Loan : Pre-Approved Loan खरंच घ्यावं का? कोणाला मिळतं हे कर्ज, सौदा फायद्याचा की तोट्याचा

Loan : पूर्व मंजूर कर्ज घेणे खरंच फायद्याचं आहे की हा सौदा तोट्याचा आहे.

Loan : Pre-Approved Loan खरंच घ्यावं का? कोणाला मिळतं हे कर्ज, सौदा फायद्याचा की तोट्याचा
हा सौदा फायद्याची की तोट्याचाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 26, 2022 | 3:35 PM

नवी दिल्ली : दिवाळी सणामध्ये (Diwali Festival) खरेदी जोरदार होते. पगार आणि बोनस केव्हा संपून जातो ते कळत नाही. पण हौसेला मोल नसते. अशावेळी एखाद्या गोष्टीसाठी रक्कम हवी असल्यास बँका (Bank) धावून येतात. बँका काही ग्राहकांना प्री-अपूव्हड पर्सनल लोनची (Pre Approved Personal Loan) ऑफर देतात. ग्राहक याचा वापर त्यांच्या अत्यावश्यक खरेदीसाठी करु शकतात.

वैयक्तिक कर्ज हे बँकेच्या दृष्टीने असुरक्षित कर्ज मानण्यात येते. यावर व्याजही अधिक मोजावे लागते. तर पूर्व मंजूर वैयक्तिक कर्ज (Pre Approved Personal Loan) वैयक्तिक कर्जापेक्षा थोडे वेगळे असते. कारण ते अगोदरच तुम्हाला मंजूर केलेले असते.

त्यासाठी तुम्हाला बँकेकडे चक्कर मारायची गरज नाही. बँकेकडे अर्ज करण्याची आवश्यकता नसते. बँका तुम्हाला अगोदरच हे कर्ज मंजूर करते. केवळ हे कर्ज तुम्ही घ्यायचे की नाही हा तुमचा निर्णय आहे.

हे सुद्धा वाचा

जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर ही ऑफर तुम्हाला सहज मिळू शकते. तुम्ही वेळेवर कर्जाची परतफेड केलेली असेल. तुमचा आर्थिक लेखाजोखा उत्तम असेल तर तुम्ही कर्जासाठी पात्र ठरता.

पूर्व मंजूर कर्जासाठी तुमचा पगार हा महत्वाचा घटक ठरतो. ही अट पूर्ण केल्यास तुम्हाला तात्काळ कर्ज मंजूर होते. कर्जदाराला या कर्जाची वेळेत परतफेड करावी लागते. तरच पुढेही कर्जासाठी फारसा त्रास होत नाही.

वैयक्तिक कर्जापेक्षा पूर्व मंजूर वैयक्तिक कर्जासाठी कमी व्याज मोजावे लागते. कर्जदाराला फार कागदपत्रे देण्याची आवश्यकता नसते. या कर्जासाठी बँकेत जाण्याची गरज नसते. तुमचा होकार आला तर अवघ्या काही तासात कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात जमा होते.

परंतु, कर्ज घेताना प्रक्रिया शुल्क, पेमेंट शुल्क, फोरक्लोर शुल्क आणि इतर छुपे शुल्क आहेत का याची रीतसर माहिती करुन घ्या. नाहीतर हे कर्ज तुम्हाला भूर्दंड देणारे ठरेल.

कर्जाचा व्याजदर, त्याचा हप्ता आणि कालावधी याची ही माहिती करुन घ्या. हे कर्ज जर बाजार भावापेक्षा अधिक मिळत असेल तर हा व्यवहार रद्द करणेच फायद्याचे ठरेल.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.