Income Tax Refund : तुमचं तर नाव नाही ना यादीत? इतक्या लाख करदात्यांना रिफंड नाहीच

Income Tax Refund : देशातील जवळपास 7 कोटी करदात्यांना रिटर्न दाखल केला आहे. त्यातील 2.5 कोटींहून अधिक करदात्यांना रिफंड दिला. पण इतक्या लाख करदात्यांना त्यांची ही कारणं भोवली. त्यांना आयकर रिफंड मिळाला नाही. याविषयीची माहिती आयकर विभागाने दिली आहे.

Income Tax Refund : तुमचं तर नाव नाही ना यादीत? इतक्या लाख करदात्यांना रिफंड नाहीच
Follow us
| Updated on: Sep 06, 2023 | 8:30 AM

नवी दिल्ली | 6 सप्टेंबर 2023 : यंदा मोठ्या प्रमाणात आयकर रिटर्न दाखल करण्यात आले. मूल्यांकन वर्ष 2023-24 मध्ये 6.98 कोटी आयटीआर दाखल केला. आयकर विभागाने यामधील 2.5 कोटींहून अधिक करदात्यांना रिफंड दिला. पण अनेक करदाते अद्यापही रिफंड मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्यावरही कोणत्या कारणाने आयटीआर रिफंड मिळाला नाही, असा सवाल करदात्यांना पडला आहे. आयटीआर रिफंड (ITR Refund) मिळण्यास विलंब का झाला यासंबंधीची कारणे आयकर विभागाने दिली आहे. मंगळवारी विभागाने (Income Tax Department) याविषयीची माहिती दिली. त्यानुसार इतक्या लाख करदात्यांना आयकर रिफंड देण्यात आला नाही. त्यामागील कारणमीमांसा पण करण्यात आली.

2.45 कोटी करदात्यांना रिफंड

यंदा मूल्यांकन वर्ष 2023-24 मध्ये 6.98 कोटी आयटीआर दाखल झाले. त्यातील 6.84 कोटी आयटीआर व्हेरिफाईड, आयटीआरचा पडताळा झाला आहे. 6 कोटींहून अधिक आयटीआरची प्रक्रिया झाली आहे. यातील 2.45 कोटी करदात्यांच्या खात्यात रिफंडची रक्कम देण्यात आली. पण यातील काही करदात्यांच्या खात्यात रिफंड जमा करण्यात येणार नाही, याविषयीची कारणं प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केली आहे.

हे सुद्धा वाचा

प्रक्रिया वेळेतच पूर्ण

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ अर्थात सीबीडीटीने याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, आयटीआरची प्रक्रिया जलद करण्यात आली. यंदा प्रक्रिया वेळेच्या आतच पूर्ण करण्यात आली. सरासरी वेळेपेक्षा हे काम अतिजलद म्हणजे पूर्वीपेक्षा 10 दिवसांनी कमी करण्यात आले. यापूर्वी मूल्यांकन वर्ष 2019-20 मध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 82 दिवस लागले होते. तर गेल्या वर्षी 2022-23 मध्ये 16 दिवस लागले होते.

या करदात्यांना नाही रिफंड

  1. आयटीआर रिफंडसाठी आयटीआर फाईलिंगची ई-पडताळणी करावी लागते. आयटीआर दाखल केल्या नंतर आणि रिफंड प्राप्त करण्यामधील ही महत्वाची प्रक्रिया आहे. सर्व करदात्यांना त्यांचे आयटीआर दाखल केल्याच्या 30 दिवसांच्या आत ई-पडताळणी, ई-व्हेरिफिकेशन करावे लागते. ज्यांनी ही प्रक्रिया केली नाही. त्यांचा रिफंड आलेला नाही. मूल्यांकन वर्ष 2023-24 मध्ये 14 लाख आयटीआर असे आहेत, ज्यांनी आतापर्यंत ई-व्हेरिफिकेशन केलेले नाही.
  2. तर 12 लाख असे आयटीआर आहेत, ज्यांच्याकडे अधिकची माहिती मागितली पण त्यांनी ती निर्धारीत कालावधीत दिली नाही. त्यांचा पण रिफंड रखडला आहे. उत्पन्नाविषयीची, स्त्रोतविषयीची अथवा इतर माहिती वेळेत न दिल्याने रिफंड रखडला आहे.
  3. आयटीआर रिफंड करताना चुकीचा बँकिंग तपशील जोडल्याने काहींना रिफंड मिळण्यात अडचण आली आहे. करदात्यांच्या खात्यात रिफंड जमा होणार नाही. बँक खात्यावरील नाव आणि पॅन कार्डचा तपशील यांचा मेळ झाला पाहिजे. रिफंड त्याच बँक खात्यात जमा होईल, ज्याचा उल्लेख आयटीआरमध्ये करण्यात आला .

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.