Insurance : विम्याचा दावा PUC प्रमाणपत्राअभावी अडकणार का? नवीन नियमाचा काय आहे सांगावा..

Insurance : विम्याचा दाव्यासाठी PUC प्रमाणपत्राची आवश्यकता आहे का?...

Insurance : विम्याचा दावा PUC प्रमाणपत्राअभावी अडकणार का? नवीन नियमाचा काय आहे सांगावा..
विम्याच्या दाव्यासाठी PUC आवश्यक आहे का?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 13, 2022 | 2:50 PM

नवी दिल्ली : ‘Pollution under Control’ Certificate म्हणजे पीयूसी प्रमाणपत्राशिवाय विम्याचा दावा (Insurance Claim) मंजूर होऊ शकतो का नाही? याविषयीच्या नियमात (Rules) आता बदल करण्यात आला आहे. विमा कंपन्यांना (Insurance Companies) व्यवसाय वृद्धी करता यावी आणि विमा दाव्यांचा निपटारा जलदरित्या करता यावा यासाठी नियमात बदल करण्यात आला आहे. या बदलामुळे आता वाहनधारकांचा मनःस्ताप कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

पर्यावरण पुरक वाहनांसाठी PUC Certificate आवश्यक करण्यात आले आहे. तुमच्या वाहनामुळे प्रदुषणात भर पडते की नाही यासंबंधीचा अहवाल पीयूसी प्रमाणपत्रामुळे मिळतो. पीयूसी प्रमाणपत्र वेळोवेळी काढावे लागते. त्यामुळे वाहनाचा सध्यस्थिती आणि आरोग्याची माहिती मिळते.

कायद्यानुसार, हे प्रमाणपत्र प्रत्येक वाहनधारकाकडे असणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र नेहमी अपडेट असणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र पीयूसी सेंटर वळ मिळते. त्यासाठी थोडाफार खर्च येतो. पण त्यामुळे तुमचे वाहन प्रदूषण वाढण्यास कारणीभूत ठरते का हे कळते.

हे सुद्धा वाचा

सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात मोटर व्हेइकल रुल्स, 1989 नुसार, पीयूसी प्रमाणपत्र आवश्यक असल्याचा निकाल दिला होता. त्यामुळे वाहन चालवताना पीयुसी प्रमाणपत्र आवश्यक आहे, तसे ते विम्याचा दावा करतानाही आवश्यक आहे का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) याबाबतच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. ज्या वाहनधारकांकडे पीयूसी प्रमाणपत्र नाही, त्यांचा विमा करु नका, अशा सूचना प्राधिकरणाने विमा कंपन्यांना दिल्या आहेत.

वाहनधारकांना विमा नुतनीकरण करताना, नवीन विमा खरेदी करताना वैध पीयूसी प्रमाणपत्र दाखविणे आवश्यक आहे, असे IRDAI ने विमा कंपन्यांना बजावले आहे. आता तर विमा सहज मोबाईलवरील अॅपवरुनही नुतनीकरण करता येतो, पण त्यावेळी PUC प्रमाणपत्राची मागणी किती जणांना करण्यात येते? तर या प्रश्नाचे उत्तर सगळ्यांनाच माहिती आहे.

तर विम्याचा दाव्यासाठी हा नियम अनिवार्य नाही. म्हणजे विम्याचा दावा करताना वाहनाच्या PUC प्रमाणपत्राचे बंधन नाही. यासंबंधीचा नवीन नियम तयार करण्यात आला आहे. त्यामुले विम्याचा निपटारा करताना पीयूसी प्रमाणपत्राची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोणतीही विमा कंपनी केवळ पीयूसी प्रमाणपत्र नाही म्हणून दावा मंजूर करावा की करु नये, असा निर्णय घेऊ शकत नाही. पण नवीन विमा खरेदी करताना, नुतनीकरण करताना प्राधिकरणाने पीयूसी प्रमाणपत्र आवश्यक केले आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.