भारतीयांना या देशांमध्ये मिळतो सहज प्रवेश, व्हीसाची गरज लागत नाही
आपल्याला नेपाळ या शेजारील राष्ट्रात जाण्यासाठी व्हीसाची काही गरज लागत नाही अशी जुजबी माहीती असेल, परंतू जगात असे किमान दहा देश आहेत जेथे फिरण्यासाठी व्हीसाची गरज लागत नाही.
![भारतीयांना या देशांमध्ये मिळतो सहज प्रवेश, व्हीसाची गरज लागत नाही भारतीयांना या देशांमध्ये मिळतो सहज प्रवेश, व्हीसाची गरज लागत नाही](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/06/30022725/maldives.jpg?w=1280)
नवी दिल्ली : परदेशात जायचे असेल तर केवळ पासपोर्ट ( Passport ) उपयोगाचा नसतो. तर व्हीसाची ( Visa ) देखील गरज असते. एका देशातून दुसऱ्या देशात जायचे असेल आणि तेथे रहायचे असले तर पासपोर्ट बरोबरच व्हीसाची देखील आवश्यकता असते. परंतू जगात काही असेही देश आहेत, जेथे जाण्यासाठी भारतीय नागरिकांना ( Indian citizen ) व्हीसा शिवाय देखील थेट प्रवेश मिळतो. या देशामध्ये आपले नागरिक व्हीसा शिवाय जाऊन राहू शकतात. पाहूया असे कोणते देश आहेत.
मालदीव –
हिंद महासागरातील एक द्वीप असलेले मालदीव आपल्या शानदार रिसॉर्ट आणि नैसर्गिक सौदर्यासाठी प्रख्यात आहे. भारतीय पासपोर्ट असलेल्या व्यक्तीला येथे व्हीसा शिवाय 90 दिवसांपर्यंत रहाता येऊ शकते.
नेपाळ –
उत्तरेकडील आपला शेजारी असलेला नेपाळ या देश गिर्यारोहकांसाठी प्रसिद्ध आहे. येथून गिर्यारोहक एव्हरेस्ट देखील सर करायला जात असतात. नेपाळमध्ये भारतीय पासपोर्ट धारकाला 90 दिवसांपर्यंत आराम राहता येऊ शकते. तसेच फिरता येऊ शकते.
भूतान –
आपला शेजारी असलेला हिमालयात वसलेला भूतान हा छोटा देश तेथील नैसर्गिक सौदर्यासाठी ओळखला जातो. या देशाला जगातील सर्वात आनंदी देशापैकी एक मानले जाते. या देशात देखील भारतीय पासपोर्ट असलेली व्यक्ती 30 दिवसापर्यंत विना व्हीसा आरामात राहू शकतो.
मॉरीशस –
हिंद महासागराजवळील मॉरीशस हा एक पर्यटनासाठी अतिशय लोकप्रिय असलेला देश आहे. येथील सुंदर समुद्र किनारे आणि तळ दिसणारे स्वच्छ नितळ पाणी प्रसिद्ध आहे. भारतीय पासपोर्ट धारक या देशात 90 दिवसापर्यंत व्हीसा शिवाय राहू शकतात.
डोमिनिका –
हे एक कॅरीबियन बेटाचे छोटे राष्ट्र असून आपल्या हरित वृक्षांच्या वनामुळे तसेच नैसर्गिक झऱ्यामुळे हा देश ओळखला जातो. भारतीय पासपोर्ट धारकांना येथे 180 दिवसांपर्यंत बिना व्हीसा रहाण्याची मुभा देण्यात आली आहे.
वानुअतु –
दक्षिण प्रशांत मधील वानुअतु हे एक छोटे द्वीप आहे, हा देश आपल्या ओबडधोबड परिदृश्य आणि सक्रिय ज्वालामुखीमुळे ओळखला जातो. भारतीय पासपोर्ट धारकाला वानुअतुमध्ये व्हीसा सिवाय एक महिन्यांपर्यंत रहाता येऊ शकते.
त्रिनिदाद आणि टोबॅगो –
एक आणखीन कॅरेबियन देश बनून त्रिनिदाद आणि टोबॅगो आपल्या कार्निवल समारंभांमुळे आणि सुंदर किनाऱ्यामुळे पर्यटनासाठी ओळखला जात असतो. या देशात देखील भारतीय पासपोर्ट धारकाला व्हीसा शिवाय तब्बल तीन महिन्यांपर्यत रहाता येते.
जमॅका –
आपली जीवंत संस्कृती तसेच रेगे लोकसंगीतासाठी ओळखला जाणारा जमैका कॅरेबियन एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. या देशात भारतीय पासपोर्ट धारक व्हीसा शिवाय तीन महिन्यापर्यत राहू शकतो.
फिजी –
दक्षिण प्रशांत महासागरानजिक असलेल्या फिजी देश पर्यटनासाठी प्रसिध्द असून येथील समुद्र किनारे आणि नैसर्गिक सौदर्य हनीमुनाला जाणाऱ्या कपलसाठी प्रसिध्द आहे. भारतीय पासपोर्टधारकांना येथे 120 दिवसापर्यत व्हीसा शिवाय राहण्याची आणि फिरण्याची परवागनी मिळते.
कुकु आयलॅंड्स –
दक्षिण प्रशांत सागराजवळील कुक आयलॅंडस हा 15 छोट्या द्वीपांचा समुह आहे. हा छोट्या बेटांचा नैसर्गिक सौदर्याने नटलेला प्रदेश सुंदर समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. भारतीय पासपोर्ट धारकांना या कुक आयलॅंड्सवर व्हीसा शिवाय 31 दिवस रहाता येते. याशिवाय काही अन्य देशही आहेत जेथे भारतीय पासपोर्ट धारकांना व्हीसा शिवाय प्रवेश मिळतो.
( ही माहीती सर्वसामान्य ज्ञानावर आधारीत आहे. तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच प्रत्यक्ष प्रवास करावा )