IT Jobs : भारतीय IT कंपन्यांमध्ये नोकरीची हमी, इतक्या लाख तरुणांना मिळणार जॉब..

IT Jobs : भारतीय IT कंपन्यांमध्ये इतक्या लाख तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे..

IT Jobs : भारतीय IT कंपन्यांमध्ये नोकरीची हमी, इतक्या लाख तरुणांना मिळणार जॉब..
आयटी क्षेत्रात नोकऱ्यांची हमीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 17, 2022 | 5:48 PM

नवी दिल्ली : एकीकडे टेक कंपन्यांमध्ये (Tech Companies) कर्मचारी कपातीचा ट्रेंड सुरु असताना भारतात मात्र आशादायक चित्र आहे. भारतातील आयटी क्षेत्रात (IT Sector) नोकऱ्यांचा (Jobs) पाऊस पडणार आहे. या क्षेत्रात लाखो तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रात आनंदाची लहर आली आहे.

इन्फोसिस कंपनीचे सह संस्थापक क्रिस गोपालकृष्णन (Kris Gopalakrishnan) यांनी बुधवारी याविषयीची माहिती दिली. त्यांच्या दाव्यानुसार, आयटी क्षेत्रात तब्बल 2 लाख तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे.

येत्या काही दिवसात 2 लाख तरुणांची भरती करण्यात येणार आहे. कोविड काळात डिजिटल तंत्रज्ञानाची एकच लाट आली आहे. त्याचा फायदा व्यापार, व्यवसायात आणि लोकांच्या रोजच्या वापरात दिसून आला.

हे सुद्धा वाचा

डिजिटलयाझेशनच्या युगात नवीन नोकऱ्याही तयार झाल्या आहेत. डिजिटलयाझेशनमुळे कंपन्यांच्या व्यापारातील प्रचार आणि प्रसाराला वेग आला आहे. त्याचा फायदा कंपन्यांनी घेतला असून वाढत्या कामासाठी मोठ्या प्रमाणात तरुणांची आयटी कंपन्यांना गरज आहे.

बेंगळुरु येथील टेक समिटीमध्ये बोलताना गोपालकृष्णन यांनी भारतीय आयटी क्षेत्राच्या गुणवत्तेविषयी, दर्जाविषयी माहिती दिली. त्याआधारेच जागतिक व्यापारात आणि व्यवसायात आयटी क्षेत्राला मागणी आल्याचे त्यांनी सांगितले.

दोन लाख तरुणांना येत्या काही दिवसात नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे. आयटी क्षेत्रात काही दिवसांपासून राजीनामा सत्र सुरु होते. त्यावरही त्यांनी भाष्य केले. नोकरी सोडने, मूनलाईटिंग आणि कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलविणे, असे आवाहनं असल्याचे त्यांनी सांगितले.

आयटी क्षेत्रात नोकऱ्यांची लाट येणार असल्याने या क्षेत्रात बुमिंग वाढले आहे. गेल्या काही दिवसांपासून या क्षेत्रात नोकऱ्या सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण वाढलं होते.  या घोषणेमुळे या क्षेत्राकडे पुन्हा तरुणांचा ओढा वाढण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.