कर वाचविण्याची चिंता कशाला, महिलांनो, हे पाऊल तर आधी टाका
Income Tax saving options for women : प्राप्तिकर वाचविण्यासाठी अनेक जण धडपड करतात. नोकरी करणाऱ्या महिलांना सुद्धा आयकर वाचविण्याची चिंता सतावते. अशावेळी या योजनेतील गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरु शकते. अर्थात तु्मच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते.
अनेकदा आर्थिक वर्ष संपत आले की आपण गडबडीत कोणत्याही योजनेत धडाधड गुंतवणूक करतो. जर आपण नवीन आर्थिक वर्ष सुरु होताच करासंबंधीची योजना केली आणि स्वयंशिस्तपणे गुंतवणूक केल्यास त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. पुरुष असो वा महिला कर्मचारी, प्रत्येकाला कर वाचविण्याची धडपड करावी लागते. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास त्याप्रमाणे तुम्हाला कर सवलत मिळते.
महिलांसाठी टॅक्स स्लॅब
2.50 ते 3 लाख उत्पन्नासाठी महिलांना जुन्या आणि नवीन कर रचनेत 5 टक्के कर द्यावा लागतो. 5 ते 6 लाख उत्पन्नासाठी जुन्या कर रचनेत 20 टक्के, तर नवीन कर रचनेत 10 टक्के आयकर द्यावा लागेल. जुन्या कर रचनेत दहा लाखांपर्यंत हीच तरतूद आहे. तर नवीन कर रचनेत 7.50 लाख ते दहा लाख उत्पन्नासाठी 15 टक्के कराची तरतूद आहे.
हे सुद्धा वाचा
बचतही आणि फायदा पण
- सुकन्या समृद्धी योजना – लहान मुलींच्या भविष्यासाठी ही खास बचत योजना आहे. मुलींचे शिक्षण, लग्न आणि इतर खर्चासाठी ही बचत उपयोगी पडते. सुकन्या समृद्धी योजना ईईई (सवलत) श्रेणीअंतर्गत येते. यामध्ये गुंतवणूक, कमाई आणि रक्कम काढण्यावर कोणतेही शुल्क आकारल्या जात नाही. मुलगी असेल तर या योजनेचा लाभ घेऊ शकता. आयकर अधिनियम, 1961 चे कलम 10 (11 ए) अंतर्गत सवलत मिळते. योजनेत 80सीचा फायदा मिळतो.
- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र- एनएससी ही एक मुदत ठेव बचत योजना आहे. पोस्ट ऑफिसमध्ये योजनेचे खाते उघडता येते. कमीत कमी 1000 रुपयांची बचत करता येते. ही योजना गुंतवणूकदारांना 7.7 टक्के दराने परताव्याची हमी देते. आयटी अधिनियमचे कलम 80सी अंतर्गत जमा रक्कमेवर कपातीची सुविधा मिळते.
- सार्वजनिक भविष्य निधी – पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणजे पीपीएफ, हा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे. पीपीएफ खात्यात कमीत कमी 500 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. या योजनेत वर्षाला जास्तीत जास्त 1,50,000 रुपये जमा करता येतात.
- विम्यावर लाभ : महिलांना स्वतःच्या, पती वा मुलांसाठी घेतलेल्या जीवन विमा पॉलिसीवर कर बचत मिळवू शकते. कलम 80यू अंतर्गत काही आजारांवर तुम्हाला ही सवलत मिळवता येते. त्यासाठी नियम व अटी आहेत.