Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Income Tax : 1 एप्रिल 2023 पासून आयटीआरचा नवा फॉर्म, हे नियम लक्षात ठेवा

आर्थिक वर्ष 2023-24 सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. नव्या आर्थिक वर्षासाठी आयटीआर फाईल करण्याचा प्लान करत असाल 1 एप्रिल ते 31 जुलै विना पेनाल्टी आयटीआर फाईल करू शकता.

Income Tax : 1 एप्रिल 2023 पासून आयटीआरचा नवा फॉर्म, हे नियम लक्षात ठेवा
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 2:29 PM

मुंबई : आर्थिक वर्ष 2022-23 संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 1 एप्रिल 2023 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होईल. जर तुम्ही इनकम टॅक्स फाईल करत असाल तर काही बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. नाहीतर मोठा दंड भरावा लागण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2022-23 या वर्षाचा आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.

1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या आर्थिक वर्षासाठी नवा आयटीआर फॉर्म मिळणार आहे. त्यामुळे 31 जुलै 2023 रोजी कोणत्याही परिस्थिती आयटीआर फाईल करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही आयटीआर फाईल करण्यास गेले तर 5 हजार रुपयांची पेनल्टी भरावी लागू शकते.

जे लोक वर्षाला 2.5 लाख रुपयांहून अधिकची कमाई करतात. त्यांना 31 जुलै 2023 पूर्वीच आयटीआर जमा करावा लागेल. 5 लाख रुपयांपर्यंत करपात्र उत्पन्न असलेल्या व्यक्तींना कर भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. गेल्या वर्षी सरकारने ITR अहवालाची अंतिम मुदत 31 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली होती. मात्र यंदा तसं काही होईल याबाबत शाश्वती नाही.

इतका दंड भरावा लागणार

आयटीआरची शेवटची तारीख चुकली तर तुम्हाला 5 हजार रुपये दंड भरावा लागेल. आयकर कायद्याच्या कलम 234 एफ नुसार पाच हजार रुपये आकारले जातील. जर तुमचं उत्पन्न पाच लाखापेक्षा कमी असेल तर हजार रुपये दंड असेल.

दुसरीकडे, अंतिम तारखेनंतर आयटी रिटर्नसाठी अर्ज केल्यास तुम्हाला कलम 234 ए अंतर्गत दरमहा 1 टक्का व्याज द्यावा लागेल किंवा थकित करावर महिन्याचा काही भाग द्यावा लागेल.

शेअर, म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट किंवा तुमच्या इतर गुंतवणुकीत नुकसान झाले असेल तर तुम्ही ते पुढच्या आर्थिक वर्षात दाखवू शकता. यामुळे करात सूट मिळेल. पण तुमच्या आयकर रिटर्नमध्ये नुकसानीबाबत माहिती असेल आणि ते देय तारखेपर्यंत आयकर विभागाकडे सादर केली असेल, तरच तुम्हाला सवलत मिळू शकते.

आयकर विभागाने करदात्यांसाठी नवं मोबाईल ॲप आणलं आहे. ॲपच्या माध्यमातून करदात्यांना टीडीएस आणि करासंबंधीची माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर वार्षिक सूचना विवरण (AIS) मोबाईलवर पाहता येईल.  उत्पन्नाच्या स्त्रोतवर कपात, कर संग्रह (टीडीएस/टीसीएस), व्याज, लाभांश आणि शेअरविषयीची माहिती घेता येईल.

इतकंच काय तर करदात्यांना त्यांचे मतही मांडता येईल. त्यांना सूचना करता येतील.  करदात्यांना मोबाईल ॲप गुगल प्ले आणि ॲप स्टोअरवरुन डाऊनलोड करता येईल.

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.