Investment For Child : तुमच्या राजकुमारीसाठी या बेस्ट स्कीम! भविष्यासाठी आताच करा तरतूद
Investment For Child : तुमच्या लाडक्या लेकीसाठी या आहेत सर्वात चांगल्या योजना..
नवी दिल्ली : तुमच्या लाडक्या लेकीचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर त्यासाठी चांगल्या गुंतवणूक योजनेत (Best Investment Scheme) पैसा अडकविणे आवश्यक आहे. ही गुंतवणूक मुलीच्या भविष्यासाठी उपयोगी पडेल. भारतात बँक आणि टपाल खात्यातील (Bank And Post office) गुंतवणूक योजनेत अनेक पर्याय आहेत. या बचत योजनेत गुंतवणूक केल्यास त्याचा फायदा होतो. आई-वडिलांनी या पर्यायांचा अभ्यास करावा आणि त्यातील मुलीच्या भविष्यासाठी योग्य त्या योजनेची निवड करावी. या योजनेत गुंतवणूक करुन मुलीच्या भविष्यासाठी मोठा निधी तयार करता येऊ शकतो.
सुकन्या समृद्धी योजनेत (SSY) 10 वर्षांपर्यंतच्या मुलीसाठी गुंतवणूक करता येते. आई-वडील या योजनेत मुलीच्या नावे गुंतवणूक करु शकतात. खाते उघडल्यानंतर पुढील 15 वर्षांसाठी मुलीच्या नावे दरमहा वा वार्षिक गुंतवणूक करता येते. त्याआधारे मुलीसाठी दीर्घकालीन फायदा मिळविता येतो.
सध्या सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6% व्याज मिळते. सुकन्या समृद्धी योजना नियम, 2018 नुसार, खाते उघडण्यासाठी किमान 1,000 रुपयांची अट मागे घेण्यात आली आहे. आता किमान 250 रुपयांची गुंतवणूक करुन खाते उघडता येते. एका वर्षात या योजनेत कमाल 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.
द चिल्ड्रेन गिफ्ट म्युच्युअल फंड हा भारतातील मुलींसाठी एक जोरदार आणि योग्य योजना आहे. मुलींच्या भविष्यासाठी ही योजना चांगली आहे. इक्विटी बाजारात ही योजना चांगला परतावा देते. बाजारातील संभाव्य धोके आणि फायदे याची माहिती घेऊन गुंतवणूक करता येते.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) केंद्र सरकारची जोरदार योजना आहे. ही योजना देशातील कोणत्याही टपाल खात्यातून सुरु करता येते. मुलींच्या भविष्यासाठी ही योजना चांगली मानण्यात येते. अनेक तज्ज्ञ ही योजना गुंतवणूकीसाठी योग्य असल्याचा दावा करतात.
पोस्ट-ऑफिस टर्म डिपॉझिट (POTD) योजनाही गुंतवणूकीसाठी आहे. बँकेच्या मुदत ठेव योजनेशी पोस्टाच्या योजनेची तुलना करण्यात येते. पोस्ट खात्याची 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्षांच्या योजनेसाठी व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. पूर्वी हा दर 5.5%, 5.7%, 5.8% आणि 6.7% होता. आता हा व्याजदर 6.6%, 6.8%, 6.9% और 7% करण्यात आला आहे.
गुंतवणुकीचा आणखी एक पर्याय आहे. युनिट लिंक विमा योजना, युलिप (ULIP) हा एक पर्याय आहे. या योजनेतही मुलीसाठी गुंतवणूक करता येऊ शकते. ही योजना चांगला परतावा देते. युनिट लिंक विमा योजनेत गुंतवणुकीपूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराची मदत आणि सल्ला नक्की घ्या.