SIP Calculation | फक्त ₹1000 गुंतवून होवू शकतात 2 कोटी 33 लाख 60 हजार, जरा गणित तर समजून घ्या..
SIP Calculation | Compounding ची जादू तुम्हाला माहिती आहे का? त्यामुळे तुम्हाला दीर्घकालीन मुदतीत मोठा परतावा मिळतो. भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक कधी फायदेशीर ठरते.
SIP Calculation | तुम्हालाही करोडपती (Crorepati) होता येईल. पण त्यासाठी प्रश्नांची उत्तरे देण्याची गरज नाही. त्यासाठी तुम्हाला कोणतेही उत्पादन खरेदी करायचे नाही. शेअर बाजाराचा (Share Market) धोका नाही. गरज आहे नियमीत गुंतवणुकीची(Investment). ही गुंतवणूक दीर्घकाळासाठी हवी. SIP द्वारे तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास करोडपती होऊ शकता.
Compounding चं रहस्य काय?
Compounding द्वारे तुम्हाला करोडपती होता येईल. ठराविक रक्कमेत व्याजाची रक्कम जमा होते. वर्षानुवर्षे हे चक्र सुरु राहते आणि गुंतवणूकदाराला मोठा फायदा होतो. जितक्या लवकर तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात कराल, तेवढा तुमचा फायदा अधिक होईल. भविष्य सुरक्षित राहिल.
दर महिन्याला 1000 रुपयांची गुंतवणूक
नियमीत अल्पबचतीतून तुम्हाला मोठा निधी तयार करता येतो (Large Fund With Small Investment). 1000 रुपयांच्या अल्पबचतीतून तुम्ही हे लक्ष्य गाठू शकता. दर महिन्याला ही नियमीत गुंतवणूक करावी लागेल.
SIP द्वारे बंपर रिटर्न
करोडपती होण्यासाठी दर महिन्याला 1000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. ही रक्कम 20 वर्षांकरीता नियमीत जमा करावी लागेल. 20 वर्षांसाठी वार्षिक 15 टक्के दराने परतावा मिळेल. तुमचा फंड वाढून 15 लाख 16 हजार रुपये होईल. 20 टक्के वार्षिक परतावा मिळाल्यास हा फंड वाढून 31.61 लाख रुपयांचा होईल.
30 वर्षांच्या गुंतवणुकीवर 2 कोटी
दर महिन्याला 1000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 20 टक्के वार्षिक परतावा मिळाल्यास, मॅच्युरिटीवर 86.27 लाख रुपयांचा फंड तयार होईल. 30 वर्षांसाठी हीच गुंतवणूक केल्यास 20 टक्के वार्षिक परतावा गृहीत धरुन 2 कोटी 33 लाख 60 हजार रुपयांचा तगडा परतावा मिळेल.
एसआयपीचा फायदा
म्युच्युअल फंडात गुंतवणुकीवर कम्पाऊंडिंगचा (Compounding) फायदा मिळतो. दर महिन्याला गुंतवणुकीची सुविधा मिळते. SIP द्वारे अल्प रक्कमेत तुम्हाला मोठा निधी उभारता येतो.