITR Verification करणे आवश्यक आहे. जर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नाहीतर तुम्हाला विलंब शुल्काचा फटका बसू शकतो. आयटीआर पण इनव्हॅलिड ठरण्याचा धोका असतो.

Income Tax : ITR व्हेरिफाय करण्याचा आज शेवटचा दिवस, नाहीतर लागेल दंड
Follow us on

नवी दिल्ली | 31 ऑगस्ट 2023 : आयकर रिटर्न दाखल करण्याची शेवटची पायरी अत्यंत महत्वाची असते. आयटीआर फाईल झाल्यानंतर महत्वाचा टप्पा ITR Verification चा असतो. आयटीआर फाईल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै रोजी संपली. करदात्यांना त्यानंतर आयटीआर व्हेरिफाय करण्यासाठी नियमानुसार एक महिन्यांचा कालावधी मिळातो. हा एक महिन्यांचा कालावधी आता जवळपास पूर्ण होत आला आहे. जर तुम्ही अद्याप आयटीआर व्हेरिफाय केला नसेल तर तुम्हाला विलंब शुल्क मोजावे लागू शकते. दंड भरावा लागू शकतो. तसेच आयटीआर इनव्हॅलिड ठरण्याचा पण धोका असतो. यावर्षी जवळपास 6 कोटी करदात्यांनी ITR फाईल केला आहे. केंद्र सरकार (Central Government) आयटीआर प्रक्रिया साधी सरळ सोपी करण्याचा प्रयत्न करत आहे. भविष्यात कदाचित आयटीआर भरण्याच्या पद्धतीत अमुलाग्र बदल पण पाहायला मिळतील.

दोन दिवसांपूर्वीच केले ट्विट

हे सुद्धा वाचा

याप्रकरणात करदात्यांना आयकर विभागाने अलर्ट दिला. प्राप्तिकर खात्याने एक ट्विट केले. त्यामध्ये रिटर्न फाईल केल्यानंतर 30 दिवसांच्या आत आयटीआर व्हेरिफाय करणे चुकवू नका, असा इशारा देण्यात आला आहे. उशीरा व्हेरिफिकेशन केल्यास आयकर कायदा, 1961 च्या तरतूदीनुसार, विलंब शुल्क लागू शकतो. आज आता उशीर करु नका, आयटीआर लवकर व्हेरिफाय करा, असे ट्विटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

का आवश्यक आहे आयटीआर व्हेरिफिकेशन ?

ई-व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ITR E-Verify मानण्यात येईल. ही पायरी पूर्ण झाल्यानंतर जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला रिफंड मिळतो. जर तुम्ही आयटीआर व्हेरिफिकेशनची अंतिम मुदत ओलांडली तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. प्राप्तिकर खात्यानुसार, अंतिम मुदतीपूर्वी आयटीआर व्हेरिफाय केले नाही तर आयटीआर रद्द होऊ शकते. अशा करदात्याला 5,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.

असे करा ई-व्हेरिफिकेशन?

e-verification साठी आयटी विभागाने पाच प्लॅटफॉर्म जसे बँक खाते, नेट बँकिंग, बँक एटीएम, आधार वा डीमॅट खात्याचा पर्याय दिला आहे.

ई-व्हेरिफिकेशन पूर्ण करण्यासाठी सर्वात अगोदर आयकर खात्याच्या ई-फायलिंग पोर्टलला भेट द्या.

त्यानंतर तुमचा पॅन क्रमांक आणि पासवर्ड नोंदवा.

लॉगिन केल्यानंतर तुम्हाला लागलीच ई-व्हेरिफिकेशनचा पर्याय समोर दिसेल.

नेट बँकिंग, बँक एटीएम, आधार, डीमॅट खाते वा बँकेचे खाते यांच्यापैकी एक पर्याय निवडा.

जर आधार हा पर्याय निवडला असेल तर त्यासंबंधीच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठविण्यात येईल.

यानंतर ई-व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण होईल.

रिफंडसाठी नाही लागणार वेळ

बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, आयकर विभाग, टॅक्स रिफंड प्राप्त करण्यासाठी कमीत कमी वेळ लागावा यासाठी योजना तयार करण्यात येत आहे. सध्या या प्रक्रियेला 16 दिवस लागतात. हा कालावधी 10 दिवसांवर आणण्याचा प्रयत्न आहे.