Inflation : गेल्या आठ वर्षांत ‘एफएमसीजी’ वंस्तूंच्या दरात मोठी वाढ; मात्र चर्चा फक्त पेट्रोल, डिझेलचीच

देशात महागाईचा (Inflation) भडका उडाला आहे, सध्या महागाई गेल्या 17 महिन्यातील उच्चस्थरावर आहे. पेट्रोल (Petrol), डिझेलसह (Diesel), सीएनजी, पीएनजी, एलपीजी अशा सर्वच इंधनाचे दर वाढले आहेत. इंधन दरवाढीमुळे महागाईत भर पडली आहे. मात्र सध्या महागाईचे मुल्यमापन हे वाढत असलेल्या पेट्रोल, डिझेचे दर आणि इंधनाच्या दरावरूनच करण्यात येत आहे.

Inflation : गेल्या आठ वर्षांत 'एफएमसीजी' वंस्तूंच्या दरात मोठी वाढ; मात्र चर्चा फक्त पेट्रोल, डिझेलचीच
भारतात महागाईचा भडका उडणार
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 10:54 AM

देशात महागाईचा (Inflation) भडका उडाला आहे, सध्या महागाई गेल्या 17 महिन्यातील उच्चस्थरावर आहे. पेट्रोल (Petrol), डिझेलसह (Diesel), सीएनजी, पीएनजी, एलपीजी अशा सर्वच इंधनाचे दर वाढले आहेत. इंधन दरवाढीमुळे महागाईत भर पडली आहे. मात्र सध्या महागाईचे मुल्यमापन हे वाढत असलेल्या पेट्रोल, डिझेचे दर आणि इंधनाच्या दरावरूनच करण्यात येत आहे. इंधनाचे वाढत असलेले दर हा चर्चेचा विषय बनला आहे. मात्र गेल्या आठ वर्षांमध्ये इंधनाच्या तुलनेत दैनंदीन गरजेच्या वस्तूंध्ये मोठी वाढ पहायला मिळत आहे. चीकन, मांस, दूध, अंडी, खाद्यतेल अशा सर्वच गोष्टी महाग झाल्या आहेत. पेट्रोल, डिझेलच्या तुलनेमध्ये या वस्तूंच्या दरात मोठी वाढ पहायला मिळत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये खाद्य तेलाचे भाव प्रति लिटर 100 रुपयांवरून 200 पार पोहोचले आहेत. तर डेरी उत्पादनाच्या किमती देखील भरमसाठ वाढल्या आहेत. मात्र अद्यापही महागाईचा मुद्दा समोर आल्यास केवळ इंधन दरवाढीचीच चर्चा होते.

खाद्य तेलाच्या दरात वाढ

भारत हा कच्च्या तेलासाठी जसा इतर देशांवर अवलंबून आहे, त्याचप्रकारे खाद्य तेलासाठी देखील आपण इतर देशांवर अवलंबून आहोत. भारत हा खद्यतेलाचा मोठा आयातदार देश आहे. आपण पाम ऑइल हे इंडोनेशिया तर सुर्यफूलाच्या तेलाची आयात युक्रेनकडून करतो. मात्र सध्या इंडोनेशियामध्ये पाम ऑइलचा तुटवडा आहे, तर रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असेलेल्या युद्धामुळे सुर्यफुलाच्या तेलाची आयात ठप्प झाली आहे. आधीच खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले आहेत, त्यामध्ये आता खाद्यतेलाचा तुटवडा निर्माण झाल्यास तेलाचे भाव आणखी वाढू शकतात. गेल्या आठ वर्षांची तुलना केल्यास पेट्रोल, डिझेलपेक्षा खाद्यतेलाचे भाव हे 20 टक्क्यांनी अधिक वाढले आहेत.

डेरी प्रोडक्ट

डेरी प्रोडक्ट जसे की, दही, तूप, दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांच्या किमती देखील झपाट्याने वाढत आहेत. आठ वर्षांपूर्वी दुधाचे दर हे प्रति लिटर 20 ते 25 रुपये लिटरच्या आसपास होते. मात्र ते आज प्रति लिटर 60 रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. म्हणजेच दुधाच्या दरामध्ये तीन पट वाढ झाली आहे. मात्र त्यातुलनेत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अद्यार दुपटही वाढ झालेली नाही. आठ वर्षांपूर्वी पेट्रोल डिझेल दर हे 70 ते 80 रुपयांच्या आसपास होते. ते आता 120 रुपयांवर पोहोचले आहेत.

दैनंदीन वस्तूं (FMCG) वस्तूंच्या खरेदीमध्ये घट

नुकत्याच समोर आलेल्या एक अहवालानुसार दैनंदीन गरजेच्या वस्तू खरेदीचे प्रमाण कमी झाले आहे. यामागे वाढती माहागाई हे प्रमुख कारण आहे. वस्तूंचे दर इतके वाढले आहेत की नागरिकांनी खरेदीला लगाम घातला आहे. याचा सर्वाधिक फटका हा दक्षिण भारताला बसला आहे. तामिळनाडूनमध्ये दैनंदीन वस्तू खरेदीचे प्रमाण 18 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. तेलंगना आणि आंध्रप्रदेशमध्ये दैनंदीन वस्तूंच्या खरेदीचे प्रमाण अनुक्रमे 17 आणि 15 टक्क्यांनी कमी झाले आहे. तर हेच प्रमाण महाराष्ट्रात 9 टक्के इतके आहे.

संबंधित बातम्या

Gautam Adani: 2 वर्षात 300 टक्क्यांनी संपत्तीत वाढ! जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनण्यासाठी गौतम अदानी सज्ज

वर्षभरात मिळणार ‘गेमिंग’ व्यवसायात एक लाखाहून अधिक नोकऱ्या.. गृहिणी, शिक्षक, सुशिक्षीत युवकांना ‘असाइनमेंट’ बेस काम

Volvo Car: आलिशान वोल्वो कारची किंमत तब्बल तीन लाखांनी वाढली! आता नेमकी किंमत किती? जाणून घ्या

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.