आता बसच्या तिकिटामध्ये करा परदेश वारी; इंडिगोकडून प्रवाशांसाठी बंपर ऑफर, तिकिटांच्या दरात मोठी कपात
इंडिगो ही भारतातील बड्या एअरलाइन्स कंपन्यांपैकी एक आहे. इंडिगो अनेकदा आपल्या प्रवाशांसाठी स्वस्तात प्रवास करण्याची ऑफर लाँच करत असते. अशातच पुन्हा एकदा इंडिगोकडून आपल्या प्रवाशांसाठी खास ऑफर लाँच करण्यात आली आहे.
इंडिगो ही भारतातील बड्या एअरलाइन्स कंपन्यांपैकी एक आहे. इंडिगो अनेकदा आपल्या प्रवाशांसाठी स्वस्तात प्रवास करण्याची ऑफर लाँच करत असते. अशातच पुन्हा एकदा इंडिगोकडून आपल्या प्रवाशांसाठी खास ऑफर लाँच करण्यात आली आहे. इंडिगोकडून ‘गेट अवे सेलची’ घोषणा करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत इंडिगोकडून आपल्या ग्राहकांना देशांतर्गत आणि देशाबाहेरील प्रवास तिकिटांवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देण्यात आला आहे. इंडिगोची ही ऑफर 25 डिसेंबर 2024 पर्यंत लागू असणार आहे.
इंडिगोकडून आपल्या प्रवाशांसाठी खास ही ऑफर लाँच करण्यात आली आहे. ज्या प्रवाशांना देशांतर्गत प्रवास करायचा आहे ते प्रवासी 23 जानेवारीपासून ते 30 एप्रीलपर्यंतचे तिकीट बूक करू शकतात. देशांतर्गत प्रवासाच्या तिकिटाची किंमत अवघ्या 1,199 रुपयांपासून सुरू होते, तर इंटरनॅशनल प्रवासाची किंतम ही फक्त 4,499 पासून सुरू होत आहे. एवढंच नाही तर इंडिगोकडून काही खास कार्डवर अतिरिक्त 15 टक्क्यांपर्यंत सूट देखील देण्यात आली आहे.
या गोष्टींचाही फायदा घेऊ शकता
यामध्ये तुम्ही प्रीपेड एक्सेस बॅगेज ऑप्शन (15kg, 20kg, और 30kg) स्टॅडर्ड सीट सिलेक्शन आणि XL सीटची देखील सुविधा घेऊ शकता. ज्यामध्ये अॅड ऑनची किंमत देशांतर्गत उड्डानासाठी 599 रुपये तर आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी 699 रुपयांपासून सुरू होते.
क्रेडिट कार्डवर अतिरिक्त सूट
जर तुमच्याकडे फेडरल बँकेचं क्रेडिट कार्ड असेल तर तुमचा आणखी फयदा होऊ शकतो. तुम्हाला त्यावर भाड्याच्या अतिरिक्त आणखी 15 टक्के सूट मिळणार आहे.देशांतर्गत उड्डानावर 15 टक्के तर आंतरराष्ट्रीय उड्डाणावर 10 टक्के सूट मिळणार आहे.
साधारणपणे तुम्हाला देशामध्ये कुठेही बसनं अथवा टॅक्सीने प्रवास करायचा असेल तर त्या बसचं भाडं कमीत कमी हजार रुपयांपेक्षा जास्तच असते, थर्टी फस्टच्या आसपास तर पर्यटन स्थळांच्या तिकीटांमध्ये भरमसाठ वाढ होते. मात्र नव वर्षाच्या तोंडावर इंडिगोकडून प्रवाशांसाठी ही स्वस्तात मस्त ऑफर लाँच करण्यात आली आहे. ज्यामध्ये तुम्ही अवघ्या 1,199 रुपयांमध्ये तुमच्या पहिल्या विमान प्रवासाचं स्वप्न पूर्ण करू शकतात, ही एक चांगली संधी आहे.