Insurance Policy : आला नवीन नियम, इन्शुरन्स पॉलिसीच्या इतक्या प्रीमियमवर भरावा लागेल कर!

Insurance Policy : आयकर विभागाने जीवन विमा पॉलिसीसंबंधी नवीन नियम आणला आहे. त्यानुसार विमा योजनेच्या इतक्या प्रीमियमवर तुम्हाला कर द्यावा लागू शकतो. अशी पॉलिसी जर तुम्ही या एप्रिलपासून घेतली असेल तरी त्याला हा नियम लागू असेल.

Insurance Policy : आला नवीन नियम, इन्शुरन्स पॉलिसीच्या इतक्या प्रीमियमवर भरावा लागेल कर!
Follow us
| Updated on: Aug 17, 2023 | 10:07 AM

नवी दिल्ली | 17 ऑगस्ट 2023 : प्राप्तिकर खात्याने जीवन विमा (Life Insurance) पॉलिसीसंबंधी एक नवीन नियम आणला आहे. आता विमाधारकांना त्यांच्या विम्याच्या हप्त्यावर कर (Tax on Premium) भरावा लागेल. अर्थात हा नियम सरसकट सर्वांनाच लागू नाही. त्यासाठी काही अटी आणि शर्ती निश्चित करण्यात आल्या आहे. एका निश्चित मर्यादेनंतर प्रीमियमची रक्कम असेल तर विमाधारकांना कर भरावा लागेल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (The Central Board of Direct Taxes-CBDT) आयकर सुधारीत नियम, 2023 मध्ये बदलासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. जर अशी जीवन विमा पॉलिसी विमाधारकाने या 1 एप्रिल वा त्यानंतर सुरु केले तर त्यांना हा नियम लागू होतो. जाणून घ्या काय आहे हा नियम..

काय आहे नियम

या नियमानुसार, जीवन विमा पॉलिसीच्या प्रीमियमसाठी 5 लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम करपात्र असेल. आता जीवन विमा पॉलिसीसाठीची 5 लाख रुपयांहून अधिकची रक्कम कर मुक्त नसते. जीवन विमा पॉलिसी विमाधारकाने या 1 एप्रिल वा त्यानंतर सुरु केले तर त्यांना पण हा नियम लागू असेल.

हे सुद्धा वाचा

काय झाला बदल

इनकम टॅक्सच खात्याने या बदलाची माहिती दिली. 1 एप्रिल 2023 रोजी नंतर घेण्यात आलेल्या विमा पॉलिसीवर नियम 10(10डी) अंतर्गत मॅच्युरिटी बेनिफिटवर कर सवलत देण्यात येईल. पण जर विमाधारकाने एका वर्षात विमा पॉलिसीच्या एकूण हप्त्यापोटी पाच लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम भरल्यास त्याला कर द्यावा लागेल. 5 लाख रुपयांपेक्षा जास्त हप्त्यावर कर द्यावा लागेल.

कमाईवर कर

पाच लाखांपेक्षा अधिक प्रीमियम भरल्यानंतर होणारी कमाई किती हे पाहण्यात येईल. नियमानुसार कर लावण्यात येईल. युलिप सोडून इतर जीवन विमा पॉलिसीवर कर आकरण्याची सूचना केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये करण्यात आली होती.

मृत्यूनंतर मॅच्युरिटी रक्कमवर कर नाही

तज्ज्ञांच्या मते, पाच लाख रुपयांहून अधिकचा प्रीमियम भरल्यास त्याआधारे किती कमाई झाली त्याचा हिशोब करुन कर लावण्यात येईल. हा कर मॅच्युरिटीवर मोजला जाईल. एखाद्या विमाधारकाच्या मृत्यूनंतर प्रीमियमच्या रक्कमेवर कर लागू करण्यात येणार नाही, असे आयकर खात्याने स्पष्ट केले आहे.

परताव्याची हमी

बाजारात नवीन विमा पॉलिसी दाखल झाल्या आहेत. त्यात परताव्याची हमी मिळते. या पॉलिसी 7 ते 7.5 टक्क्यांचा परतावा देतात. पारंपारिक गुंतवणूक योजनांपेक्षा हा रिटर्न अधिक आहे. या योजनांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतचा वार्षिक प्रीमियम अगदी करमुक्त आहे. जर एखादी व्यक्ती या योजनेत 5 वर्षांकरीता दरमहा 20,000 रुपये गुंतवणूक करत असेल तर तो या योजनेत 12 लाख रुपयांची गुंतवणूक करतो. दहा वर्षांत या योजनेत ही रक्कम 20.5 लाख रुपये होईल.

युनिट-लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसी

विनाजोखीम गुंतवणूक करण्यासाठी युनिट-लिंक्ड इंश्योरेंस पॉलिसी चांगली आहे. ही योजना बाजारावर आधारीत असते. बाजाराने उसळी घेतल्यावर गुंतवणूकदारांना जोरदार परतावा मिळतो. या योजनेत 12 ते 15 टक्के रिटर्न मिळू शकतो. याशिवाय ही योजना कर बचतीसाठी मदत करते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.