Cough Syrup : हरियाणातील फार्मा कंपनीचे कफ सिरप खरंच होते जीवघेणे? प्रकरणात मोठा खुलासा..

Cough Syrup : हरियाणातील फार्मा कंपनीचा कफ सिरप खरंच यमदूत ठरला आहे का? काय सांगतो अहवाल

Cough Syrup : हरियाणातील फार्मा कंपनीचे कफ सिरप खरंच होते जीवघेणे? प्रकरणात मोठा खुलासा..
कफ सिरप खरंच जीवघेणे?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 12, 2022 | 9:57 PM

नवी दिल्ली : हरियाणातील औषधी निर्माती कंपनी मेडेन फार्मास्युटिकल्स लिमिटेड (Maiden Pharmaceuticals) कंपनीचे कप सिरप (Cough Syrup) वादात सापडले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या सिरफविषयी अलर्ट जाहीर केला आहे. आता याप्रकरणात देशाच्या आरोग्य मंत्रालयाने (Health Department) उच्च सूत्रांच्या हवाल्याने मोठा खुलासा केला आहे. याविषयीच्या रिपोर्टमध्ये काय सांगितले आहे ते पाहुयात..

गांबियामध्ये लहान मुले दगावण्यामागे याच कंपनीच्या कप सिरपचा हात असल्याचा संशय जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केला होता. 29 सप्टेंबर 2022 रोजी याविषयीची माहिती भारताच्या ड्रग कंट्रोलरला देण्यात आली होती.

चौकशी आणि तपासादरम्यान WHO या औषधात विशिष्ट प्रकारचे रसायनही आढळले होते. या केमिकलचे नाव Diethylene glycol आणि Ethylene glycol असे आहे. या कप सिरफच्या एकूण 23 सॅम्पलपैकी 4 सॅम्पलमध्ये हे केमिकल, रसायन आढळले होते.

हे सुद्धा वाचा

दरम्यान या चौकशीचा एकही चिटोरा जागतिक आरोग्य संघटनेने भारताच्या औषधी नियंत्रकाच्या (CDSCO) हाती सोपवलेला नाही. याविषयी माहिती देण्याची विनंती दोनवेळा भारताकडून करण्यात आलेली आहे.

त्यामुळे याप्रकरणात कप सिरफचा या मुलांच्या मृत्यूमागे हात असल्याचा सध्या तरी ठोसपणे सांगता येत नसल्याचे एका अहवालाद्वारे स्पष्ट करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे याविषयी येत्या काही दिवसात ठोस माहिती समोर येईल.

भारताच्या औषधी नियंत्रकांनी या कप सिरफविषयक तक्रारीची गंभीर दखल घेतली. या औषधाच्या चार सॅम्पलची तपासणी करण्यात येत आहे. चंदीगढ येथील प्रयोगशाळेत याचे नमुने पाठविण्यात आले आहे. एवढेच नाही तर कंपनीचे उत्पादनही बंद करण्यात आलेले आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.