व्यावसायिक मालमत्तेवरही भरावा लागतो का कर ? चला तर जाणून घेऊयात याविषयीचे नियम
व्यावसायिक मालमत्तेची खरेदी, बांधकाम, दुरुस्ती आणि देखभाल अथवा पुन्हा बांधकाम करण्यासाठी कर्ज घेतले असेल आणि कर्जावरील व्याज चुकते करत असाल तर यावर कर बचतीची लाभ मिळतो. परंतू या कर वजावटीसाठी तुम्हाला दावा दाखल करावा लागतो.
व्यावसायिक मालमत्तेची (commercial Property) खरेदी, बांधकाम, दुरुस्ती आणि देखभाल अथवा पुन्हा बांधकाम करण्यासाठी कर्ज (Loan) घेतले असेल आणि कर्जावरील व्याज चुकते करत असाल तर यावर कर बचतीची लाभ( Property tax rebate) मिळतो. अशी मालमत्ता प्राप्तीकर खात्याच्या (Income Tax) नियमांतर्गत येते. अशी मालमत्ता व्यावसायिक मालमत्तेच्या परीघात येते आणि सहाजिकच त्याचे नियम वेगळे असतात. तर चला जाणून घेऊयात की, व्यावसायिक मालमत्तेवर कर कसा लागतो ते आणि त्याचे नियम काय आहेत याविषयी. तुम्ही निवासी मालमत्ता अथवा व्यावसायिक मालमत्तेतून कमाई करत असाल, भाडे, किराया या माध्यमातून तुमचे उत्पन्न वाढले असेल तर घर मालमत्तेपासून मिळणारे उत्पन्न कर पात्र (Long term Capital Gain) ठरते. हा नियम तेव्हा लागू होतो, जेव्हा अशा मालमत्तांवर तुमचा हक्क असेल. तर मग या करावर तुम्हाला सवलतीचा हक्क सांगता येतो का? कर वजावटीसाठी तुम्हाला दावा दाखल करता येतो का? याची माहिती आणि प्रक्रिया पाहु…
जर मालमत्तेवर मालकी हक्क नसेल अथवा भाडे आकारून त्यातून उत्पन्न मिळत असेल तर अशावेळी या उत्पन्नाला इतर स्त्रोतातून उत्पन्न या पर्यायात दाखवावा लागेल आणि नियमांनुसार त्यावर कर भरावा लागेल. या सर्व प्रक्रियेत तुम्हाला कर सवलतीचा पर्याय मिळतो. तुम्हाला कर वजावटीचा दावा दाखल करता येतो. स्टँडर्ड डिडक्शन अंतर्गत ही सुविधा प्राप्त होते. या वजावटीतंर्गत प्राप्त उत्पन्नावर 30 टक्क्यांपर्यंत सवलत मिळते. आता एवढेच कशाला तुमच्या मालकी हक्कातील मालमत्तेच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी जो खर्च लागेल, त्यात कर सलवतीचा फायदा मिळतो.
व्यावसायिक मालमत्तेची खरेदी, बांधकाम, दुरुस्ती आणि देखभाल अथवा पुन्हा बांधकाम करण्यासाठी कर्ज घेतले असेल आणि कर्जावरील व्याज चुकते करत असाल तर यावर कर बचतीची लाभ मिळतो. परंतू या कर वजावटीसाठी तुम्हाला दावा दाखल करावा लागतो. प्राप्तीकर खात्याच्या कायद्यातील कलम 24 बी अंतर्गत व्याजवर कर सवलतीचा फायदा मिळतो. कर्ज घेण्यासाठी दिलेले प्रक्रिया शुल्क आणि आगाऊ भरणा रक्कमेचा व्याजातंर्गत समावेश करत कर वजावटीचा दावा करता येतो. तुम्ही घर बांधकामासाठी अथवा खरेदी करण्यासाठी बँकेकडून, वित्तीय संस्थेकडून अथवा मित्र, नातेवाईकांकडून कर्ज घेतले असेल आणि त्यासंबंधीच्या कराराचा पुरावा तुमच्याकडे असेल तर कर वजावटीच्या लाभावर तुमचा पुर्ण हक्क आहे.