Investment advice : कमोडिटी मार्केट म्हणजे काय ? जाणून घ्या गुंतवणूक कशी करावी

कमोडिटीतील गुंतवणुकीमुळे तुमचा महागाईपासून बचाव होण्यास मदत हेते. गुंतवणुकीत वैविध्यता येते. तसेच शेअर्स आणि बॉण्डमधील घसरणीपासून जे नुकसान होते ते होत नाही. त्यामुळे कमोडिटीतील गुंतवणूक फायद्याची राहू शकते.

Investment advice : कमोडिटी मार्केट म्हणजे काय ? जाणून घ्या गुंतवणूक कशी करावी
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 5:30 AM

पंकज साध्या आणि सोप्या पद्धतीनं गुंतवणूक (Investment) करतो. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये (Portfolio) एफडी, म्युच्युअल फंड (Mutual funds), पीपीएफ आणि शेअर्स आहेत. पंकजच्या पोर्टफोलिओमध्ये कमोडिटी नसल्यानं त्याच्या मित्रानं आश्चर्य व्यक्त केलं. मग पंकजनं कमोडिटीजमध्ये गुंतवणूक करावी का? कमोडिटीमध्ये गुंतवणूक न केल्यानं कमाईची संधी गमावली का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. कमोडिटीबद्दल माहिती नसताना पैसे गुंतवणूक करणं अयोग्यच, असा दिलासा पंकजनं स्वत:ला दिला. मात्र, कमोडिटीचा विचार पंकजच्या मनात सुरूच होता. कमोडिटीबद्दल संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार पंकजनं केला. मग सुरू झालं संशोधन. सुरुवातीला कमोडिटी व्यवसाय कसा चालतो? हा प्रश्न पडला. शोधल्यानंतर असं समजलं कमोडिटी एक प्रकारची मालमत्ता आहे. त्याचा बाँड किंवा शेअर्सशी फारसा संबंध नाही. मग त्याचा फायदा काय? कमोडिटीजमध्ये गुंतवणूक केल्यानं तुमच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्यता येते मुख्यतः बॉण्ड्स आणि शेअर्स व्यक्तिरिक्त गुंतवणुकीचा एक नवा पर्याय मिळतो.

महागाईपासून बचाव

कमोडिटीतील गुंतवणुकीमुळे तुमचा महागाईपासून बचाव होतो, गुंतवणुकीत वैविध्यता येते आणि शेअर्स आणि बॉण्डमधील घसरणीपासून जे नुकसान होते ते होत नाही. कमोडीटीमधील गुंतवणुकीमुळे महागाईपासून कसा बचाव होतो? याचा विचार आता पंकज करतोय. सोपं आहे, महागाई वाढल्यानंतर कमोडिटीच्या किंमती वाढतात. महागाई वाढल्यास शेअर बाजारात घसरण होते तर कमी झाल्यास रोखे आणि शेअर बाजार चांगली कामगिरी करतात. मात्र दुसरीकडे महागाई वाढल्यानंतर कमोडिटीच्या किंमती वाढत असल्याने तुमचा फायदा होतो.

हे सुद्धा वाचा

कमोडिटीजमध्ये गुंतवणूक कशी करावी?

कमोडिटीमध्ये गुंतवणूक फायदेशीर कशी ठरू शकते हे समजून घेतल्यानंतर आता प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे कमोडिटीजमध्ये गुंतवणूक कुठे करायची? सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोनं सर्वात प्रसिद्ध आहे. उलथापालथीच्या काळात सोनं चांगलं रिटर्न देतं तसेच महागाई वाढल्यानंतर सोन्यात तेजी येते. तुम्ही एक्सचेंजवर व्यापार करू शकता किंवा तुम्ही सुवर्ण रोख्यांमध्येही गुंतवणूक करू शकता. तुम्ही ईटीएफ किंवा डिजिटल सोन्याद्वारेही गुंतवणूक करू शकता. सोन्याच्या किमती कमी झाल्यास खरेदी करा असा सल्ला मोतीलाल ओसवाल फायनान्शिअलचे वरिष्ठ उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी दिलाय. लहान गुंतवणूकदार ऍग्री कमोडिटीमध्येही गुंतवणूक करू शकतात. ऍग्री कमोडिटीमध्ये तेलबिया, खाद्यतेल, मसाले, दाळी, कडधान्य यांची खरेदी विक्री होते. आणि या कमोडिटी MCX आणि NCDEX वर सूचीबद्ध होतात. “लहान गुंतवणूकदारांनी त्यांच्या मालमत्तेपैकी 10 ट्क्के गुंतवणूक सोन आणि चांदीमध्ये करावी. असा सल्ला इन्वेस्टोग्रॉफीच्या फाऊंडर श्वेता जैन यांनी दिलाय.

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.