एकदाच पैसे गुंतवा आणि पुढच्याच महिन्यापासून आयुष्यभर पेन्शन मिळवा; जाणून घ्या एलआयसीचा खास प्लान

गुंतवणूकीनंतर लगेचच पुढच्या महिन्यापासून पेन्शन मिळवून देणाऱ्या विशेष प्लानचे नाव आहे ‘जीवन अक्षय’. गुंतवणुकीच्या दुसऱ्याच महिन्यापासून आपल्या रक्कमेवर परतावा मिळवून देणारी ही विशेष पॉलिसी आहे. (Invest once and get a lifetime pension from the very next month; know LIC's special plan)

एकदाच पैसे गुंतवा आणि पुढच्याच महिन्यापासून आयुष्यभर पेन्शन मिळवा; जाणून घ्या एलआयसीचा खास प्लान
एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये दररोज गुंतवा 150 रुपये, नोकरी मिळण्यापूर्वी मुलं होतील लक्षाधीश
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 7:36 AM

नवी दिल्ली : अनेकदा लोक आपल्या हातात पैसा आला की त्या पैशात घर बांधायचा विचार करतात. यामागे त्यांचे एक उद्दीष्ट असते ते म्हणजे भाड्याच्या माध्यमातून आपले उत्पन्न सुरू ठेवणे. घर बांधून झाले की त्या ठिकाणी भाडेकरू ठेवायचा. त्याच्याकडून भाड्यापोटी आपल्याला ठराविक रक्कम दर महिन्याला मिळत राहील, असे घर बांधण्यामागील लोकांचे गणित असते. पण आपली ही कल्पना खरंच आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे का, याचा सर्वांनी विचार करायला हवा. मात्र यात होते असे की आपली मालमत्ता अर्थात आपले घर हे निम्म्या कालावधीसाठी बंद राहते. कारण अशा कालावधीत एकतर भाडेकरुने घर खाली केलेले असते व दुसरा भाडेकरू आपल्याला वेळीच सापडलेला नसतो. ही एक आपल्या उत्पन्नात अडथळा आणणारी प्रमुख बाब आहे. जर अशा प्रकारचा खंड पडून आपले उत्पन्न थांबवायचे नसेल तर तुम्ही तुमचे पैसे एलआयसीच्या विशेष प्लानमध्ये गुंतवणूक केले तर ते अधिक फायदेशीर ठरेल. या प्लानच्या माध्यमातून तुम्हाला गुंतवणूकीच्या पुढच्याच महिन्यापासून पेन्शन मिळणे सुरू होईल. (Invest once and get a lifetime pension from the very next month; know LIC’s special plan)

एलआयसीचा काय आहे विशेष प्लान?

गुंतवणूकीनंतर लगेचच पुढच्या महिन्यापासून पेन्शन मिळवून देणाऱ्या विशेष प्लानचे नाव आहे ‘जीवन अक्षय’. गुंतवणुकीच्या दुसऱ्याच महिन्यापासून आपल्या रक्कमेवर परतावा मिळवून देणारी ही विशेष पॉलिसी आहे. हे पैसे तुम्हाला तुमच्या संपूर्ण आयुष्यभर मिळत राहणार आहेत हेही लक्षात घ्या. जीवन अक्षय पॉलिसी म्हणजे एक पेन्शन योजना आहे. तुम्ही या योजनेत सहा प्रकारे रिटर्न मिळवू शकता. यात केवळ पेन्शन किंवा पेन्शनसोबत इतर अनेक प्रकारचे फायदे घेण्याचे पर्याय आहेत. ही पेन्शन प्रत्येक वर्षाच्या हिशोबाने किंवा दर महिन्याला किंवा दर तीन महिन्याला घेऊ शकता. हा निर्णय तुमचा असेल. तथापि, या पॉलिसीवर तुम्हाला लोन मिळत नाही. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर वारसालाही अनेक फायदे मिळवून देणारी ही पॉलिसी आहे. काही शर्तींच्या आधारे जोडीला संपूर्ण आयुष्यभर पेन्शन मिळत राहते. याबरोबरच आयकरातही सूट मिळवून देणारी योजना आहे.

योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

या योजनेत 30 वर्षे किंवा त्यापुढील वयाची व्यक्ती पैशांची गुंतवणूक करू शकते. तुम्ही या योजनेत कमीत कमी 1 लाख रुपये गुंतवू शकता. जर तुम्ही या योजनेमध्ये दहा लाखांहून अधिक रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला प्रत्येक वर्षाला 61 हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकेल. ही पेन्शन आयुष्यभर मिळेल. तुम्ही दर महिन्याच्या हिशोबानेही या योजनेचा लाभ घेऊ शकता. घर बांधून ते भाड्याने देण्याच्या तुलनेत ही गुंतवणूक नक्कीच अधिक उत्पन्न मिळवून देते. (Invest once and get a lifetime pension from the very next month; know LIC’s special plan)

इतर बातम्या

परदेशींकडे मराठी भाषा डिपार्टमेंट, तीन नव्या दमाच्या IAS ना सीईओची पोस्टिंग, ठाकरे सरकारकडून 7 मोठ्या बदल्या

डॉलरमध्ये तेजी आल्यामुळे सोने झाले स्वस्त; जाणून घ्या दहा ग्रॅमचा दर

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.