Offer : खास रामभक्तांसाठी IRCTC ची बंपर ऑफर, प्रभू रामाने पदस्पर्श केलेल्या 13 ठिकाणांची स्वस्तात सफर

| Updated on: Oct 07, 2022 | 10:05 PM

Offer : प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या 13 ठिकाणांना भेटी देण्याचा योग तुम्हाला साधता येणार आहे. या सफरीसाठी फारसा खर्च ही येणार नाही..

Offer : खास रामभक्तांसाठी IRCTC ची बंपर ऑफर, प्रभू रामाने पदस्पर्श केलेल्या 13 ठिकाणांची स्वस्तात  सफर
श्री रामायण यात्रा
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली :  IRCTC  ने रामभक्तांसाठी बंपर ऑफर आणली आहे. प्रभू श्रीरामाच्या (Prabhu Shri Ram) पदस्पर्शाने पुनीत झालेल्या 13 ठिकाणांना (13 Places) भेटी देण्याचा योग तुम्हाला साधता येणार आहे. या सफरीसाठी फारसा खर्च ही येणार नाही.चला तर काही आहे ही ऑफर ते पाहुयात..

IRCTC ने रामभक्तांसाठी Sri Ramayana Yatra By Bharat Gaurav Tourist Train LTC Approved (NZBG01) ही विशेष रेल्वे सुरु केलेली आहे. भारतीय रेल्वे 17 रात्री आणि 18 दिवसांसाठी विशेष टूर काढणार आहे. आयोध्येपासून हा प्रवास सुरु होईल आणि रामेश्वरमपर्यंत ही यात्रा सुरु राहील. पुढील महिन्यात 18 नोव्हेंबर रोजी दिल्लीतून या यात्रेला सुरुवात होईल.

या यात्रेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर याच्या विशेष पॅकेजची माहिती तुम्हाला IRCTC च्या संकेतस्थळावर मिळेल. यात्रेचा कालावधी, त्याचे स्वरुप, सुरुवात, स्थळे आणि त्याची माहिती या सर्वांची माहिती अधिकृत संकेतस्थळावर मिळेल.

हे सुद्धा वाचा

या पॅकेजमध्ये रामभक्तांना आयोध्या, नंदीग्राम, जनकपूरी, सीतामढी, बक्सर, वाराणसी, प्रयागराज, श्रृंगवेरपूर, चित्रकूट, नाशिक, हम्पी, रामेश्वरम आणि भद्राचलम यासारख्या ठिकाणी भाविकांना भेट देता येईल.

18 दिवसांच्या यात्रेसाठी एका व्यक्तीला 59,980 रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जर तुम्हाला या यात्रेत सहभागी व्हायचे असेल तर बुकिंग करावे लागणार आहे. या यात्रेत तुमच्या जेवणाची आणि राहण्याची खास सोय करण्यात आलेली आहे. यासंबंधीची माहिती तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर मिळेल.

भाविकांना दिल्ली येथील सफरदरजंग रेल्वे स्टेशन, गाजियाबाद, अलिगढ, टुंडला, कानपूर सेंट्रल आणि लखनऊ रेल्वे स्टेशनवर या यात्रेत सहभागी होता येईल. राम भक्तांना IRCTC च्या  (https://www.irctctourism.com/pacakage_description?packageCode=NZBG01) या संकेतस्थळावर या प्रवासाची माहिती मिळेल.