रेल्वेची ‘भट्टी’ पुन्हा पेटणार, सर्व गाड्यांत किचन सुरू; 14 तारखेपासून खानपान सेवा
कोविड काळात खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वेत जेवणाची सुविधा स्थगित करण्यात आली होती. केवळ मोजक्याच रेल्वे गाड्यांत हवाबंद खाद्यपदार्थांचे वितरण केले जात होते.
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची (INDIAN RAILWAY) चाकं कोविड प्रकोपामुळं मंदावली होती. लसीकरणाचं वाढतं प्रमाण व आरोग्य सुविधांच्या उपलब्धतेमुळं कोविड प्रसाराला पायबंद बसला आहे. भारतीय रेल्वे पुन्हा गतिमान झाली आहे. कोविड काळात खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वेत जेवणाची सुविधा स्थगित करण्यात आली होती. केवळ मोजक्याच रेल्वे गाड्यांत हवाबंद खाद्यपदार्थांचे वितरण केले जात होते. दरम्यान, भारतीय रेल्वे प्रशासनाने (RAILWAY MANAGEMENT) आढावा घेऊन पुन्हा रेल्वेत जेवण पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. लाखो प्रवाशांची गैरसोय रेल्वेच्या निर्णयामुळे टळणार आहे. येत्या 14 फेब्रुवारीपासून सर्व रेल्वे गाड्यांत आयआरसीटीसी द्वारे जेवणाची व्यवस्था पूर्वीप्रमाणेच सांभाळी जाणार आहे. इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRTC) ही भारतीय रेल्वेची एक उप-कंपनी आहे.
‘असे’ असेल खानपान सुविधेचे नियोजन
1. आयआरटीसीने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानंतर रेल्वेतील जेवणाची व्यवस्था पुन्हा सुरू केली जात आहे. आतापर्यंत 428 रेल्वेत जेवणाची सुविधा पुरविली जात आहे. एकूण धावत्या रेल्वेच्या तुलनेत जेवणाची सुविधा 21 डिसेंबर पर्यंत 30% रेल्वे गाड्यांत पुरविण्यात येत आहे.
2. आयआरटीसीने टप्प्यानिहाय जेवणाची व्यवस्था करण्याचे नियोजन आखले आहे. 22 जानेवारी पर्यंत 80% आणि उर्वरित 20% गाड्यांची सुविधा पूर्ववत केली जाईल. प्रीमियम रेल्वे (राजधानी, शताब्दी, दुरंतो) मध्ये पूर्वीपासूनच जेवण उपलब्ध केले जात आहे.
3. कोविड प्रकोपामुळे रेल्वेकडून 23 मार्च 2020 पासून कोविड सुरक्षा उपाय म्हणून खानपान सेवा स्थगित करण्यात आल्या होत्या. कोविडचा रुग्णसंख्येचा आलेख घसरल्यानंतर पुन्हा मर्यादित रेल्वे गाड्यांत खानपान सुविधा पूर्ववत करण्यात आली.
4. आरोग्य मंत्र्यालयाच्या प्रोटोकॉलनुसार, रेल्वेत बनविलेले जेवण देण्यास बंदी घालण्यात आली होती. रेल्वेतील स्वयंपाक गृहात देखील जेवण बनविण्यात येत नव्हते. खासगी खाद्यपदार्थांचा पुरवठा करणाऱ्या कंपनी प्रवाशांना खानपान सुविधा पुरवत होत्या.
5. आयआरटीसीकडे एक हजारांहून अधिक कर्मचारी रेल्वेत खानपान व्यवस्थेसाठी तैनात असतात. खानपान व्यवस्थेतून भारतीय रेल्वेला मोठ्या प्रमाणात महसूलाची प्राप्ती होते. खानपानाची गुणवत्ता आणि दर्जाकडे रेल्वेचे विशेष नियंत्रण असते.
6. रेल्वेमधील खानपान सेवा, तिकिट विक्री तसेच रेल्वेसंबंधित पर्यटन इत्यादी सर्व जबाबादाऱ्यांचे नियम आयआरटीसीद्वारे केले जाते. तब्बल एक लाखांहून अधिक प्रवाशांच्या जेवणाची सोय रेल्वेत केली जाते.
संबंधित बातम्या
नारळाची करवंटी फेकून देण्याचा मूर्खपणा करु नका! हे तर पैसे कमावण्याचं साधन आहे
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रः व्याजसह कर सवलतीचा ही फायदा गुंतवणूक तुमच्या फायद्याची..!
LIC IPO news: एलआयसी विमाधारकांना बंटर लॉटरी? आयपीओमध्ये किती मिळणार सूट, आज कळणार माहिती