Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tax on Saving : सन्मान करताना खिसा तर कापल्या जात नाही ना! सन्मान बचत प्रमाणपत्र योजना आहे का करमुक्त?

Tax on Saving : केंद्र सरकारने या आर्थिक वर्षापासून पुढील दोन वर्षांकरीता महिलांसाठी बचत योजना आणली आहे. या बचत योजनेवर व्याज आणि परतावा मिळतो. पण ही योजना करमुक्त आहे की नाही...

Tax on Saving : सन्मान करताना खिसा तर कापल्या जात नाही ना! सन्मान बचत प्रमाणपत्र योजना आहे का करमुक्त?
Follow us
| Updated on: Apr 20, 2023 | 7:15 PM

नवी दिल्ली : जर तुम्ही महिला सन्मान बचत योजनेत गुंतवणूक करत असाल तर या योजनेतून जोरदार कमाई करु शकता. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना (Samman Savings Certificate Scheme) ही अल्पबचत योजना या वर्षीपासून सुरु करण्यात आली आहे. ही योजना 1 एप्रिल, 2023 रोजीपासून देशातील महिलांसाठी सुरु करण्यात आली आहे. ही योजना देशभरातील 1.59 लाख पोस्ट कार्यालयात उपलब्ध आहे. केंद्र सरकारने या आर्थिक वर्षापासून पुढील दोन वर्षांकरीता महिलांसाठी बचत योजना आणली आहे. या बचत योजनेवर व्याज आणि परतावा मिळतो. पण ही योजना करमुक्त (Tax Exemption) आहे की नाही, असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे.

काय सांगतो नियम महिला सम्मान बचत प्रमाणपत्र योजनेत व्याजातून होणारी कमाई करमुक्त नाही. या योजनेत गुंतवणूक कराल तर, व्याज आधारीत उत्पन्न आणि व्यक्तिगत कर रचना आधारावर टीडीएस कपात होईल. जर तुम्ही पुढील दोन वर्षांकरीता जर या योजनेत 2 लाख रुपयांची गुंतवणूक कराल, तर ही योजना एखाद्या मुदत ठेव योजनेप्रमाणे काम करते. तर गुंतवणूक रक्कमेवर व्याज तिमाही आधारावर मिळते. म्यॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण 2.32 लाख रुपये मिळतील.

ही योजना केवळ पोस्ट ऑफिसमध्येच महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना केवळ पोस्ट कार्यालयातच उपलब्ध आहे. तुम्ही जवळच्या पोस्ट कार्यालयात जाऊन या योजनेत खाते उघडू शकता. खाते उघडण्यासाठी तुम्हाला अर्ज भरावा लागेल, केवायसी दस्तावेज जसे की आधार कार्ड, पॅनकार्ड, नवीन खातेदारांसाठीचे आवश्यक कागदपत्रे, धनादेश अथवा थेट रक्कम भरणा करण्याची पावती जमा करावी लागेल.

हे सुद्धा वाचा

दोन लाख करा जमा या योजनेवर गुंतवणूकदारांना 7.5 टक्के निश्चित व्याज मिळेल. दोन वर्षांच्या कार्यकाळात, महिला अथवा लहान मुलींच्या नावे दोन लाख रुपयांपर्यंत ठेव ठेवता येईल. या योजनेत कमीत कमी 1,000 रुपये तर जास्तीत जास्त 2 लाख रुपये जमा करता येतील. वार्षिक 7.5 टक्के व्याज तिमाहीत जमा करता येईल.

इतकी काढता येईल रक्कम या योजनेत गुंतवणूकदारांना दोन वर्षांपर्यंत रक्कम ठेवता येईल. गरजेच्यावेळी रक्कम काढता येईल. खाते उघडल्यानंतर त्यांना एक वर्षानंतर खात्यातील रक्कम काढता येईल. एकावेळी खातेदार 40 टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकेल. लेखा कार्यालयात त्यासाठी फॉर्म क्रमांक 3 जमा करावा लागेल. त्यानंतर रक्कम प्राप्त होईल.

करा खाते बंद

  1. खातेदाराचा मृत्यू झाल्यास तेव्हा खाते बंद करता येईल
  2. खातेदार गंभीर आजारी असेल, त्याला असाध्य रोग असल्यास
  3. लहान मुलीचा मृत्यू झाल्यास, त्याचा नावाचे खाते बंद करता येईल
  4. आर्थिक विवंचना असेल, त्यासंबंधीची अडचण पटवून दिल्यास खाते बंद होईल
  5. इतर काही कारण असेल तर व्याजदराच्या अटींची पुर्तता करुन खाते बंद होईल

या गोष्टी ठेवा लक्षात

  1. ही एकप्रकारची एकवेळची बचत योजना आहे.
  2. या योजनेत गुंतवणूकदार एका वेळी दोन लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकतो.
  3. या योजनेत गुंतवणूकदार दोन वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येईल.
  4. केंद्र सरकारने घोषीत केलेला व्याजदर वार्षिक 7.5 टक्के आहे.
  5. देशात ही योजना महिलांसह मुलींना आत्मनिर्भर करु शकते.

फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं...
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं....
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न.