टॅक्स बचतीचा कानमंत्र! 31 मार्चच्या आत ‘ही’ कामे पूर्ण करा, टॅक्सवर अधिक सूट मिळवा
आर्थिक वर्ष (Fiscal year) 2021-22 संपवून आर्थिक वर्ष 2022-23 सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाचा सल्ला म्हणजे तुम्ही जर आजूनही टॅक्स सेव्हिंग स्कीममध्ये (Tax saving scheme) गुंतवणूक केली नसल्यास आजच गुंतवणूक करा.
आर्थिक वर्ष (Fiscal year) 2021-22 संपवून आर्थिक वर्ष 2022-23 सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाचा सल्ला म्हणजे तुम्ही जर आजूनही टॅक्स सेव्हिंग स्कीममध्ये (Tax saving scheme) गुंतवणूक केली नसल्यास आजच गुंतवणूक करा. ही सर्व कामे 31 मार्चच्या आत पूर्ण करा. अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास इनकम टॅक्सच्या नियमानुसार तुम्हाला गुंतवणुकीवर टॅक्स भरावा लागत नाही आणि तुमच्या टॅक्सची (Tax) बचत होते. अनेक व्यक्ती अशा असतात ज्या आर्थिक वर्षाच्या शेवटी आपल्या नोकरीमध्ये बदल करतात. नोकरीमध्ये बदल केल्यास त्यांचे उत्पन्न वाढते. साहाजिकच त्यांना अधिक टॅक्स भारावा लागोत. मात्र अशा व्यक्तींनी जर टॅक्सचे योग्य नियोजन करून, ज्या योजनांमधील गुंतवणुकीवर टॅक्समध्ये सूट मिळते असा योजनेत गुंतवणूक केल्यास त्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. आज आपण अशाच काही योजनांची माहिती पहाणार आहोत.
पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF)
पब्लिक प्रोव्हिडंट फंड ही एक दीर्घ मुदतीची बचत योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला एफडीच्या तुलनेत चांगला परतावा मिळतो. या योजनेचा कालावधी 15 वर्षांचा असतो. पब्लिक प्रोव्हिडंटमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला इनकम टॅक्स कायद्याच्या कलम 80C अंतर्गत सूट मिळते.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC)
ही एक पाच वर्षांची बचत योजना आहे. या योजनेतून देखील बँकाच्या योजनेच्या तुलनेत चांगला परतावा मिळतो. नॅशन सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेतील व्याजदर हे सातत्याने बदलत असतात. तुम्ही तुमच्या जावळच्या पोस्ट ऑफीस कार्यालयात जाऊन या योजनेंतर्गंत खाते ओपन करू शकता. या योजनेत पैसे गुंतवल्यास तुम्हाला इनकम टॅक्स कायद्याच्या कलम 80C अंतर्गत सूट मिळते.
नॅशनल पेंशन सिस्टीम
ही एक ऐच्छिक पेंशन योजना आहे. या योजनेचा लाभ तुम्ही नोकरीतून निवृत्त झाल्यावर तुम्हाला मिळतो. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला इनकम टॅक्समधून सूट मिळते.
टॅक्स सेव्हिंग एफडी
अनेक बँका आपल्या ग्राहकांसाठी टॅक्स सेव्हिंग एफडी अर्थात फिक्स्ड डिपॉझिटच्या योजना उपलब्ध करून देत असतात. अशा एफडीमध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला इनकम टॅक्समधून सूट मिळते.
संबंधित बातम्या
IPO बाजारात इतना सन्नाटा क्यू है भाई ? तीन महिन्यांत केवळ 4 कंपन्यांची एंट्री