Cyber Fraud : जामताडाच नाही तर आता या सायबर भामट्यांचाही धोका, तुमचे बँक खाते एका मिनिटात होईल साफ..

Cyber Fraud : तुमच्या बँक खात्यावर केवळ जामताडात्यातीलच नाही तर येथील सायबर भामट्यांचाही डोळा आहे..

Cyber Fraud : जामताडाच नाही तर आता या सायबर भामट्यांचाही धोका, तुमचे बँक खाते एका मिनिटात होईल साफ..
रहा सावध..Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 06, 2022 | 7:43 PM

नवी दिल्ली : देशातील अनेक सायबर फसवणुकीचे (Cyber Fraud) कनेक्शन थेट झारखंडमधील जामताडा (Jamtada) या गावाशी असते. अनेकदा या गोष्टी तांत्रिक तपासात समोर आल्या आहेत. या गावाचा इतिहास तुम्हाला इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे. पण येथील सायबर भामट्यांनाही आव्हान उभे ठाकले आहे. तर देशातील बँक खातेदारांचा (Bank Account Holders) ताप वाढला आहे.

सायबर फसवणुकीचा सर्वाधिक धोका भारतीय बँकिंग-आर्थिक आणि विमा क्षेत्राला बसला आहे. एका अहवालानुसार, सायबर हॅकिंगचे प्रकार उत्तर अमेरिकेत कमी झाले असून भामट्यांनी पॅसेफिक, युरोप आणि आशियावर लक्ष्य केंद्रीत केले आहे.

CloudSEK ने हा अहवाल तयार केला आहे. त्यांनी संशोधन करून हा अहवाल तयार केला आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात वाढलेल्या सायबर गुन्ह्यातून हा आकडा समोर आला आहे. त्यानुसार भारतीय वित्त-बँकिंग आणि विमा क्षेत्रावर सायबर हल्ले वाढले आहेत.

हे सुद्धा वाचा

याचा अर्थ, आता केवळ देशातीलच नाही तर देशाबाहेरील सायबर भामट्यांकडूनही तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला सातत्याने अलर्ट राहणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रलोभनाला, आमिषाला तुम्ही बळी पडता कामा नये.

2021 मध्ये सायबर हॅकिंगच्या 469 घटना समोर आल्या आहेत. तर या वर्षी 2022 मध्ये एकट्या विमा क्षेत्रालाच सायबर भामट्यांनी लक्ष्य केले आहे. फसवणुकीच्या जवळपास 283 घटना समोर आल्या आहेत.

युरोप, अमेरिकेपेक्षा भारतातील सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून, त्यामागे परदेशी सायबर भामट्यांचाही हात असल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे. त्यामुळे या फसवणुकीपासून ग्राहकांनी स्वतः सजग राहणे आवश्यक आहे.

भारतात डिजिटलयाझेशन आणि ऑनलाईन व्यवहारांचे प्रमाण गेल्या तीन वर्षांत झपाट्याने वाढले आहे. कॅशलेस मार्केटकडे भारताची वाटचाल सुरु आहे. त्याचाच फायदा सायबर भामटे घेत आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.