देशात महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल, डिझेलपासून ते सीएनजीपर्यंत आणि भाजीपाल्यापासून ते अन्नधान्यापर्यंत सर्वच गोष्टींचे दर गगनाला भिडले आहेत. आता त्यात आणखी भर पडली आहे ती म्हणजे जीऱ्याची (Cumin) एका रिपोर्टमधून प्राप्त झालेल्या अहवालानुसार येत्या काही दिवसांत जिऱ्याचे दर रेकॉर्डब्रेक स्थरावर पोहचण्याची शक्यता आहे. क्रिसिल (Crisil) कडून महागाईसंदर्भात नुकताच एक अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालात म्हटले आहे की, यंदा जिऱ्याचे लागवड कमी झाली आहे. त्यामुळे उत्पादन देखील कमी होण्याची शक्यता आहे. याचा फटका जिऱ्याच्या दराला बसणार असून, पुढील काही दिवसांमध्ये जिऱ्याच्या दरात (Price) 30 ते 35 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जीरे यंदा पाच वर्षांच्या सर्वोच्च स्थरावर पोहोचू शकता. जीऱ्याचे लागवड क्षेत्र कमी होण्यामागे पवसाची अनियमितता हे प्रमुख कारण सांगितले जात आहे.
क्रिसिलने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जिऱ्याचे उत्पादन कमी होण्यामागे दोन प्रमुख कारणं आहेत ते म्हणजे यंदा मुळातच जिऱ्याचे लागवड क्षेत्र कमी आहे. त्यात भरीसभर म्हणजे यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याने त्याचा फटका देखील पिकाला बसला आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षामध्ये जीऱ्याच्या दरामध्ये 30 ते 35 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा जिऱ्याचे दर 165-170 रुपये प्रति किलोवर जाण्याची शक्यता आहे. जिरा लागवडीच्या क्षेत्रात तब्बल 21 टक्क्यांची घट झाली असून, ते 9.83 लाख हेक्टरवर पोहोचले आहे. येत्या काळात पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्याने जिऱ्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
अहवालानुसार देशात जिरा लागवडीचे क्षेत्र घटले आहे. मात्र दुसरीकडे मोहीर आणि हरभाऱ्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. देशात खाद्यतेलाच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मात्र नवे मोहरीचे उत्पादन आल्यानंतर मोहरीच्या तेलाचे दर काही प्रमाणात कमी होऊ शकतात. गेल्या वर्षी ज्या पिकांना बाजारात चांगली किंमत मिळू शकते अशाच पिकांची लागवड शेतकऱ्यांनी केल्याचे पहायला मिळत आहे.