भारतीय रेल्वेचे ‘ रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ का आहे खास? जाणून घ्या माहिती..
भारतीय रेल्वेचे ' रेस्टॉरंट ऑन व्हील ' एवढे खास का आहे, भारतीय रेल्वेने या रेस्टॉरंटची सुरूवात कुठून केली होती, या सर्वांबद्दल माहिती जाणून घेऊया.
भारतीय रेल्वेने (Indian Wheel) ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ची सुरूवात पश्चिम बंगालच्या (West Bengal) आसनसोल रेल्वे स्टेशनपासून केली आहे. हे देशातील पहिले असे रेल्वे स्टेशन आहे, जेथे रेल्वेने रेस्टॉरंट ऑन व्हील (Restaurant on Wheels) उघडले आहे. याच्या नावावरूनच लक्षात येतं की यामध्ये एका रेल्वे कोचमध्येच संपूर्ण रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटचा बाह्यभाग तर सुंदर आहेच, पण त्याचे इंटिरिअर तर अप्रतिम आणि मन मोहून टाकणारे आहे. ‘ आहार ‘ (Aahar) – असे या रेस्टॉरंटचे नाव असून ते सर्व लोकांसाठी खुले आहे. 26 फेब्रुवारी 2020 साली हे रेस्टॉरंट सुरु करण्यात आले होते. असेच आणखी एक रेस्टॉरंट नागपूरमध्ये (Nagpur) 4 फेब्रुवारी 2020 साली उघडण्यात आले होते. जाणून घेऊया या रेस्टॉरंटबद्दलच्या काही विशेष गोष्टी…
कोणाला मिळू शकतो रेस्टॉरंट ऑन व्हीलचा लाभ ?
भारतीय रेल्वेच्या रेस्टॉरंट ऑन व्हील्सचा लाभ प्रवाशांना मिळू शकेल. त्यांच्याव्यतिरिक्त सामान्य जनताही या रेस्टॉरंटचा लाभ घेऊ शकते. या रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे जेवण उपलब्ध असेल.
मेमो कोचने बनले आहे भारतीय रेल्वेचे रेस्टॉरंट ऑन व्हील्स
मेमो ट्रेनचे जे कोच रुळांवर धावत नाहीत अथवा वापरात नाही, त्यांना एक नवा लूक देऊन त्याचे रेस्टॉरंटमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. स्टॉरंट ऑन व्हील्स असे नाव देऊन रेल्वे स्टेशनमध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठी हे रेस्टॉरंट तयार करण्यात आले आहे. जिथे बसून प्रवासी अथवा सामान्य नागरिक भोजनाचा आनंद लुटू शकतील.
काय आहे रेस्टॉरंट ऑन व्हील्स मधील विशेष बाब ?
स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी या रेस्टॉरंटमध्ये अप्रतिम इंटिरिअर डिझाइन करण्यात आले आहे. डेकोरेनश करून या रेस्टॉरंटला एक सुंदर लूक देण्यात आला आहे. ज्यामुळे प्रवाशांसह जास्तीत जास्त सामान्य नागरिकही रेस्टॉरंट ऑन व्हीलमध्ये येऊन छान जेवणाचा आनंद घेऊ शकतील.