Investment Tips : अंधारुन फार आले, गुंतवणूक मजबूत ठेवा! याठिकाणी पैसा एकदम सेफ, परतावाही तगडा
Investment Tips : बचतीच्या अनेक योजना आज बाजारात उपलब्ध आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते. पण तुम्हाला रिस्क नको असेल आणि परतावा चांगला हवा असेल तर गुंतवणुकीच्या विविध पर्यायांचा विचार करु शकता.
नवी दिल्ली : तुमचा पगार कमी असो वा जास्त, प्रत्येकाने काही ना काही बचत (Saving) करणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीने बचतीची आणि गुंतवणुकीची सवय अंगी बाणवायला हवी. कारण आजची बचत ही उद्याची ठेव असते. त्यातून अनेक गोष्टी तुम्हाला साध्य करता येतात. तुमचे उद्दिष्ट गाठता येते. तुम्हाला ऐनवेळी ही रक्कम मदतीला येते. सुरक्षित गुंतवणुकीचे अनेक पर्याय (Safety Savings Options) आहेत. ज्याठिकाणी रिस्क कमी आहे. जोखीम कमी असल्याने आणि परतावा चांगला मिळत असल्याने तुमचा फायदा होतो. एवढेच नाही तर काही योजनांमध्ये कर सवलत पण मिळविता येते. त्यामुळे अशा योजनांमधील गुंतवणूक, बचत भविष्यासाठी फायदेशीर ठरते.
सोन्यातील गुंतवणूक सर्वात सुरक्षित आणि जादा परतावा देणारी मानण्यात येते. हा गुंतवणुकीचा चांगला आणि पारंपारिक पर्याय आहे. अर्थात थेट सराफा पेढीवर जाऊन सोने विकत घेण्याचीच गरज नाही. आता सोन्यातील इतरही अनेक पर्याय समोर आले आहेत. त्यात गोल्ड ईटीएफ (Gold ETF), सोन्याचा शिक्का, सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम, तसेच सराफा पतपेढ्या गुंतवणुकीसाठी राबवत असलेल्या विविध योजनांचा समावेश होतो. त्यातून चांगला परतावा मिळविता येतो. तसेच ही गुंतवणूक सुरक्षित असते. हे सोने घरी तिजोरीत ठेवण्याची गरज नसते. हे सोने चोरी होण्याची भीती नसते.
पोस्ट ऑफिसची आवर्ती ठेव योजना ( RD ) पाच वर्षांसाठी असते. पण या योजनेत तुम्हाला कालावधी वाढविता येतो. पाच वर्षे ही योजना पुढे वाढविता येते. सध्या आरडीवर 5.8 टक्के व्याज मिळते. पोस्ट ऑफिसची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना (NSC) ही अशीच एक लोकप्रिय योजना आहे. ही योजना पाच वर्षांसाठी मॅच्युअर होते. या योजनेत वार्षिक 7% व्याज मिळते. व्याजावर ही दुहेरी फायदा मिळतो. म्हणजे कम्पाऊंडिंगचा फायदा होतो.
पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट स्कीम (Post Office TD Account) हा चांगला पर्याय आहे. या योजनेत एक रक्कमी 1 लाख रुपये जमा केल्यास तुम्हाला 5 वर्षानंतर चांगला परतावा मिळतो. मॅच्युरिटीवर तगडा रिटर्न मिळतो. तर पाच वर्षांच्या या योजनेवर आयकर खात्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा दावा ही दाखल करता येतो. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत (Public Providend Fund Scheme) गुंतवणूक आजच्याघडीला मालामाल करणारी आहे. या योजनेवर सध्या 7.1 टक्क्यांचा परतावा मिळतो. या योजनेत 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो.
Bond मधील गुंतवणूकही फायदेशीर आहे. बाँड ही निश्चित परतावा देणारी योजना आहे. महागाई आणि इतर आर्थिक अस्थिरतेत बाँडमधील गुंतवणूक फायदेशीर ठरते. अनेक गुंतवणूकदार सरकारी आणि कॉर्पोरेट बाँडमध्ये गुंतवणूक करतात.
तज्ज्ञांच्या मते, नोकरदार वर्गाने गुंतवणुकीचा एक हिस्सा म्युच्युअल फंडात गुंतवणे आवश्यक आहे. एसआयपीच्या जोरावर इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरते. म्युच्युअल फंडात शेअर बाजारातील तेजीचा फायदा मिळतो. काही जण EPFO मधील गुंतवणूक योग्य मानतात. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना पीएफमधील ही गुंतवणूक फायदेशीर वाटते. पण गेल्या काही वर्षांपासून पीएफवरील व्याजदरात सातत्याने घसरण होत आहे. सध्या हा दर 8.1 टक्के इतका आहे.