Covid Death Tax Exemption | कोविडमुळे मृत्यू , कर सवलतीसाठी नियमात बदल, CBDT च्या निर्णयामुळे हा होईल फायदा
Covid Death Tax Exemption | कोविड रुग्णाच्या मृत्यूनंतर नुकसान भरपाई रक्कमेवर तुम्हाला कर सूट दिली जाणार आहे. त्यासाठीचे नियम काय आहेत ते बघुयात
Covid Death Tax Exemption | कोविड-19 (Covid-19)महामारीमुळे एखाद्याचा मृत्यू (Patient Death) झाला तर त्यावर भरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ज्या कंपनीत व्यक्ती काम करते, त्या कंपनीकडून ही नुकसान भरपाईची (Compensation) रक्कम देण्यात येते. विशेष म्हणजे त्या नुकसानभरपाईच्या रकमेवर करात सूट देण्याचाही नियम आहे. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने (Government) हा नियम जारी केला होता. कोविडच्या उपचारावरील खर्चाचा कर सूटमध्ये समावेश करण्याचा नियम आहे. इतकंच नाही तर कोविडच्या मृत्यूनंतर एखाद्या हितचिंतक किंवा नातेवाईकाने पीडितेच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली तर त्यावर करात सूट (Tax Exemption) मिळू शकते. हा नियम 2022 च्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आला होता. मात्र आता त्यात काही बदल करण्यात आले आहेत. कोविड रुग्णाच्या मृत्यूनंतर नुकसान भरपाई रक्कमेवर तुम्हाला कर सूट दिली जाणार आहे. त्यासाठीचे नियम काय आहेत ते बघुयात.
काय आहे नियम
कर सवलतीचा हा नियम 2019-20 या आर्थिक वर्षापासून लागू करण्यात आला. त्यानुसार, एखाद्या व्यक्तीने अशी कोणतीही भरपाई घेतली किंवा नातेवाईक, हितचिंतकांकडून मदत घेतली आणि आयकर रिटर्नमध्ये यासंबंधी खुलासा केला नाही तरी हरकत नाही. आयकर कायद्याच्या कलम 56 अन्वये या रकमेचा समावेश करण्यात आल्याने हे सांगण्यात आले. या कलमांतर्गत एखाद्या व्यक्तीला आर्थिक मदत मिळाल्यास ती उत्पन्नात गणली जाणार नाही आणि त्यावर कोणताही कर आकारला जाणार नाही. त्यामुळे रिटर्नमध्ये त्याचा अहवाल देणे बंधनकारक नाही.
काय आहे CBDT चा नियम
आता या नियमात काही बदल करण्यात आले आहेत. सीबीडीटीने या संदर्भात 5 ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी केली असून, एखाद्याच्या कुटुंबात कोविडमुळे कोणाचा मृत्यू झाला असेल, तर फॉर्म आणि पुरावा सादर करावा लागेल. हा फॉर्म किंवा पुरावा त्यांच्या कुटुंबातील सदस्याचा कोविडमुळे मृत्यू झाल्यानंतर कंपनीकडून नुकसान भरपाई घेतलेल्या कुटुंबाला सादर करावा लागेल. कोणत्याही नातेवाईकाकडून आर्थिक मदत घेतली असेल तर कर सवलतीसाठी अर्ज करताना त्याचा पुरावा द्यावा लागेल.अधिसूचनेनुसार, या श्रेणीमध्ये येणाऱ्या कुटुंबांना त्यांच्या मूल्यांकन अधिकाऱ्याकडे फॉर्म ए (Form A) सादर करावा लागेल.
नुकसान भरपाईवर सूट केव्हा
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) याविषयीच्या अटी स्पष्ट केल्या आहेत. त्यानुसार, या अटींचे पालन केल्यावर नुकसान भरपाई किंवा आर्थिक सहाय्य प्रकरणात करातून सूट दिली जाईल. व्यक्तीचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर त्याचा जर 6 महिन्यांच्या आत मृत्यू झाल्यास नुकसान भरपाईच्या रक्कमेवर कर सवलत देण्यात येईल अशी पहिली अट घालण्यात आली आहे. जर फॉर्म A कुटुंबातील सदस्यांनी सादर केला नाही, तर नुकसान भरपाईवर कर सूट दिली जाणार नाही. ही सूट मिळवण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रेही सादर करावी लागणार आहेत.