Cryptocurrency : क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केलीय, घाबरू नका!, तुमचा पैसा आता सुरक्षित राहणार, केंद्राच्या नव्या उपाययोजना जाहीर
अलीकडेच लोक क्रिप्टो करन्सीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतायेत. मात्र, गुंतवणूक करणाऱ्यांपैकी अर्ध्याअधिक लोकांना आपल्या पैशाची चिंता असते. याच लोकांसाठी एक खुशखबर आहे. केंद्र सरकारने क्रिप्टे करन्सीच्या गुन्ह्यांच्या नियमनासाठी काही नियम तसेच मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत. वाचा केंद्राच्या या नव्या नियमाविषयी...
नवी दिल्ली : अलीकडेच लोक क्रिप्टो करन्सीमध्ये (Cryptocurrency) मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतायेत. मात्र, गुंतवणूक करणाऱ्यांपैकी अर्ध्याअधिक लोकांना आपल्या पैशांची चिंता असते. याच लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने क्रिप्टे करन्सीच्या गुन्ह्यांच्या नियमनासाठी काही नियम तसेच मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत. भारताचे सध्या क्रिप्टो करन्सीबाबत धोरण (Policy) नाही. मात्र, सरकारला देशातील गुंतवणूकदारांची चिंता आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्राने काही सूचना आणि मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत. क्रिप्टो करन्सीच्या नियमासंदर्भात केंद्र सरकारची ही पहिलीच वेळ आहे. क्रिप्टो संदर्भात भारतातील कायदा अंमलबजावणी संस्थांसाठी एक SOP जारी केला आहे. या संस्थेने क्रिप्टोशी संबंधित गुन्ह्यांच्या (Crimes) तपासासाठी एक मानक प्रक्रिया जारी केली आहे. जप्त केलेल्या क्रिप्टोकरन्सीचे काय करायचे ते या प्रक्रियेत स्पष्ट करण्यात आलंय.
फसवणुकीपासून कसे वाचाल?
ब्यूरो ऑफ पोलिस रिसर्च डेव्हलपमेंटने (BPRD) प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्श तत्वांनुसार कायदेशीर संस्थांनी त्यांच्याकडे क्रिप्टो वॉलेट ठेवावे. या वॉलेटमध्ये डिजिटल मालमत्ता ठेवता येईल. याशिवाय एजन्सींनी क्रिप्टो एक्सचेंजेसच्या संपर्कात राहायला हवं. यामुळे संशयिताचे वॉलेट ब्लॉक करता येऊ शकते. न्यायालयात सांगण्यासाठी सबळ पुरावे सादर करणे देखील महत्त्वाचं असतं. त्यासाठी क्रिप्टो वॉलेट उघडण्याच्या प्रक्रियेची पूर्णपणे नोंद करावी. त्यात काहीही बाकी ठेऊ नये, यामुळे आपल्याला काहीही चुकीचं घडल्यास पोलिसांना त्याची पुरेपुर माहिती पुरवता येते आणि न्यायालयातही त्याची माहिती देता येते.
30 टक्के कर
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारीला सादर केलेल्या अर्थसंकल्पात आभासी डिजिटल मालमत्तांवर 30 टक्के कर लावण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावाला क्रिप्टो एक्सचेंजेसने विरोध केला आणि सरकारला अनेक सूचना केल्या. मात्र, या सूचनांचा अद्याप विचार झालेला नाही. तर 1 एप्रिल 2022पासून लागू झालेल्या क्रिप्टो गुंतवणूकदारांना क्रिप्टो उत्पन्नावर 30 टक्के कर भरावाच लागणार आहे. क्रिप्टो व्यवहारांवर एक टक्का टीडीएस देखील भरावा लागेल.आता कहे सगळं असलं तरी येणाऱ्या नव्या सायबर कायद्यांद्वारे क्रिप्टो गुन्ह्यांचा तपास केला जातोय.
क्रिप्टो गुन्हेगारी वाढतेय
अलीकडे लोक मोठ्या प्रमाणात क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करतायेत. याकडे तरुण लोक अधिक वळत असल्याचं दिसतंय. मात्र, या वाढत्या व्यापामुळे क्रिप्टो करन्सीमुळे गुन्हेगारी देखील वाढतेय. ही प्रकरणे जगभरात वाढत आहे. क्रिप्टो गुन्ह्यांची प्रकरणेही जगभरात वाढत आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका अहवालानुसार 2021मध्ये क्रिप्टोकरन्सीद्वारे सुमारे 14 अब्ज डॉलर अवैध व्यवहार झाले होते. हे सर्व व्यवहार गेल्या वर्षीच्या 7.8 अब्ज डॉलपेक्षा 79 टक्क्यांनी जास्त आहेत.
इतर बातमी
Ramzan | उपवास आरोग्यासाठीही फायदेशीर, जाणून घ्या फायदे…
Get Child : ‘हे’ उपाय केल्यास मिळू शकतं संतती प्राप्तीचं सुख !